Car Mileage Tips: फक्त ‘या’ छोट्या गोष्टींवर लक्ष द्या! वाढेल तुमच्या कारचे मायलेज आणि वाचेल मोठ्या प्रमाणात पैसा

Published on -

Car Mileage Tips:- कुठल्याही वाहनाच्या बाबतीत बघितले तर मायलेज  ही संकल्पना इतकी महत्त्वाची आहे की तिचा प्रत्यक्ष संबंध हा माणसाच्या खिशाशी म्हणजेच पैशांशी येत असतो. कारण आजकालच्या पेट्रोल आणि डिझेलचे वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर वाहनांचे मायलेज उत्तम असणे खूप गरजेचे असते.

नाहीतर आपण इंधन टाकीत पेट्रोल किंवा डिझेल भरून भरून त्रस्त होतो व त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा देखील खर्च होत असतो. त्यामुळे मायलेजवर लक्ष देणे खूप गरजेचे असते. याकरिता वाहन घेताना देखील संबंधित वाहनाचे मायलेज किती आहे किंवा ते मायलेज किती देते यासंबंधी अगोदर चौकशी करूनच वाहन खरेदी करण्याचा निर्णय प्रामुख्याने घेतला जातो.

परंतु मायलेजच्या बाबतीत जर आपण बघितले तर तुमच्याकडे जर कार असेल व ती चांगला मायलेज देत नसेल तर तुम्ही अगदी छोट्या छोट्या टिप्स किंवा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले तरी तुमच्या कारच्या मायलेजमध्ये तुम्ही वाढ करू शकतात. नेमके या टिप्स कोणत्या आहेत? याबाबतची माहिती या लेखात बघू.

 या छोट्या टिप्स वापरा आणि कारचे मायलेज वाढवा

1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कारच्या कंपनीच्या टायरचा वापर करा जेव्हा आपण कार वापरत असतो तेव्हा कालांतराने तिचे टायर खराब होतात टायर बदलवतो तेव्हा कुठल्याही कंपनीचे टायर टाकून मोकळे होतो.

परंतु असे न करता कारचा टायर खराब होईल तेव्हा केवळ कार जी कंपनीची आहे त्याच कंपनीचे टायर लावणे गरजेचे आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे कधी कधी इतर टायर कारच्या टायरच्या आकारापेक्षा जास्त असतात आणि त्याचा थेट विपरीत परिणाम कारच्या मायलेज वर होतो.

2- कारवरील रूफ रेल आपल्याला माहित आहे की  कारवर रूफ रेल असते. यावरून लोक प्रवास करत असताना सर्व सामान घेऊन जातात. बऱ्याचदा छोटी कार असते तरी देखील त्यावर रूफ रेल लावली जाते व त्यामुळे देखील कारच्या मायलेज वर परिणाम होतो. त्यामुळे या बाबतीत देखील काळजी घ्यावी.

3- गाडीमध्ये वजनदार वस्तू ठेवू नये बऱ्याचदा कारमध्ये नको त्या जड वस्तू ठेवल्या जातात. असे केल्याने जास्त वजनामुळे इंधनच्या कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या कारमध्ये जर अनावश्यक जड वस्तू असतील तर त्या काढून टाकाव्यात.

4- टायरचा दाब नियमित ठेवावा सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वाहन चालवत असताना कारच्या टायरमधील हवेचा दाब तपासत राहणे खूप गरजेचे आहे. टायर मधील दाब हा कायम योग्य प्रमाणात ठेवणे गरजेचे आहे व तरच गाडी चांगली मायलेज देते.

5- कारचा वेग नियंत्रणात ठेवावा ही टिप्स देखील मायलेज वाढीच्या बाबतीत खूप महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर कारने चांगला मायलेज द्यायला हवा तर तुम्ही तुमची कार वेगात चालवण्याचा प्रयत्न न करता ती नियंत्रित वेगात चालवावी व त्यामुळे मायलेज चांगले मिळते. वेगाने कार चालवली तर मायलेज कमी होतो.

6- ट्रॅफिक टाळावी प्रवास करत असताना ज्या ठिकाणी रहदारी असेल असा मार्ग जर टाळणे शक्य असेल तर तो टाळावा. रहदारी म्हणजे ट्रॅफिकमध्ये गाडी चालवल्याने मायलेज कमी होऊ लागते.

कारण ट्रॅफिक मध्ये प्रत्येक वेळी क्लचचा वापर होत असल्यामुळे गाडीचा मायलेज वर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे जर तुम्ही घरून निघतानाच गुगल मॅपचा वापर केला व त्यानुसार ट्रॅफिक नसलेल्या मार्गाने प्रवास केला तर कार चांगला मायलेज देते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News