कोरोना हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. हा रोग श्वसन आजार आहे (फ्लू सारखा) ज्याची लक्षणे खोकला, ताप, व अधिक गंभीर आजारात श्वास घेण्यास त्रास अशी आहेत. हात वारंवार धुवून, चेहर्याला स्पर्श करणे टाळून आणि आजारी लोकांचा जवळचा संपर्क टाळून तुम्ही स्वतःचे संरक्षण करू शकता.
कोरोना व्हायरसच्या संक्रमित रुग्णांत जगात वेगाने वाढ होत आहे, वैज्ञानिकांनी सांगितले आहे की कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी जास्तीत जास्त काळजी घेण्यासोबतच अधिकाधिक टेस्ट करणे आवश्यक आहे, कारण अलीकडील काही प्रकरणांतून दिसून आले आहे कि, याची लक्षणे दिसण्यास उशीर होत आहे, त्याचप्रमाणे कोरोना रुग्णांची प्राथमिक लक्षणे साध्या सर्दी – खोकल्या प्रमाणेच आहे.
डब्ल्यूएचओने याबद्दल एका रिपोर्ट मध्ये सांगितले आहे की कोरोना विषाणूचा संसर्ग सुरु होताच रुग्णांना खोकल्याचा त्रास सुरु होतो, ही अशी वेळ असते जेव्हा तुम्हाला तात्काळ डॉक्टरांची भेट घेणे आवश्यक असते.आज आपण जाणून घेणार आहोत तुम्हाला कोरोनाचा संसर्ग झाला असल्यास तुमच्या शरीरात कोणती महत्वाची लक्षणे आढळून येतात
1) सर्दी :-
सर्दी होऊन नाक गळणे, हेही करोना विषाणूच्या लक्षणांपैकी एक आहे.कोरोना रुग्णांमध्ये सर्दी चे लक्षणे ही आढळतात जर सर्दीमुळे तुमचे तुमचे नाक वाहात असेल तर कदाचित ते कोरोनाचे लक्षण असू शकते तसे पाहिले तर साध्या तापमान बदलामुळे ही अनेकदा सर्दी होण्याची शक्यता असते, डब्ल्यूहओच्या अहवालानुसार, कोविड १९ (कोरोना) च्या पाच टक्के रुग्णांना सुरवातीला सर्दीचा त्रास होतो
2) श्वास घेण्यास अडचण :-
श्वास घेण्यास त्रास होणे हे करोना विषाणूच्या संसर्गाचे एक प्रमुख लक्षण आहे.कोरोना व्हायरस चे संक्रमण रुग्णास झाल्यास श्वास घेण्यास अडचण येते.
3) ताप येणे :-
कोरोनाग्रस्त रुग्णांबाबत हे अत्यंत महत्वाचे लक्षण आहे आता पर्यंत च्या बहुतांश केसेस मध्ये कोरोना संक्रमित रुग्णांना ताप येणे हे लक्षण मोठ्या प्रमाणात असल्याचे डॉक्टर सांगतात,वातावरणातील बदलाने सध्या सर्वत्र तापाचे रुग्ण आढळतात. मात्र जास्त दिवस ताप राहत असल्यास लागलीच रक्ततपासणी करून घ्यावी.
4) डोकेदुखी
डोकं दुखणं हेही करोना व्हायरसच्या लक्षणांपैकी एक आहे.
5) अंगदुखी
अमेरिकेतील वॉशिंग्टन नर्सिंग होमच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालात सांगितले आहे कि कोरोनाचा संसर्ग झालेल्या
२५% रुग्णांना कोरोना रुग्णांना उठण्या आणि बसण्यास त्रास होत होता आणि त्याना अंगदुखीचा त्रास होता
कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी हेल्पलाईन नंबर
हेल्पलाईन क्रमांकावर तुम्ही कॉल केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यावेळी तुम्ही परदेशात प्रवास आलात का किंवा परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात होतात का असे प्रश्न विचारले जातील. त्यानंतर तुम्हाला सेवा पुरवली जाईल हा नंबर प्रत्येक राज्याप्रमाणे वेगळा असेल. तसंच कोरोना व्हायरसची टेस्ट तुम्हाला मोफत करून देण्यात येईल.020-26127394 या क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही कोरोनाची तपासणी करून घेऊ शकता
कोरोना व्हायरस कसा पसरतो ?
कोरोना विषाणू हा प्रामुख्याने संसर्ग झालेल्या व्यक्तीशी ती खोकताना किंवा शिंकताना संपर्क आल्यास पसरतो. एखादी व्यक्ती विषाणू असलेल्या एखाद्या पृष्ठभागाला (दर्शनी भाग) किंवा वस्तूला स्पर्श करून त्यानंतर तिच्या डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करते तेव्हादेखील तो पसरतो.