कॅनरा बँकेच्या 10 वर्षांच्या एफडी योजनेत 10 लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?

फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करायची आहे का? मग आजची बातमी तुमच्या कामाचे राहणार आहे. कारण की आज आपण कॅमेरा बँकेच्या मुदत ठेव योजनेची माहिती पाहणार आहोत. आज आपण कॅनरा बँकेच्या 10 वर्षांच्या मुदत ठेव योजनेची डिटेल माहिती जाणून घेऊयात.

Published on -

Canara Bank FD Scheme : तुम्हालाही फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा गुंतवायचा आहे का मग आजची बातमी तुमच्याच कामाचे आहे कारण की आज आपण कॅनरा बँकेच्या एफ डी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. खरंतर आरबीआय कडून अलीकडेच रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे.

आरबीआय ने मागील आठवड्यात रेपो रेटमध्ये तब्बल 0.50 टक्क्यांची कपात केली आणि याचा फटका एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना बसतोय. कारण की बँकांकडून आता एफडीच्या व्याज दरात मोठ्या प्रमाणात कपात सुरू करण्यात आली आहे.

एसबीआय एसबीआय बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा त्याचप्रमाणे कॅनरा बँकेकडूनही एफडीच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे.

तथापि कॅनरा बँकेची दहा वर्षांची एफडी योजना ग्राहकांना चांगला परतावा देताना दिसते आणि म्हणूनच आज आपण कॅनरा बँकेच्या या लॉंग टर्म एफडी योजनेची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

कशी आहे कॅनरा बँकेची 10 वर्षांची एफडी योजना?

बँकेकडून प्राप्त झालेल्या माहीतीनुसार कॅनरा बँकेची दहा वर्षांची एफडी योजना गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देतांना दिसत आहे. कॅनरा बँकेच्या दहा वर्षांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सध्या स्थितीला 6.50% दराने रिटर्न दिले जात आहेत.

हे व्याजदर 60 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या ग्राहकांसाठी लागू आहे मात्र ज्या लोकांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे अशा ज्येष्ठ नागरिक ग्राहकांसाठी दहा वर्ष कालावधीच्या एफडी योजनेसाठी सात टक्के दराने व्याज दिले जात आहे.

दरम्यान, आता आपण या कॅनरा बँकेच्या लॉन्ग टर्म एफडी योजनेमध्ये दहा लाखांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना किती रिटर्न मिळणार याचा आढावा घेणार आहोत.

दहा लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?

कॅनरा बँकेच्या दहा वर्षांच्या एफडी योजनेत जर साठ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या सामान्य ग्राहकांनी दहा लाखांची गुंतवणूक केले तर त्यांना मॅच्युरिटी वर म्हणजेच दहा वर्षांचा काळ पूर्ण झाल्यानंतर 19 लाख 5 हजार 559 मिळणार आहेत म्हणजेच तब्बल 9 लाख 5 हजार 559 रुपये व्यास स्वरूपात मिळतील.

तसेच जर या बँकेच्या 10 वर्षांच्या एफडी योजनेत 15 लाखाची गुंतवणूक करण्यात आली तर गुंतवणूकदारांना मॅच्युरिटी वर 28 लाख 58 हजार 338 रुपये मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!