जोडीदाराला भूत, पिशाच म्हणणे क्रूरता नाही – पाटणा हायकोर्ट

Ahmednagarlive24 office
Published:
Marathi News

Marathi News : विभक्त झालेल्या जोडप्याद्वारे एकमेकांविरोधात शिवराळ भाषेचा वापर करणे आणि एकमेकांना भूत, पिशाच्च म्हणणे हे क्रूरता ठरत नाही, असे निरीक्षण पाटणा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात नोंदवले.

बिहारमधील एका महिलेने १९९४ साली पती व सासरच्या मंडळीविरोधात शिवीगाळ आणि हुंड्याच्या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप लावत खटला दाखल केला होता.

बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील न्यायालयाने या प्रकरणात पती आणि त्याच्या वडिलांना एक वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. शेजारच्या झारखंडमधील पती आणि त्याच्या वडिलांनी या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

न्यायमूर्ती बिबेक चौधरी यांच्या एकल खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. या वेळी वकिलांनी महिलेला तिच्या सासरच्या मंडळीने ‘भूत आणि ‘पिशाच्च’ म्हणणे हे क्रूरतेचे एक स्वरूप असल्याचा युक्तिवाद केला.

पण खंडपीठाने हा युक्तिवाद स्वीकार करण्यास नकार दिला. अयशस्वी वैवाहिक संबंधामध्ये पती आणि पत्नीने घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे असे शिवीगाळीचे प्रकार क्रूरतेच्या कक्षेत येणार नसल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe