जर आपण दमदार बाईक आणि स्टायलिश लुकच्या बाबतीत बघितले तर रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० किंवा रॉयल एनफिल्डच्या बाईक्सना मोठ्या प्रमाणावर पसंती देतो. रॉयल एनफिल्ड्स बाईक्सची क्रेझ हे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते व त्यामुळे रॉयल एनफिल्डच्या बाईक्स खरेदी करण्याला मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते.
या बाईकचा लुक आणि मजबूत इंजिन खूप प्रसिद्ध असून शहरापासून ते गावापर्यंत रॉयल एनफिल्डच्या बुलेट आपल्याला सगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. परंतु बुलेट व्यतिरिक्त जर तुम्हाला मजबूत आणि दमदार इंजिन आणि आकर्षक लूक असलेल्या बाईक हव्या असतील तर बाईक बाजारपेठेत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अशाच बाईकची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

या बाईक्स घ्याल तर बुलेटला विसराल
1- टीव्हीएस रोनीन स्पेशल एडिशन– बुलेट व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणतीही बाईक खरेदी करायची असेल तर तुम्ही टीव्हीएस क्रूजर बाईक टीव्हीएस रोनीन स्पेशल एडिशन खरेदी करू शकतात. या बाईकची एक्स शोरूम किंमत एक लाख 72 हजार सातशे रुपये असून ही बाईक तिच्या दमदार वैशिष्ट्ये आणि उत्तम पॉवर ट्रेन साठी ओळखले जाते.
या बाईकमध्ये 225.9cc सिंगल सिलेंडर ऑइल कुल्ड इंजिन मिळते. जे 20.1 बीएचपी पावर आणि 19.93 एनएम टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशनसाठी या बाईकमध्ये पाच स्पीड गिअर बॉक्स आहे जो असिस्ट आणि स्लीपर क्लचला जोडलेला आहे.
2- हिरो मॅवरिक 440- तुम्ही रॉयल एनफिल्ड क्लासिक ऐवजी हिरो मेव्हरिक 440 बाईक खरेदी करू शकतात व या एंट्री लेव्हल व्हेरियंटची किंमत एक लाख 99 हजार रुपये असून या बाईकचे टॉप एंड वेरीएंटची किंमत दोन लाख 24 हजार रुपये आहे.
हिरोच्या या स्पेशल बाईकमध्ये 440cc ऑइल एअर कुल्ड इंजिन असून जे 26 बीएचपीची कमाल पावर आणि 37 nm चा पिक टॉर्क जनरेट करते.
3- हिरो H’ness CB 350- बुलेट ऐवजी तुम्ही होंडाची ही तिसरी बाईक खरेदी करू शकतात. या बाईकची किंमत दोन लाख रुपयांपासून सुरू होते व या बाईकमध्ये 348.36cc एअर कुल्ड चार स्ट्रोक सिंगल सिलेंडर इंजिन मिळते. हे इंजिन 5500 आरपीएम वर 20.7 एचपी पावर आणि तीन हजार पीएम वर 29.4 एनएम टॉर्क जनरेट करते.