सोन्या-चांदीची आजच केलेली खरेदी ठरेल फायद्याची! लग्नसराईत पुन्हा भाव वाढण्याची शक्यता; वाचा आजचे सोने व चांदीचे दर

लग्नसराईचा कालावधी असल्यामुळे सोने व चांदीच्या मागणीत वाढ होईल व त्यामुळे दर वाढतील अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे. आपण जर गेल्या महिन्याभरापूर्वीचा विचार केला तर 81 हजार रुपये प्रति तोळा म्हणजेच दहा ग्रॅम असे सोन्याचे दर होते व मध्यंतरीच्या कालावधीमध्ये ते घसरून 75000 पर्यंत आले होते.

Ajay Patil
Published:
gold rate

Gold-Silver Rate Today:- गेल्या काही दिवसांपासून जर आपण बघितले तर सोने-चांदीच्या दरामध्ये वाढ झाल्याचे आपण बघितले व त्यानंतर थोड्याफार प्रमाणामध्ये चढ-उतार देखील पाहायला मिळत आहे. जेव्हा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता त्यावेळी सोन्यावरील आयात शुल्कात घट केली होती व त्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणावर घसरण पाहायला मिळाली होती व त्यानंतर मात्र परत सोन्याने एकदा वाढीकडे वाटचाल सुरू केली व कमी अधिक प्रकारे आतापर्यंत ही वाढ अशी सुरू आहे.

तसेच आता लग्नसराईचा कालावधी असल्यामुळे सोने व चांदीच्या मागणीत वाढ होईल व त्यामुळे दर वाढतील अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे. आपण जर गेल्या महिन्याभरापूर्वीचा विचार केला तर 81 हजार रुपये प्रति तोळा म्हणजेच दहा ग्रॅम असे सोन्याचे दर होते व मध्यंतरीच्या कालावधीमध्ये ते घसरून 75000 पर्यंत आले होते.

परंतु आता परत 80 हजाराच्या आसपास वाटचाल दिसून येत असून लग्नसराईच्या कालावधीत सोन्याने चांगलाच घाम फोडल्याचे सध्या दिसून येत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पटलावर घडणाऱ्या काही घडामोडी देखील सोन्याच्या दरावर परिणाम करत असल्यामुळे ही सगळी दरवाढ होत असल्याचे या क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे.

जर आपण जागतिक पातळीवर विचार केला तर प्रमुख मार्केट ट्रेडिंग प्लेटफॉर्म म्हणून ओळखले जाणारे लंडन बुलियन मार्केट प्रामुख्याने सोन्याच्या किमती ठरवत असते व अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे अवमूल्यन, आयात शुल्क व काही देशांमध्ये असलेली युद्धजन्य परिस्थिती इत्यादी कारणे सोन्याच्या दरावर परिणाम करतात.

उदाहरणच घ्यायचे झाले तर जेव्हा अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक झाली व यामध्ये डोनाल्ड ट्रम्प जिंकले व अमेरिकन फेडरल बँकेच्या व्याजदरात बदल झाला. तेव्हा सोन्याच्या दरात या सगळ्या गोष्टींचे परिणाम आपल्याला पाहायला मिळालेत. या सगळ्या परिस्थितीमुळे सोन्याच्या दरात प्रति तोळा 1500 रुपयांनी घसरण झाली होती.

तसेच जर आपण भारतीय परिस्थितीचा विचार केला तर लग्नसराई किंवा सणासुदीच्या हंगामात देखील सोन्याचे दर वाढतात. आता लग्नसराईच्या कालावधी असल्यामुळे सोने चांदीच्या मागणीत वाढ होईल व दर वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.त्यामुळे सोने चांदीच्या दरात कधी चढ तर कधी घसरण अशी सद्यस्थिती दिसून येत आहे.

काय आहेत आजचे सोने आणि चांदीचे दर?
जर आपण 26 नोव्हेंबर 2024 म्हणजेच आजचे महाराष्ट्रातील सोन्याचे दर पाहिले तर यामध्ये कालच्या तुलनेत काहीशी घट झाल्याचे दिसून येत आहे. आज जर सोन्याचे दर बघितले तर ते 24 कॅरेट सोने प्रति दहा ग्राम म्हणजेच एक तोळ्याची किंमत साधारणपणे 78,550 रुपये इतकी असून एक ग्रॅम 24 कॅरेट सोने 7855 पर्यंत आज मिळत आहे.

म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे एक ग्रॅम 24 कॅरेट सोने खरेदी करायचे असेल तर 7855 रुपये आज मोजावे लागणार आहेत. त्यासोबतच आज 22 कॅरेटच्या दहा ग्रॅम म्हणजेच एक तोळा सोन्याची किंमत 72 हजार रुपये इतकी आहे. म्हणजेच तुम्हाला जर 22 कॅरेटचे एक ग्रॅम सोने घ्यायचे असेल तर तुम्हाला आज 7200 रुपये मोजावे लागणार आहेत.

काय आहेत आजचे चांदीचे दर?
त्यासोबतच आज म्हणजे 26 नोव्हेंबर 2024 ची चांदीची किंमत जर बघितली तर ती जरा वाढलेली असून एक किलोग्रॅम चांदीचा दर हा 91 हजार 500 रुपये प्रति किलो इतका आहे.

म्हणजेच तुम्हाला जर शंभर ग्राम चांदी खरेदी करायची असेल तर त्याकरिता तुम्हाला नऊ हजार एकशे पन्नास रुपये व एक ग्रॅम चांदी करिता साधारणपणे 91.5 रुपये मोजावे लागणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe