Business Success Story: कष्टाने उभा केला शून्यापासून ते सहा हजार कोटींपर्यंतचा व्यवसाय; असंख्य कष्टाने फुलवला व्यवसायाचा वटवृक्ष

Ajay Patil
Published:
rajani bector

Business Success Story:- जेव्हा आपण एखादे रोपटे लावतो व नियमितपणे त्याचे काळजी घेऊन त्याला वेळेवर पाणी तसेच खते व इतर आवश्यक गोष्टीची पूर्तता करतो व चांगली देखभाल करतो त्यानंतर काही वर्षांनी त्याचे मोठ्या वृक्षात रूपांतर होते व त्या वृक्षापासून आपल्याला फळे चाखायला मिळतात. असेच काहीतरी व्यवसायाच्या बाबतीत देखील असते.

तुम्हाला जर एखादा व्यवसाय सुरू करायचा किंवा उभा करायचा असेल तर तुम्ही अगदी मोठ्या स्वरूपामध्ये सुरू करू शकत नाही. एकदा छोट्याशा गुंतवणुकीतून एखाद्या व्यवसायाची सुरुवात केली म्हणजेच व्यवसायाचे रोपटे लावले की मग तो व्यवसाय वाढवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सगळ्या आवश्यक गोष्टी करणे खूप गरजेचे असते.

यामध्ये प्रामुख्याने अखंड मेहनत तर असतेच परंतु नियोजनबद्ध प्रयत्न, आलेल्या अवघड परिस्थितींवर मात करण्याची जिद्द इत्यादी गुणांच्या आधारे व्यवसाय उभारीला येतो व कालांतराने तो प्रचंड प्रमाणात विस्तारतो व व्यावसायिक यशस्वी होतात. याच मुद्द्याला धरून आपल्याला रजनी बेक्टर यांचे उदाहरण घेता येईल. यांनी देखील 20000 रुपयाची गुंतवणुकीतून एका व्यवसायाला सुरुवात केली व आज व्यवसाय कोट्यावधीच्या घरामध्ये उलाढाल करत आहे.

 रजनी बेक्टर यांची यशोगाथा

रजनी या जेव्हा लुधियाना या ठिकाणी राहायच्या तेव्हा त्यांच्या मनामध्ये काहीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा हा विचार सातत्याने घोळत होता. या विचारातूनच त्यांनी वीस हजार रुपयाची गुंतवणूक करून स्वतःच्या घरातूनच व्यवसायला सुरुवात केली. छोट्या स्वरूपात सुरू केलेला आज हा व्यवसाय वार्षिक कोट्यावधी रुपयांमध्ये उलाढाल करत असून रजनी यांनी असंख्य अडचणींवर मात करत, काट्यांचा प्रवास कष्टाने सुकर करत हे यश मिळवले आहे.

एवढेच नाही तर त्यांना अनेक स्पर्धक कंपन्यांचा देखील सामना करावा लागला व अनेक सामाजिक अडचणी देखील आल्या. परंतु यावर यशस्वीपणे मात करत त्यांनी हे याकडे वाटचाल सुरू ठेवली. रजनी यांनी सुरुवातीला घरामध्ये आईस्क्रीम बनवायला सुरुवात केली व व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर बिस्किटे आणि इतर महत्त्वाची खाद्यपदार्थांचे उत्पादन देखील सुरू करून त्यांनी हळूहळू आपला व्यवसाय वाढवला.

परफेक्ट नियोजन आणि कष्टाने त्यांच्या या लहानशा कंपनीला खूप चांगली प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली. परंतु त्यांच्या या व्यवसायाला योग्य कलाटणी मिळण्यामध्ये मॅकडोनाल्ड्स कंपनीचा खूप मोठा वाटा आहे. कारण या कंपनीने रजनी यांच्या कंपनीची फूड स्पेशलिटीज लिमिटेड अंतर्गत कायमस्वरूपी बर्गर साठी लागणारे पाव म्हणजेच बन सप्लायर म्हणून निवड केली आणि इथूनच खरी सुरुवात झाली.

मॅकडोनाल्डच्या माध्यमातून जी काही संधी मिळाली तिचे सोने कसे करावे हे रजनी यांना माहीत होते व या संधीचा त्यांनी योग्य फायदा घेऊन आणि त्यांच्या वाढत्या व्यवसायाचे जे काही स्वरूप आहे ते समोर ठेवून ग्रेटर नोएडा या ठिकाणी स्वतःचा उत्पादन प्रकल्प उभारायचा ठरवला व तो उभारला. एवढ्या वरच न थांबता टप्प्याटप्प्याने व्यवसायाची वाढ करून संपूर्ण देशात बरीच ठिकाणी लहान मोठे दुकानांची सुरुवात केली.

2023 पर्यंत जर आपण त्यांच्या या कंपनीचे बाजार मूल्य पाहिले तर ते तब्बल 6681 कोटी रुपये पर्यंत पोचलेले आहे व ही कंपनी एफएमसीजी उद्योग विश्वातील एक सर्वात यशस्वी कंपनी असून ते सर्वात यशस्वी व्यावसायिक देखील आहेत. त्यांच्या कंपनीचे नाव फूड स्पेशलिटीज लिमिटेड कंपनी अशी आहे. त्यांच्या या कंपनीची इंग्लिश ओव्हन आणि क्रेमिक यासारखी उत्पादने खूप प्रसिद्ध असून देशभरात सर्वत्र खरेदीसाठी उपलब्ध देखील आहेत.

अशा पद्धतीने रजनी यांनी छोटेसे व्यवसायाचे सुरुवात केली.परंतु प्रचंड प्रमाणात कष्ट तसेच बाजारपेठेच्या मागोवा घेऊन घेतलेले निर्णय व मिळालेल्या संधीचे सोने करून व्यवसाय वाढीला लावला. रजनी यांच्या या सगळ्या प्रवासावरून आपल्याला शिकायला मिळते की, जरी एखाद्या व्यवसायाची सुरुवात छोट्याशा प्रमाणात केली परंतु त्याला मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी अखंड प्रयत्न तसेच जिद्द या गुणांसह विपरीत परिस्थितीवर मात करत हळूहळू टप्पे पार करत राहणे फार महत्त्वाचे असते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे आलेल्या संधीचे महत्व हेरून त्या संधीचे सोने करणे हे देखील महत्त्वाचे असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe