Career Tips: 12 वी नंतर करा ‘हे’ डिप्लोमा कोर्स आणि कमी वयात कमवायला लागा पैसे! रहाल स्वतःच्या पायावर उभे

बरेच विद्यार्थी हे बारावी नंतर डिग्रीला ऍडमिशन न देता एखादा डिप्लोमा करून पटकन नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात. आजकालच्या महागाईच्या कालावधीमध्ये कमी वयात आपल्याला पैसे कमावण्याची समज येणे खूप गरजेचे आहे

Published on -

Career Tips:- बारावी हे करिअरच्या दृष्टिकोनातून खूप त्याच्याशी शैक्षणिक वर्ष असून याला करिअरच्या दृष्टिकोनातून एक टर्निंग पॉईंट देखील म्हटले जाते. बारावीनंतर बरेच जण उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेत असतात व उच्च शिक्षणाची तयारी किंवा भविष्यातील करिअरच्या दृष्टिकोनातून बारावी खूप महत्त्वाचे असे शैक्षणिक वर्ष असते.

परंतु बरेच विद्यार्थी हे बारावी नंतर डिग्रीला ऍडमिशन न देता एखादा डिप्लोमा करून पटकन नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात. आजकालच्या महागाईच्या कालावधीमध्ये कमी वयात आपल्याला पैसे कमावण्याची समज येणे खूप गरजेचे आहे व त्या दृष्टिकोनातून बारावी नंतर डिप्लोमा कोर्सेसला ऍडमिशन घेणे हा निर्णय फायद्याचा ठरू शकतो.

बारावीनंतर असे अनेक डिप्लोमा कोर्स आहेत जे चांगल्या पगाराची नोकरीची हमी देतात. पण अशा कोर्सेसला प्रवेश घेऊन तुम्ही तुमचे करिअर चांगल्या पद्धतीने सेट करू शकतात.

त्यामुळे तुम्हाला देखील जर बारावीनंतर डिप्लोमा कोर्स करून कमी वयात चांगल्या पगाराची नोकरी मिळवायची असेल तर या लेखामध्ये आपण काही डिप्लोमा अभ्यासक्रमांची माहिती दिलेली आहे. जी विद्यार्थ्यांना फायद्याची ठरू शकते.

 बारावीनंतर हे आहेत महत्त्वाचे डिप्लोमा कोर्स

1- अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान यामध्ये पॉलिटेक्निक डिप्लोमा, डिप्लोमा इन कॅम्पुटर सायन्स, डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन आणि डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग या कोर्सेसचा समावेश होतो.

2- मॅनेजमेंट अँड बिझनेस यामध्ये डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट, डिप्लोमा इन मार्केटिंग मॅनेजमेंट, डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि डिप्लोमा इन फायनान्स मॅनेजमेंट या डिप्लोमा कोर्सेसचा यात समावेश होतो.

3- हेल्थकेअर आणि मेडिकल यामध्ये नर्सीगमध्ये डिप्लोमा, फार्मसीमध्ये डिप्लोमा, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा आणि डिप्लोमा इन हेल्थकेअर मॅनेजमेंट इत्यादी डिप्लोमा कोर्सेसचा यामध्ये समावेश होतो.

4- कला आणि डिझाईन यामध्ये डिप्लोमा इन फॅशन डिझाईनिंग, डिप्लोमा इन ग्राफिक डिझायनिंग, डिप्लोमा इन इंटिरियर डिझाईनिंग आणि डिप्लोमा इन फोटोग्राफी या डिप्लोमा कोर्सेसचा समावेश होतो.

5- हॉस्पिटलिटी आणि टुरिझमहॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा, टुरिझम मॅनेजमेंट तसेच फूड अँड बेवरेज मॅनेजमेंट आणि इव्हेंट मॅनेजमेंट मधील डिप्लोमा कोर्सेसचा समावेश होतो.

6- या व्यतिरिक्त तुम्ही पत्रकारीतेमध्ये डिप्लोमा करू शकतात किंवा मास कम्युनिकेशन डिप्लोमा आणि डिप्लोमा इन सोशल वर्कमध्ये देखील डिप्लोमा पूर्ण करून चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकतात.

साधारणपणे या सगळ्या पदविका अभ्यासक्रमांचा कालावधी एक ते तीन वर्षांचा असतो व हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला चांगल्या नोकरीच्या संधी मिळून चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!