पोस्टाच्या ‘या’ योजनेत 5 पाच लाख रुपये गुंतवून मिळेल 15 लाखापेक्षा जास्त रक्कम! कशी करावी लागेल प्लॅनिंग? जाणून घ्या माहिती

पोस्ट ऑफिस देखील फिक्स डिपॉझिट योजना चालवते व या माध्यमातून देखील गुंतवणुकीवर खूप मोठा परतावा मिळवता येणे शक्य आहे. जर आपण पोस्ट ऑफिसची पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना बघितली तर ही योजना देखील खूप फायद्याची असून यामध्ये तुमचे रक्कम तीन पटीने वाढू शकते व अधिकचा परतावा तुम्हाला मिळवता येणे शक्य होते.

Published on -

Post Office FD Scheme:- पोस्ट ऑफिस आणि बँकांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या आकर्षक अश्या गुंतवणूक योजना राबवल्या जातात व अशा योजना या गुंतवणुकीची सुरक्षितता आणि मिळणारा परताव्याच्या दृष्टिकोनातून खूपच फायद्याच्या ठरतात.

त्यामुळे बऱ्याच गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस आणि बँकांच्या योजनांना प्राधान्य देताना आपल्याला दिसून येतात. फिक्स डिपॉझिट अर्थात एफडी योजनांच्या बाबतीत जर आपण बघितले तर यामध्ये बँकांच्या माध्यमातून आकर्षक अशा एफडी योजना चालवल्या जातात.

परंतु पोस्ट ऑफिस देखील फिक्स डिपॉझिट योजना चालवते व या माध्यमातून देखील गुंतवणुकीवर खूप मोठा परतावा मिळवता येणे शक्य आहे. जर आपण पोस्ट ऑफिसची पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना बघितली तर ही योजना देखील खूप फायद्याची असून यामध्ये तुमचे रक्कम तीन पटीने वाढू शकते व अधिकचा परतावा तुम्हाला मिळवता येणे शक्य होते.

पोस्ट ऑफिस फिक्स डिपॉझिट योजनेचे स्वरूप कसे आहे?
पोस्ट ऑफिसची ही एक महत्त्वाची योजना असून या फिक्स डिपॉझिट योजनेमध्ये गुंतवणूकदारांना एक, दोन तसेच तीन आणि पाच वर्षांकरिता गुंतवणूक करता येते. सध्या जर आपण या योजनेत मिळणारे व्याजदर पाहिले तर ते कालावधीनुसार वेगवेगळे आहेत. यामध्ये

एक वर्षाच्या कालावधी करिता 6.9% इतका व्याजदर दिला जात आहे.

दोन वर्षाच्या एफडीवर सात टक्के इतका व्याजदर दिला जात आहे.

तीन वर्षाच्या एफडीवर 7.01 टक्के इतका व्याजदर दिला जात आहे.

पाच वर्षाच्या एफडीवर 7.5% इतका व्याजदर दिला जात आहे.

या योजनेत गुंतवलेल्या पाच लाखाचे पंधरा लाख कसे होतात?
तुम्हाला जर पाच लाख रुपयांची गुंतवणूक करायची असेल व तुमची ही पाच लाखाची गुंतवणूक जर 15 लाखाच्या पुढे तुम्हाला वाढवायची असेल तर त्याकरिता तुम्हाला प्रथम पाच वर्षांकरिता पाच लाख रुपये या एफडीमध्ये गुंतवावे लागतील.त्यानंतर एफडी योजना तुम्हाला दोन वेळा पाच-पाच वर्षांकरिता वाढवावी लागेल.

अशा पद्धतीने तुमची गुंतवणूक पंधरा वर्षापर्यंत सुरू राहते. समजा तुम्ही पाच लाख रुपयांची एफडी केली व पहिल्या पाच वर्षात 7.5% व्याजदराने तुम्हाला दोन लाख 24 हजार 974 रुपये परतावा मिळेल आणि तुमची एकूण रक्कम सात लाख 24 हजार 974 रुपये होते.

परंतु तुम्ही पुढील पाच वर्षांकरिता या योजनेचा कालावधी वाढवला तर ही रक्कम एक्सटेंड होते व तुम्हाला एकूण सात लाख 24 हजार 974 रुपयाच्या रकमेवर व्याज मिळते व ते व्याज 3,26,2001 रुपये मिळते.

अशाप्रकारे तुमची एकूण रक्कम दहा लाख 51 हजार 175 रुपये होते. त्यानंतर पुन्हा पाच वर्षांकरिता तुम्ही ही योजना वाढवली तर तुम्हाला एकूण रकमेवर चार लाख 72 हजार 974 रुपये व्याज मिळते आणि तुमची शेवटची मॅच्युरिटी रक्कम तुम्हाला 15 लाख 24 हजार 119 रुपये मिळतात.

या एफडी योजनेची मुदत वाढवण्याचे काय आहेत नियम?
एक वर्षाची एफडी मॅच्युरिटी झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत वाढवता येते. तसेच दोन वर्षाची एफडी बारा महिन्यांच्या आत आणि तीन व पाच वर्षांची एफडी 18 महिन्याच्या आत एक्सटेंड करता येते. तसेच खाते उघडताना सुद्धा मॅच्युरिटी नंतर एक्सटेशनची विनंती तुम्ही करू शकतात.

योजना एक्सटेंड केल्यावर व्याजदर किती मिळतो?
यामध्ये एक्सटेंड केलेल्या खात्यावर मॅच्युरिटीच्या दिवशी लागू असलेल्या व्याजदरानुसारच व्याज तुम्हाला मिळते. म्हणजेच जर पाच वर्षांसाठी 7.5 टक्के व्याजदर निश्चित असेल तर योजना एक्सटेंड केल्यावर देखील त्याच व्याजदराने तुम्हाला परतावा मिळतो.तसेच पुढे चालून व्याजदरात बदल झाले तरी तुमच्या एफडीवर त्याचा परिणाम होत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe