कापूस उत्पादक शेतकऱ्यांनो सावधान ! कापसाचे ‘हे’ बियाणे खरेदी करू नका, नाहीतर…; कृषी विभागाचा मोलाचा सल्ला

Cotton Farming Maharashtra : येत्या दीड महिन्यात राज्यात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून पूर्व मशागतीची तयारी सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात खरीप हंगामात कापसाची मोठ्या प्रमाणात शेती होते. कापूस आणि सोयाबीन या दोन नगदी पिकांची राज्यात सर्वाधिक लागवड केली जाते. कापसाची विदर्भ, मराठवाडा तसेच खानदेश मध्ये सर्वाधिक पेरणी पाहायला मिळते.

दरम्यान राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून एक आवाहन करण्यात आले आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एचटीबीटी कापूस बियाणे पेरणी करू नये. हे बियाणं शासनाने अमान्य ठरवली आहेत. या अनधिकृत बियाणांना काहीजण तणनाशक बीटी, आर- आरबीटी व बीटीबीजी-३ या नावाने ओळखतात. शेतकऱ्यांनी मात्र या बियाण्याची पेरणी करायची नाही असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ जिल्हा परिषदेत 612 रिक्त पदांसाठी होणार भरती; वाचा सविस्तर

तसेच हे बियाणे खरेदीसाठी प्रलोभने दाखवणाऱ्या कंपनीच्या आमिषाला बळी पडून हे बियाणे खरेदी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून जे खत दुकानदार असे बियाणे विकत आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे देखील सांगितले गेले आहे. एचटीबीटी कापूस बियाणे अवैध आहे आणि अवैध बियाण्यांची विक्री करणे, असे बियाणे बाळगणे आणि साठवणूक करणे कायद्याने गुन्हा असून ज्या व्यक्तींकडे या बियाण्यांची खेप सापडेल अशा व्यक्तींवर कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे.

तसेच या प्रकारचे अनधिकृत कापूस बियाणे लागवड केलेल्या कापूस पिकाच्या पानांचे नमुना तपासणीअंती एचटीबीटी जनुके आढळल्यास संबंधितावर कारवाई होऊ शकते असं देखील कृषी विभागाने स्पष्ट केल आहे. कृषी विभाग व पोलिस एचटीबीटी बियाणे विक्रीवर लक्ष ठेवून आहेत हे बियाणे विक्रीचा प्रयत्न करू नये, असे यावेळी सांगितले गेले आहे.

हे पण वाचा :- काय सांगता ! ‘या’ कंपनीच्या स्टॉकने फक्त 3 वर्षात दिले 1000 टक्क्यांहुन अधिकचे रिटर्न, गुंतवणूकदार बनलेत मालामाल, पहा….

कृषी विभागाच्या मते असे अवैध बियाणं तयार करणाऱ्या कंपन्या आणि विक्रेते हे बियाणं लागवड केल्यानंतर ग्लायफोसेट या तणनाशकाची शिफारस करतील. मात्र हे तणनाशक मानवाच्या आरोग्यासाठी घातक आहे. तसेच या तनानाशकामुळे जमिनीची सुपीकता कमी होते, जमीन नापीक बनते. या तननाशकाच्या वापरामुळे कॅन्सर होण्याचा धोका सर्वाधिक असतो.

त्यामुळे शेतकऱ्यांना विशेष सतर्क राहण्याची गरज असल्याचे मत कृषी विभागाच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. एकंदरीत शेतकऱ्यांनी कापूस बियाणे खरेदी करताना अधिक काळजी घ्यायची आहे. यामुळे अधिकृत विक्रेत्याकडून अधिसूचित बियाणे पावतीसह कापूस बियाणे खरेदी करावे असे यावेळी कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.

हे पण वाचा :- अहो शेठ तुम्ही नादच केलाय थेट ! प्रगतिशील शेतकऱ्याने ‘या’ फळाच्या अवघ्या 30 झाडामधून कमवलेत लाखों रुपये, वाचा ही यशोगाथा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe