CIDCO Housing Scheme: ऑक्टोबरच्या ‘या’ तारखेला होत आहे सिडकोच्या आतापर्यंतच्या मोठ्या गृह योजनेचा शुभारंभ! वरच्या मजल्यावर हवे घर तर लागतील जास्त पैसे

सिडकोच्या आतापर्यंतच्या इतिहासामधील सर्वात मोठ्या गृह योजनेचा शुभारंभ हा 7 ऑक्टोबरला होत असून यामध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी ही योजना असणार आहे.

Published on -

CIDCO Housing Scheme:- मुंबई, पुणे व इतर मोठ्या शहरामध्ये स्वतःच्या हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकारच्या म्हाडा आणि सिडकोसारख्या गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून खूप मोठी मदत होते. या गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांच्या विक्रीकरिता सोडत काढली जाते व यामध्ये अनेक लाभार्थ्यांना घरांचा लाभ दिला जातो.

या दृष्टिकोनातून जर आपण सिडकोच्या अनुषंगाने बघितले तर सिडकोच्या आतापर्यंतच्या इतिहासामधील सर्वात मोठ्या गृह योजनेचा शुभारंभ हा 7 ऑक्टोबरला होत असून यामध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी ही योजना असणार आहे. नवी मुंबईतील विविध नोडमध्ये या घरांचे बांधकाम सध्या सुरू असून जवळपास 27 विविध ठिकाणी 67 हजार घरे सिडकोच्या माध्यमातून बांधली जात आहे.

 7 ऑक्टोबरला होणार सिडकोच्या 26 हजार घरांच्या योजनेचा शुभारंभ

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिडकोने आतापर्यंत गेल्या 50 वर्षात ज्या वेगवेगळ्या गृहनिर्माण योजना राबवल्या आहेत त्यापैकी ही सर्वात मोठी गृहयोजना असून तिचा शुभारंभ सात ऑक्टोबरला होत आहे.

या योजनेअंतर्गत पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटाकरिता ही योजना असणार आहे. नवी मुंबई शहराच्या विविध नोडमध्ये या घरांचे बांधकाम सध्या सुरू आहे.

यातील घरांच्या किमती मजल्यानुसार आकारले जाणार असून वरच्या मजल्यावरील घरांसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. या ठरावाला सिडको संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये नुकतीच मान्यता देखील मिळाली आहे.

म्हणजे शहरातील विविध 27 ठिकाणी 67 हजार घरे बांधली जात असून त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 43 हजार घरांना महारेराच्या माध्यमातून परवानगी देण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यात 26000 घरांची सोडत 7 ऑक्टोबरला होणार आहे.

 मजल्यानुसार ठरवले जातील घरांच्या किमती

या सोडतीमध्ये 22 मजली इमारतीमधील घरांच्या किमती या मजल्यानुसार निश्चित करण्यात येणार आहेत. उदाहरणच घ्यायचे झाले तर सातव्या मजल्यावरील घरासाठी प्रति चौरस फूट दहा रुपये अतिरिक्त  दराची आकारणी केली जाणार आहे व त्यावरील मजल्यासाठी प्रति चौरस फुटाला रुपये दहा च्या पटीने म्हणजेच वीस, 30 आणि 40 असे चढ्या दराने अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.

 कोणकोणत्या घरांचा आहे समावेश?

या सोडत प्रक्रियेत जवळपास 13000 घरे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असून उरलेली 13000 घरे अल्प उत्पन्न गटाकरीता आहेत. या एकूण 26000 घरांपैकी जवळपास 50% घरे एकट्या तळोजा नोडमधील असून उर्वरित खांदेश्वर,

मानसरोवर तसेच खारकोपर आणि बामण डोंगरी गृहप्रकल्पातील शिल्लक घरांचा या योजनेत समावेश केला आहे. या घरांच्या सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यांचे दर बाजारभावाच्या तुलनेमध्ये कमी असणार आहेत. या योजनेमध्ये मात्र वाशी तसेच जुईनगर व खारघर प्रकल्पातील घरांचा समावेश करण्यात आलेला नाही.

 सिडकोच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी गृहयोजना

गेल्या पन्नास वर्षामध्ये सिडकोने वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून विविध घटकांसाठी दीड लाख घरे आतापर्यंत बांधलेली आहेत. 2018 मध्ये दोन टप्प्यात 18000 घरांची योजना जाहीर करण्यात आलेली होती व ही आतापर्यंतची सर्वात मोठी योजना होती.परंतु आता जवळपास 26000 घरांची योजना जाहीर करण्यात आलेली आहे व त्यामुळे ही सिडकोची आतापर्यंतची सर्वात मोठी गृह योजना ठरली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!