Cheapest Bike: ‘या’ ठिकाणी मिळतील तुम्हाला अगदी स्वस्तामध्ये बाईक्स आणि स्कूटर; 35 हजारमध्ये मिळेल तुम्हाला 65 किमी मायलेज देणारी बाईक

Ajay Patil
Published:
second hand bike

Cheapest Bike:- प्रत्येकाला स्वतःची बाईक्स किंवा स्कूटर घेण्याची इच्छा असते. परंतु तुम्ही नवीन बाईक किंवा स्कूटर घ्यायला गेला तर त्याकरिता तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर पैसा मोजावा लागतो. जरी भारत जगातील सर्वात मोठी दुचाकी वाहनांची बाजारपेठ असली तरी या ठिकाणी बऱ्याच सेगमेंटमधील बाईकच्या किमती खूप जास्त आहेत.

त्यामुळे प्रत्येकालाच बजेटमध्ये बाईक्स किंवा स्कूटर खरेदी करणे शक्य नसते. त्यामुळे बरेच जण सेकंड हॅन्ड वाहन घेण्याकडे वळतात. कारण या ठिकाणी देखील आपल्याला खूप चांगल्या कंडीशन मधील बाईक्स किंवा स्कूटर कमी किमतीत मिळू शकतात.आपल्याला माहित आहे की भारतामध्ये अशाच सेकंड हॅन्ड वाहनांची बाजारपेठ खूप मोठी आहे व या ठिकाणी तुम्हाला अनेक चांगले मायलेज देणारे वाहने कमीत कमी किमतीमध्ये मिळतात.

तसेच अनेक प्लॅटफॉर्म देखील आहेत की या माध्यमातून तुम्ही चांगली सेकंड हॅन्ड वाहने  खरेदी करू शकतात. या अनुषंगाने आपण या लेखामध्ये अशा काही बाईक्स पाहणार आहोत की तुम्हाला त्या कमीत कमी किमतीमध्ये चांगल्या कंडीशनमध्ये असलेल्या मिळतील.

 या बाईक्स मिळतील तुम्हाला कमीत कमी किमतीत

1- बजाज पल्सर बजाज कंपनीची पल्सर ही बाईक सगळ्यांमध्ये खूप पसंतीची अशी बाईक असून ही बाईक तुम्हाला कमीत कमी किमतीत मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ही मोटर सायकल बाईक देखो वर उपलब्ध असून 2011 ची असून 135LS मॉडेल आहे. या बाईकमध्ये 134.6cc चे पावरफुल इंजिन देण्यात आले असून ती पन्नास हजार किलोमीटर धावली आहे.

विशेष म्हणजे ही बाईक फर्स्ट ओनर आहे. ही बाईक पाहिली तर ती 13.56 पीएस पावर आणि हाय स्पीड करिता 11.4 एनएम टॉर्क जनरेट करते. या बाईकमध्ये 65 किलोमीटरचे मायलेज असल्याचा कंपनीचा दावा आहे व या बाईकचे वजन 121 किलो आहे. या बाईकमध्ये डिस्क ब्रेक देण्यात आलेले आहेत. व्हील्स अलॉय प्रकारचे आहेत. ही बाईक 35 हजार रुपयांना या बाजारात उपलब्ध आहे.

2- बजाज सिटी 100- आपल्याला  माहित आहे की बजाज सिटी 100 ही बाईक सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईक पैकी असून मायलेज देखील उत्तम देते. सध्या जी बाईक विक्रीसाठी उपलब्ध आहे ती 2018 चे मॉडेल असून तिची किंमत बत्तीस हजार रुपये इतकी आहे.

ही बाईक आतापर्यंत आठ हजार पाचशे किलोमीटर चालली आहे.बजाज सिटी 100 मध्ये १०२ सीसी इंजिन असून या बाईकला 7.7 पीएस पावर आणि हायस्पीड करिता 8.24 एनएम टॉर्क मिळतो. कंपनी मायलेज बद्दल दावा करते की ही बाईक ८९.५ किलोमीटर पर लिटरचे मायलेज देते.

3- होंडा एक्टिवा 5G- होंडा एक्टिवा 5G हे 2019 चे मॉडेल क्विकर या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या वेबसाईटवर जुन्या दुचाकीची विक्री केली जाते. या ठिकाणी या स्कूटरची किंमत फक्त एकोणवीस हजार पाचशे रुपये आहे व ती आतापर्यंत 8562 किलोमीटर चालली आहे.

 टीप कुठलेही जुने वाहन खरेदी करताना सर्व गोष्टींची तपासणी करून घेणे खूप गरजेचे आहे व यामध्ये कागदपत्रे नीट तपासणी महत्त्वाचे आहे. वाहनांशी संबंधित असलेले जे काही आवश्यक कागदपत्र आहे त्यामध्ये वाहनाचे रजिस्ट्रेशन म्हणजेच आरसी बुक, इन्शुरन्स आणि सर्विस रेकॉर्डची तपासणी करणे गरजेचे आहे. संबंधित वाहनावर कुठल्या प्रकारची तक्रार किंवा केस प्रलंबित तर नाही ना किंवा तिचा अपघात तर झालेला नाही ना इत्यादी गोष्टी तपासून घ्याव्यात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe