Share Market Update: शेअर बाजाराची स्थिती बघितली तर जागतिक बाजारातून चांगले आणि मजबूत संकेत मिळत असून त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे.
तसेच देशांतर्गत कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल देखील येत असल्याने या निकालानंतर अनेक शेअर्स दीर्घ कालावधीसाठी गुंतवणुकी करिता आकर्षक होताना दिसून येत आहेत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म शेअरखानने पुढील एक वर्ष कालावधीच्या दृष्टिकोनातून मजबूत मूलभूत तत्वांसह पाच शेअर्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या पाचही शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदारांना 20 टक्क्यांपर्यंत चांगला परतावा मिळू शकतो.
ब्रोकरेज फार्म शेअरखानने दिवाळीमध्ये हे पाच शेअर्स खरेदी करण्याचा दिला आहे सल्ला
1- ॲक्सिस बँक– ब्रोकरेज फर्म शेअर खानने ॲक्सिस बँकवर खरेदी करण्याचा सल्ला दिला असून याकरिता प्रतिशेअर्स चौदाशे रुपये टारगेट प्राईज देण्यात आली असून 18 ऑक्टोबर 2024 रोजी ॲक्सिस बँक शेअरची किंमत बघितली तर ती 1196 रुपयांवर स्थिरावली होती.अशाप्रकारे सध्याच्या किमतीवर गुंतवणूकदारांना पुढील एका वर्षांमध्ये 17 टक्क्यांचा परतावा मिळू शकतो.
2- इस्जेक हेवी– तसेच ब्रोकरेज फार्म शेअर खानने इस्जेक हेवी वर खरेदी करण्याचा सल्ला दिला असून याकरिता प्रति शेअर 1700 रुपये टारगेट प्राईज ठेवण्यात आली असून 18 ऑक्टोबर 2024 रोजी याची किंमत 1435 रुपये स्थिरावली होती.
याप्रकारे जर सध्याच्या किमतीनुसार बघितले तर गुंतवणूकदारांना पुढील एका वर्षात 18 टक्क्यांचा चांगला परतावा मिळू शकतो.
3- नेसले इंडिया– नेसले इंडियावर खरेदी करण्याचा सल्ला ब्रोकरेज फर्म शेअर खानने दिला असून याकरिता प्रति शेअर 2681 रुपये टारगेट प्राईज देण्यात आली आहे.
18 ऑक्टोबर रोजी या शेअरची किंमत 2350 रुपयांवर स्थिरावली होती व या किमतीनुसार आता गुंतवणूक केली तर गुंतवणूकदारांना पुढील एका वर्षात 14 टक्क्यांचा उत्कृष्ट परतावा मिळू शकतो.
4- इन्फोसिस– इन्फोसिस वर खरेदी करण्याचा सल्ला प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म शेअर खानने दिला असून या प्रति शेअर 2270 रुपये टार्गेट प्राईज देण्यात आली आहे.
18 ऑक्टोबर 2024 रोजी या शेअरची किंमत 1885 वर स्थिरावली होती. अशाप्रकारे या किमतीवर जर गुंतवणूकदारांनी शेअर्स खरेदी केले तर पुढील एका वर्षात 20 टक्क्यांचा परतावा मिळू शकतो.
5- भारतीय हॉटेल्स( इंडियन हॉटेल्स)- इंडियन हॉटेल्स वर देखील खरेदी करण्याचा सल्ला ब्रोकरेज फर्म शेअर खानने दिला असून याकरिता प्रतिशेअर 774 रुपये टार्गेट प्राईज देण्यात आली आहे.
18 नोव्हेंबरला या शेअरची किंमत 686 रुपयांवर स्थिरावली होती. अशाप्रकारे सध्याच्या किमतीवर गुंतवणूकदारांना पुढील एका वर्षात 13% चा परतावा मिळू शकतो.
(टीप– वरील माहिती ही वाचकांसाठी माहितीस्तव सादर करण्यात आलेली आहे. कुठल्याही पद्धतीची गुंतवणूक करायची असेल तर गुंतवणूक तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.)