Cheapest CNG Car: सीएनजी कार घ्यायची प्लॅनिंग असेल तर ‘हे’ पर्याय ठरतील बेस्ट! कमीत कमी खर्चात देतात जास्तीत जास्त मायलेज

Published on -

Cheapest CNG Car:- पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर कारचा प्रवास हा प्रचंड प्रमाणात महाग झालेला आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांकडे ग्राहकांचा मोठ्या प्रमाणावर कल दिसून येतो. सीएनजी आणि इलेक्ट्रिक कार चालवण्यासाठीचा जो काही खर्च येतो तो खूपच कमी घेतो.

त्यामुळे चांगले मायलेज आणि कमीत कमी खर्चामध्ये जास्त प्रवास करण्यासाठी सीएनजी कार विकत घेण्याकडे ग्राहकांचा कल आपल्याला दिसतो. भारतीय कार बाजारपेठेचा दृष्टिकोनातून बघितले तर अनेक कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळी वैशिष्ट्य असलेल्या सीएनजी कार सादर करण्यात आलेले आहेत.

परंतु त्यातील काही कार्स या कमी खर्चात जास्त मायलेज देणारे व बेस्ट ऑप्शन आहेत. तुम्हाला देखील सीएनजी कार घ्यायचे असेल तर काही महत्वाचे व कमी खर्चात चांगले मायलेज देणाऱ्या सीएनजी कार्सची माहिती या लेखात घेऊ.

या आहेत बेस्ट सीएनजी कार

1- मारुती सुझुकी एस प्रेसो मारुती सुझुकी ही देशातील अग्रगण्य आणि विशेष लोकप्रिय अशी कार उत्पादक कंपनी असून या कंपनीची एस प्रेसो ही स्वस्त सीएनजी कार आहे. हे सीएनजी हॅचबॅक कार 32.73 किलोमीटर पर किलोग्रॅम मायलेज देण्यास सक्षम आहे. या कारची एक्स शोरूम किंमत पाच लाख 91 हजार रुपयापासून सुरू होते.

2- मारुती सुझुकी अल्टो K10 सीएनजी मारुती सुझुकी अल्टो हे स्वस्त मिळणारे सीएनजी कार असून या कारचे मायलेज ते 30.85 किलोमीटर प्रति किलोग्राम इतके मिळू शकते असा कंपनीचा दावा आहे. या कारची किंमत पाहिली तर ती एक्स शोरूम पाच लाख 73 हजार रुपयांपासून सुरू होते.

3- मारुती सुझुकी वॅगनआर सीएनजी मारुती सुझुकीची वॅगन आर ही भारतातील कार बाजारपेठेतील सर्वात विकली जाणारी कार असून या कारचे सीएनजी व्हेरियंट सुद्धा आहे. ही सीएनजी कार 34.05 किलोमीटर प्रति किलोग्राम मायलेज देऊ शकते व या कारची एक्स शोरूम किंमत सहा लाख 44 हजार रुपये आहे.

4- ह्युंदाई ग्रँड i10 Nios- हुंडाई ग्रँड i10 Nios सीएनजी ऑप्शन्स विकत घेता येणे शक्य आहे. या कारच्या सीएनजी व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत सात लाख 68 हजार रुपये आहे. ही कार २५.६१ किलोमीटर प्रति किलोग्राम मायलेज देते.

5- टाटा टियागो iCNG–  वाहन उत्पादक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या टाटा मोटरच्या माध्यमातून देखील सीएनजी कार उत्पादित करण्यात आले असून यामध्ये टाटा टियागो सीएनजी व्हेरियंट ही कार महत्त्वाची असून ते 26.47 किलोमीटर प्रति किलोग्रॅम चे मायलेज देते व या कारची एक्स शोरूम किंमत 8.29 लाख रुपये आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe