Car Loan Interest Rate:- सणासुदीचा कालावधी आता जवळ येऊन ठेपला असून या कालावधीमध्ये अनेक जण नवीन वाहने खरेदी करतात. सणासुदीच्या कालावधीमध्ये शुभ मुहूर्त असल्यामुळे वाहने खरेदी करण्याची परंपरा भारतात गेल्या कित्येक वर्षांपासून असून त्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर वाहने खरेदी केली जातात.
यामध्ये बाईक आणि कार घेण्याचे प्रमाण प्रामुख्याने आपल्याला जास्त दिसून येते. समजा तुम्हाला देखील या कालावधीमध्ये तुमच्या घरासमोर नवी करकरीत चारचाकी आणायची असेल आणि या कारसाठी तुम्हाला जर बँकेकडून लोन घेण्याची प्लॅनिंग असेल तर ते देखील आता सोपे झाले आहे.

आता विविध बँकांच्या माध्यमातून आकर्षक अशा व्याजदरांमध्ये कारलोन उपलब्ध करून दिले जाते. परंतु कारलोन घेताना मात्र त्या लोनवर आकारण्यात येणारा व्याजाचा दर नेमका किती आहे? हे पाहून निर्णय घेणे खूप गरजेचे असते. कारण लोन घेतले म्हणजे त्याचा हप्ता आपल्याला भरावा लागतो व व्याजदराचा या हप्त्यावर खूप मोठा परिणाम होत असतो.
व्याजदर जर जास्त असेल तर आपल्याला ईएमआय जास्त भरावा लागतो. त्यामुळे कमीत कमी व्याजदरात बँकेकडून आपल्याला कार लोन मिळेल त्या ठिकाणहून कार लोन घेणे फायद्याचे ठरते.
त्यामुळे या लेखामध्ये आपण देशातील कुठल्या बँकेच्या माध्यमातून कार लोन वर किती व्याजदर आकारला जातो व तुम्ही जर दहा लाख रुपयांचे कारलोन केले तर प्रत्येक महिन्याला त्या कर्जाचा किती हप्ता भरावा लागेल? त्याबद्दलचे महत्त्वाची माहिती बघू.
देशातील प्रमुख बँकांचे कार लोन वरील व्याजदर
1- बँक ऑफ इंडिया– तुम्ही जर बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून कार लोन घेतले तर बँकेकडून यावर 8.85% व्याजदर आकारला जातो. बँक ऑफ इंडिया कडून तुम्ही चार वर्षांकरिता दहा लाख रुपयांचे कार लोन घेतले तर साधारणपणे दरमहा 24 हजार 632 रुपयांचा मासिक ईएमआय भरावा लागू शकतो.
2- एचडीएफसी बँक– एचडीएफसी बँकेकडून जर कार लोन घेतले तर या बँकेच्या माध्यमातून कार लोन वर 9.40% व्याजदर आकारला जातो. एचडीएफसी बँकेकडून चार वर्षांकरिता दहा लाख रुपयांचे कार लोन केले तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 24881 रुपयांचा मासिक ईएमआय भरावा लागेल.
3- आयसीआयसीआय बँक– आयसीआयसीआय बँकेकडून जर तुम्ही कार लोन घेतले तर या बँकेकडून 9.10% इतका व्याजदर आकारला जातो व चार वर्षं करिता दहा लाख रुपयांचे कार लोन घेतले तर त्यावर 24 हजार 745 रुपये ईएमआय तुम्हाला भरावा लागेल.
4- युनियन बँक ऑफ इंडिया– युनियन बँकेकडून कार लोन जर घेतले तर ही बँक 8.70% व्याजदर आकारत असून चार वर्षांकरिता जर दहा लाख रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 24 हजार पाचशे पासष्ठ रुपये ईएमआय द्यावा लागू शकतो.
5- बँक ऑफ बडोदा– तुम्ही जर बँक ऑफ बडोदा कडून कार लोन घेतले तर बँक यावर 8.90% व्याजदराने व्याज आकारते व चार वर्षांकरिता दहा लाख रुपये कारलोन घेतले तर ईएमआय 24655 रुपये असू शकतो.
6- स्टेट बँक ऑफ इंडिया– एसबीआयच्या माध्यमातून जर कारलोन घेतले तर ही बँक कार लोन वर 8.75 टक्के दराने व्याज आकारते व चार वर्षांकरिता दहा लाख रुपयांचे कार लोन घेतले तर त्यावर 24 हजार 587 रुपये इतका ईएमआय भरावा लागू शकतो.