Cibil Score: बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यास अशक्य होत आहे का? फक्त या चार गोष्टी करा,नाही होणार सिबील खराब

बँकेच्या माध्यमातून पर्सनल लोन तसेच प्रॉपर्टी लोन इत्यादी प्रकारचे कर्ज घेतले जाते व या कर्जाची परतफेड आपल्याला दर महिन्याला एका ठराविक हप्त्याच्या स्वरूपात करावी लागते. परंतु कधीकधी आपल्याला काही कारणांमुळे दर महिन्याला नियमितपणे हप्ते भरायला अडचण निर्माण होते व हप्ते थकायला लागतात.

Published on -

Cibil Score:- जीवनामध्ये आपल्याला अचानकपणे महत्त्वाच्या कामाकरिता पैशांची गरज भासते. अशावेळी अचानकपणे उद्भवलेली आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक तेवढा पैसा आपल्याकडे असतोच असे होत नाही. अशावेळी आर्थिक गरज भागवण्यासाठी बँकांकडून कर्जाचा पर्याय बरेच जण निवडतात.

बँकेच्या माध्यमातून पर्सनल लोन तसेच प्रॉपर्टी लोन इत्यादी प्रकारचे कर्ज घेतले जाते व या कर्जाची परतफेड आपल्याला दर महिन्याला एका ठराविक हप्त्याच्या स्वरूपात करावी लागते. परंतु कधीकधी आपल्याला काही कारणांमुळे दर महिन्याला नियमितपणे हप्ते भरायला अडचण निर्माण होते व हप्ते थकायला लागतात.

अशाप्रकारे जर हप्ते थकायला लागले तर मात्र त्याचा विपरीत परिणाम सिबिल स्कोरवर होतो. त्यामुळे तुमचे हप्ते जर अशा पद्धतीने थकित होत असतील तुम्ही या चार गोष्टी करणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून तुमचा सिबिल स्कोर खराब होणार नाही.

 ईएमआय भरण्यास सक्षम नसाल तर या चार गोष्टी करा आणि सिबिल स्कोर वाचवा

1- बँक मॅनेजरला अगोदर भेटा अशी परिस्थिती उद्भवली तर सगळ्यात अगोदर तुम्ही बँकेच्या मॅनेजरला भेटून त्यांच्याशी या परिस्थितीबद्दल बोलणे गरजेचे आहे.

त्यांना तुमच्या काय समस्या आहेत त्या व्यवस्थित समजावून सांगा आणि भविष्यात असे होणार नाही याची खात्री द्या. तुमची समस्या ग्राह्य असेल तर ती सहजपणे सुटू शकते. अशा परिस्थितीमध्ये बँकेकडून दंड ठोठावला गेला तरी तो भरता येणार नाही एवढा तोटा तुम्हाला होत नाही.

2- सिबिल स्कोर बद्दल बोला जर सलग तीन महिने तुमच्या कर्जाचा हप्ता भरला गेला नाही तर तुमचा सिबिल स्कोर खराब होऊ शकतो. कारण सलग तीन महिने हप्ता बाउन्स झाला तर बँकेचे मॅनेजर सिबिल स्कोरसाठी अहवाल पाठवतात.

परंतु तुमचे एक किंवा दोन हप्ते बाउन्स असतील तर तुम्ही बँक मॅनेजरशी बोलून मॅनेजरला विनंती करा की तुमचा सिबिल मध्ये निगेटिव्ह अहवाल पाठवू नका.

तसेच भविष्यामध्ये असे होणार नाही याची ग्वाही त्यांना द्या. कारण तुमचा सिबिल स्कोर जर खराब झाला तर तुम्हाला पुढच्या वेळी कुठूनही कर्ज मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते.

3- कर्जाचा हप्ता थांबवण्यासाठी अर्ज करू शकता जर तुम्हाला वाटत असेल की काही कालावधी करिता तुम्ही हप्ता भरायला असमर्थ आहात.तर तुम्ही तुमच्या बँकेच्या मॅनेजरला भेटून काही कालावधी करिता तुमचा हप्ता रोखण्यासाठी अर्ज करू शकतात. काही कालावधीनंतर पैशांची व्यवस्था झाल्यावर तुम्ही संपूर्ण रक्कम भरू शकता व यामुळे तुम्हाला पैशांच्या कठीण कालावधीमध्ये थोडाफार दिलासा मिळू शकतो.

4- थकबाकी ईएमआयचा पर्याय जर तुम्ही कर्जाच्या हप्त्याच्या पैशांची व्यवस्था करू शकत नसाल आणि त्यामुळे तुमचे कर्जाचे हफ्ते बाउन्स होत असतील तर तुम्ही थकबाकी हप्त्यासाठी मॅनेजर शी बोलू शकता.

आपल्याला माहित आहे की कर्जाच्या हप्त्याची तारीख सहसा महिन्याच्या सुरुवातीला असते याला आगाऊ ईएमआय म्हणतात. या पर्यायांमध्ये तुम्ही महिन्याच्या शेवटी तुमचा हप्ता भरू शकता व यालाच थकबाकी ईएमआय पर्याय म्हणतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!