Business Success Story: वयाच्या 21 व्या वर्षी मिळाली रतन टाटांची मदत आणि उभारली तब्बल 500 कोटींची कंपनी! वाचा अर्जुन देशपांडे यांची यशोगाथा

रतन टाटा म्हटले म्हणजे उद्योगविश्वातील प्रसिद्ध नाव होते असे नव्हे तर सामाजिक क्षेत्रातील त्यांची बांधिलकी देखील तितकीच महत्त्वाची आणि मोठी होती. अनेक सामाजिक उपक्रमांना सढळ हाताने मदत करणारे उद्योजक म्हणून रतन टाटा हे सर्व परिचित होते.

Published on -

Business Success Story:- रतन टाटा म्हटले म्हणजे उद्योगविश्वातील प्रसिद्ध नाव होते असे नव्हे तर सामाजिक क्षेत्रातील त्यांची बांधिलकी देखील तितकीच महत्त्वाची आणि मोठी होती. अनेक सामाजिक उपक्रमांना सढळ हाताने मदत करणारे उद्योजक म्हणून रतन टाटा हे सर्व परिचित होते.

अनेक स्टार्टअपना मदत केल्याचे देखील अनेक उदाहरणे आपल्याला रतन टाटांच्या बाबतीत सांगता येतील. अशीच एक त्यांच्या सामाजिक बांधिलकी किंवा उगवत्या उद्योजकांना प्रवाहात आणण्याकरिता केलेल्या मदतीचे उदाहरण बघितले तर आपल्याला अर्जुन देशपांडे यांचे उदाहरण घेता येईल.

अर्जुन देशपांडे हे यशस्वी उद्योगपतींच्या यादीतील एक महत्त्वाचे नाव असून त्यांनी वयाच्या 21 व्या वर्षी 500 कोटी रुपयांची कंपनी उभारून यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपास येण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचे काम केले.

सोळाव्या वर्षी त्यांनी लोकांना स्वस्तात औषधे देण्यासाठी जेनेरिक आधार नावाची कंपनीची सुरुवात केली होती व मुंबईमध्ये हे स्टार्टअप सुरू केले व याला मदत करण्यासाठी रतन टाटा पुढे आले होते.

जर आपण संपूर्ण भारताचा विचार केला तर संपूर्ण देशात जेनेरिक आधारच्या अनेक फ्रॅंचाईजी नेटवर्क आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येते. जवळपास 90% जनतेपर्यंत स्वस्तात औषधे पोहोचवण्याचे काम जेनेरिक आधारच्या माध्यमातून केले जाते.

 अर्जुन देशपांडे यांची यशोगाथा

वयाच्या सोळाव्या वर्षी लोकांना स्वस्त औषधी मिळावी त्याकरिता जेनेरिक आधार नावाची कंपनी अर्जुन देशपांडे या तरुणाने उभारली व वयाच्या 21 व्या वर्षापर्यंत त्या कंपनीचे रूपांतर 500 कोटी रुपयांच्या कंपनी पर्यंत नेले. विशेष म्हणजे मुंबईत सुरू केलेल्या या स्टार्टअपला रतन टाटांनी मदत केली व आज पूर्ण देशात जेनेरिक आधारच्या अनेक फ्रॅंचाईजी नेटवर्कच्या माध्यमातून 90% पर्यंत लोकांना स्वस्त औषधे मिळत आहेत.

जेनेरिक आधार कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ग्राहक आणि कंपनी यांच्यातील जे मध्यस्थ असतात तेच काढून टाकल्यामुळे ग्राहकांना स्वस्तात औषधी विकणे या कंपनीला शक्य होते. औषधे स्वस्त मिळण्याचे उदाहरण घ्यायचे झाले तर जी औषधांची स्ट्रीप 110 रुपयाला विकली जाते ते तुम्हाला जेनेरिक आधारमध्ये केवळ पाच रुपये प्रति स्ट्रीपने मिळते.

स्वस्तात औषधे विक्री करत असलेली देशपांडे यांची कंपनी इतक्या दिवसांमध्ये अनेक शहरांपर्यंत पोहोचली. अर्जुन देशपांडे यांचा हा यशाचा प्रवास सुरू असताना त्यांना टेड टॉकमध्ये येण्याची संधी मिळाली व त्यांचा टेड चर्चेचा व्हिडिओ वायरल झाला व हा व्हिडिओ रतन टाटा यांच्या पाहण्यात आल्यामुळे ते खूप प्रभावी झाले आणि त्या कंपनीला मदत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

त्यामुळेच आज जेनेरिक आधारचे देशभरात 2000 पेक्षा अधिक स्टोअर्स दिमाखात उभे आहेत. इतकेच नाही तर दहा हजार लोकांना रोजगार देण्याचे महत्त्वाचे काम जेनेरिक आधारच्या माध्यमातून केले जात आहे.

 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी देखील केले अर्जुन देशपांडे यांचे कौतुक

अर्जुन देशपांडे यांच्या यशस्वी कामगिरीचे कौतुक भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी देखील केले व संपूर्ण देशवासियांना स्वस्त दरात औषध उपलब्ध करून देण्याचे त्यांचे हे पाऊल विशेष कौतुकास्पद असल्याचे म्हटले.

राष्ट्रपतींनी अर्जुन देशपांडे यांना वंडर कीड ऑफ फार्मा असे देखील संबोधले होते. जेनेरिक आधार ही कंपनी भारतातच नाही तर नेपाळ, म्यानमार तसेच श्रीलंका इत्यादी देशांमध्ये देखील व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

इतकेच नाहीतर दुबई आणि व्हिएतनाम व कंबोडियामध्ये देखील त्यांची शॉप सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अशाप्रकारे रतन टाटा यांच्या मदतीमुळे अर्जुन देशपांडे सारखे उद्योजक आज उभे राहिले व त्यांनी पाचशे कोटी रुपयांपर्यंतची कंपनी उभारण्यापर्यंत मजल मारली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News