Business Success Story: कर्ज घेऊन सुरू केला या तरुणाने व्यवसाय आणि आज कमवतो महिन्याला 12 लाख! अस काय केले नेमके?

Ajay Patil
Published:
business success story

Business Success Story:- व्यवसाय हा कधीही छोटा किंवा मोठा नसतो. फक्त नेमकी बाजारपेठेतील मागणी आणि गरज ओळखून व्यवसायाची सुरुवात केली तर नक्कीच व्यवसाय भरभराटीला जातो आणि त्या माध्यमातून महिन्याला लाखो रुपये देखील मिळवता येणे शक्य होते. आजकालच्या अनेक उच्च शिक्षित तरुण वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायांच्या माध्यमातून लाखो रुपये कमवतांना आपल्याला दिसून येत आहेत.

नेमकेपणाने या व्यवसायाची आखणी करून बाजारपेठेतील मागणीच्या दृष्टिकोनातून नियोजनाने हे व्यवसाय त्यांनी भरभराटीला नेले आहेत. याचप्रमाणे आपण राजस्थान राज्यातील शंकर मीना या तरुणाचा विचार केला तर या तरुणाने कर्ज घेऊन मशरूम स्पॉन  म्हणजेच मशरूमच्या बियाणे पुरवणारी कंपनीची सुरुवात केली आणि या कंपनीच्या माध्यमातून हा तरुण महिन्याला तब्बल 12 लाख रुपयांपर्यंत कमाई करत आहे.

 अशाप्रकारे सुरू केला व्यवसाय

जेव्हा शंकर मीना हे फायनान्स मध्ये एमबीए करत होते तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी व्यवसाय करावा हा विचार सुरू होता व ही घटना साधारणपणे 2013 या वर्षाची आहे. कारण शंकर याची संपूर्ण कौटुंबिक पार्श्वभूमी शेतीचे असल्यामुळे त्याला शेतीच्या संबंधित व्यवसाय करावा असे मनात चाललेले होते.

निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना ज्या काही समस्या आर्थिक दृष्टिकोनातून समस्या भेडसावतात  याची जाणीव त्याला होती. त्यामुळे कुटुंबासाठी उत्पन्नाचा एक निश्चित आणि विश्वासार्ह स्त्रोत निर्माण करायचा या दृष्टिकोनातून त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची निश्चित केले व मशरूम स्पॉन पुरवणारी कंपनीची स्थापना केली व ही राजस्थानमधील पहिली कंपनी आहे.

परंतु हा व्यवसाय सुरू करण्याआधी शंकर यांनी मशरूम लागवडीमधील ज्या काही समस्या आणि गुंतागुंत आहेत त्यावर मात करण्याकरिता अनेक संस्थांकडून प्रशिक्षण घेतले आणि 2000 सुरुवातीला सोलन येथील डायरेक्टोरेट ऑफ मशरूम रिसर्च येथे खाद्य आणि औषधी मशरूमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून ट्रेनिंग घेतले व याशिवाय हरियाणा ऍग्रो इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन आणि बेंगलोर येथे देखील या संबंधीचे प्रशिक्षण घेतले.

 व्यवसाय सुरू करण्याआधी मशरूम स्पॉन उत्पादनामध्ये काय संधी आहे त्याचा शोध घेतला

जानेवारी 2017 मध्ये शंकर मीना यांनी जयपूर येथील घरीच पहिला प्रयोग करण्याचे ठरवले व याकरिता दिल्ली या ठिकाणाहून आळंबी सह सुमारे 40 पोती ऑईस्टर मशरूमचा वापर केला. सुरुवातीला यश मिळाल्यानंतर हे मशरूम त्याने अगोदर मित्र आणि कुटुंबासोबत शेअर केले आणि राजस्थानमध्ये मशरूम स्पॉनचा तुटवडा असल्याचे त्याला दिसून आले.

त्यामुळे नुसती मशरूम लागवड करण्यापेक्षा तिची बीजोत्पादन करण्यामध्ये जास्त पैसा मिळेल या उद्दिष्टने त्याने मशरूम स्पॉन निर्मिती करण्याचे ठरवले. 2013 मध्ये शंकर मीना यांनी पहिले सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर एमबीए सोडले होते. त्यामुळे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी नऊ लाखांचे कर्ज घेऊन नऊ हजार स्क्वेअर फुटांमध्ये मशरूम  पिकवायला सुरुवात केली व 2017 पर्यंत त्याने जीवन मशरूम चा पाया घातला.

आज ही कंपनी बटन,ऑईस्टर तसेच शिताके आणि गणोडर्मा सारख्या मशरूमची विक्री करते. शंकरने या व्यवसायामध्ये खूप मोठी बाजारपेठ निर्माण केली आहे व तसेच तो भूतान तसेच नेपाळ आणि अमेरिकेत देखील मशरूम पाठवतो. विशेष म्हणजे या व्यवसायातून त्याला दरमहा बारा लाख रुपये मिळतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe