आता विमानाने करा नागपूर-छत्रपती संभाजीनगर प्रवास! जुलैच्या ‘या’ तारखेपासून सुरू होत आहे विमानसेवा, वाचा वेळापत्रक

Ajay Patil
Published:
Chhatrapati Sambhajinagar-Nagpur Flight

दोन मोठ्या अंतरामधील प्रवास वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने विमान प्रवासाला प्राधान्य दिले जाते. परंतु विमान प्रवास हा महागडा असल्यामुळे सामान्य नागरिकांना हा परवडत नाही अशी स्थिती होती. परंतु जर आपण गेल्या काही वर्षाचा विचार केला तर अनेक विमान कंपन्यांनी तिकीट दरामध्ये कमालीची कपात केल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना देखील विमानाने प्रवास करता येणे शक्य झाले आहे.

रस्ते आणि रेल्वे मार्गाच्या तुलनेत विमान प्रवास हा वेगाने होणार असल्यामुळे वेळ मोठ्या प्रमाणावर वाचतो. सध्या महाराष्ट्र मधील व महाराष्ट्र बाहेरील शहराच्या दरम्यान विमान सेवा सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे विकासाच्या दृष्टिकोनातून देखील याचा फायदा होताना दिसून येईल.

या दृष्टिकोनातून जर आपण बघितले तर गेल्या काही वर्षांपासून मागणी होत असलेल्या नागपूर ते छत्रपती संभाजीनगर या दोन शहरा दरम्यान विमानसेवा सुरू करण्याची मागणी आता पूर्ण केली जाणार आहे.

कारण आघाडीची विमान कंपनी इंडिगो एअरलाइन्सच्या माध्यमातून येत्या दोन जुलैपासून नागपूर ते छत्रपती संभाजीनगर या दोन शहरा दरम्यान विमानसेवा सुरू केली जाणार आहे.

छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्यातील तर नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी आणि विदर्भातील एक महत्त्वाचे शहर असून महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे दोन्ही शहरे खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या दोन शहरा दरम्यान प्रवासी वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यामुळे या दृष्टिकोनातून ही विमानसेवा खूप फायद्याची ठरणार आहे.

 छत्रपती संभाजीनगरनागपूर विमानसेवा सुरू होण्याचे फायदे

जर आपण छत्रपती संभाजी नगर आणि नागपूर या दोन शहरांमधील प्रवाशांची होणारी ये जा पाहिली तर ती खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आता जर आपण या दोनही शहरादरम्यान होणाऱ्या प्रवासासाठी  असणाऱ्या सुविधा पाहिल्या तर बहुसंख्य प्रवासी खाजगी ट्रॅव्हलचा उपयोग करतात. ट्रॅव्हलच्या माध्यमातून हा प्रवास किमान 12 तासांमध्ये पूर्ण होतो.

खाजगी ट्रॅव्हल्स शिवाय एसटीने देखील मोठ्या प्रमाणावर प्रवासी प्रवास करत असतात व या प्रवासाला देखील बारा ते तेरा तासांचा अवधी लागतो. दुसरे म्हणजे या दोन्ही शहरा दरम्यान थेट रेल्वे सेवा देखील नाही. खूप कमी संख्येने औरंगाबाद येथे काही रेल्वे थांबतात परंतु त्यांच्या माध्यमातून प्रवास करणे सोपे नाही.

कधी कधी खाजगी ट्रॅव्हल्स व बसच्या तुलनेत रेल्वेने प्रवास करायला जास्त कालावधी लागतो. त्यामुळे या सगळ्या समस्या आता या विमानसेवेमुळे दूर होण्यास मदत होणार आहे व विशेष म्हणजे विमानाने हा प्रवास फक्त एक तासात पूर्ण करता येणे शक्य होणार.

 कधी सुरू होईल ही विमानसेवा कसे आहे वेळापत्रक?

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर-नागपूर विमानसेवा इंडिगो एअरलाईच्या माध्यमातून दोन जुलै 2024 पासून सुरू करण्यात येणार आहे व आठवड्यातून मंगळवार, गुरुवार आणि शनिवार ही विमानसेवा उपलब्ध असणार असून याचे वेळापत्रक पाहिले तर यामध्ये फ्लाईट क्रमांक 6ई-7462 हे विमान नागपूरहून सकाळी नऊ वाजून 40 मिनिटांनी उड्डाण करेल आणि छत्रपती संभाजी नगरला सकाळी 11 वाजता पोहोचलो व त्यासोबत फ्लाईट क्रमांक 6ई-7467 विमान छत्रपती संभाजी नगर होऊन दुपारी चार वाजून 40 मिनिटांनी टेकऑफ घेईल आणि सहा वाजून दहा मिनिटांनी नागपूरला पोहोचेल.

ही विमान सेवा व्हाया छत्रपती संभाजीनगर नागपूर-गोवा आणि गोवा-नागपूर अशा स्वरूपाची असणार आहे. त्यामुळे इंडिगो एअरलाइनच्या माध्यमातून सुरू करण्यात येत असलेल्या विमानसेवेमुळे प्रवाशांना नक्कीच उत्तम अशी सुविधा निर्माण होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe