Cibil Score Tips : तुम्ही कर्ज घेण्यासाठी बँकेत गेला तर बँकेकडून आधी तुमचा सिबिल स्कोर चेक केला जातो, सिबिल स्कोर चांगला असेल तर बँकेकडून कर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते. सिबिल स्कोर हा 300 ते 900 या दरम्यान गणला जातो. तज्ञ सांगतात की, सिबिल स्कोर हा 700 च्या वर असायला हवा. 700 पेक्षा अधिक सिबिल स्कोर असणे हे चांगले समजले जाते आणि त्यापेक्षा कमी सिबिल स्कोर असला तर कर्ज घेण्यास अडचणी येऊ शकतात. कमी सिबिल स्कोर असलेल्या ग्राहकांना कर्ज देताना बँका अनेकदा विचार करतात.
काही प्रकरणांमध्ये कमी सिबिल स्कोर असणाऱ्या ग्राहकांना बँकेकडून कर्ज सुद्धा नाकारले जाते, जर समजा कमी सिबिल असणाऱ्या ग्राहकांना बँकेकडून कर्ज मंजूर झाले तर त्या कर्जासाठी अधिकचा व्याजदर आकारला जाण्याची शक्यताही असते. म्हणूनच सिबिल स्कोर हा नेहमीच स्ट्रॉंग ठेवा जेणेकरून तुम्हाला अडीअडचणीच्या काळात कर्ज घेण्याची गरज भासली तर तुम्हाला सहजतेने कर्ज मंजूर होईल आणि कमी व्याज भरावे लागेल.
तज्ञ सांगतात की, सिबिल स्कोरच्या माध्यमातून तुमची रीपेमेंट हिस्ट्री समजते, तुम्ही घेतलेले कर्ज किती योग्य पद्धतीने आणि योग्य कालावधीत फेडतात हे सुद्धा सिबिल स्कोरमुळे समजते. अशा परिस्थितीत, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अशा पाच टिप्स जाणून घेणार आहोत ज्या फॉलो केल्यास ग्राहकांना आपला सिबिल स्कोर सुधारता येणार आहे.
सिबिल स्कोर सुधारण्याच्या 5 टिप्स
EMI आणि सर्व बिले वेळेवर पेमेंट करा : जर तुम्ही एखाद्या बँकेकडून कर्ज घेतलेले असेल किंवा एखादी वस्तू ईएमआयवर घेतलेली असेल तर तुम्ही तुमचा कर्जाचा हप्ता किंवा ईएमआय वेळेवर दिला पाहिजे. जर तुम्ही कर्जाचा हप्ता वेळेवर भरला नाही किंवा तुमचा एखादा ईएमआय बँकेत जमा नसेल तर याचा थेट परिणाम तुमच्या सिबिल स्कोरवर पाहायला मिळेल. कारण EMI हा वेळेवर आणि ठरलेल्या तारखेलाच भरावा लागतो, तारीख उलटली की तुम्हाला दंड भरावा लागतो शिवाय तुमचा सिबिल स्कोर सुद्धा खराब होऊ शकतो.
एकाच वेळी एका पेक्षा अधिक कर्ज : जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीकडे कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. एकाच वेळी एकापेक्षा अधिक कर्ज घेणारे लोकही आहेत. पण तुम्ही एका वस्तूसाठी कर्ज घेतले असेल तर, ते कर्ज पूर्ण फेडल्यानंतरच दुसरं कर्ज घ्या. एकाच वेळेला अनेक लोन घेतल्यामुळे तुमच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ येऊ शकते. या कारणामुळे तुमचा सिबिल स्कोर सुद्धा पूर्णपणे खराब होतो.
लोन गॅरेंटर : मंडळी, तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर खराब करून घ्यायचा नसेल तर, लोन गॅरेंटर बनताना विचारपूर्वक बना. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी लोन गॅरेंटर बनलात आणि त्याने जर ते कर्ज योग्य वेळेत फेडले नाही, कर्ज बुडवले तर तुमचा सिबिल स्कोर सुद्धा डाऊन होऊ शकतो. म्हणजेच कर्जाची वेळेत परतफेड केली नाही तर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीसोबतच गॅरेंटर व्यक्तीचा सिबिल स्कोर सुद्धा खराब होतो.
क्रेडिट कार्डची लिमिट : क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या लोकांनी काही गोष्टींची काळजी घ्यावी. काही क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या व्यक्तींना आपल्या क्रेडिट कार्डची लिमिट वारंवार वाढवण्याची गरज भासते. परंतु असं करणं अत्यंत चुकीचं मानलं गेलं आहे. क्रेडिट कार्डची लिमिट एका मर्यादेपर्यंत वाढवा. वारंवार लिमिट वाढवल्यामुळे तुम्ही अति प्रमाणात पैसे खर्च करत आहात ही बाब दिसून येते. यामुळे तुमचा सिबिल स्कोर डाउन होण्याची शक्यता अधिक असते.
क्रेडिट कार्डचा उपयोग : क्रेडिट कार्डचा उपयोग करताना थोडा सांभाळून करावा. पैसे वापरण्यासाठी मिळतात म्हणून भरमसाठ पैसे खर्च करणे चुकीचे आहे. चांगला सिबिल स्कोर तयार करण्यासाठी तुम्हाला क्रेडिट कार्डचा वापर देखील अत्यंत सावधानीने करावा लागणार आहे. तुम्हाला ज्या लिमिटमध्ये क्रेडिट कार्ड दिले आहे त्याच लिमिटपर्यंत पैसे खर्च करा. तुम्ही लिमिट क्रॉस केली तर तुमच्या सिबिल स्कोरवर याचा थेट परिणाम होतो. तज्ञ सांगतात की क्रेडिट कार्ड धारकांनी फक्त त्यांना मंजूर असणारी 30% रक्कम खर्च केली पाहिजे.