खुशखबर ! सीआरपीएफ मध्ये होणार तब्बल 1 लाख 30 हजार रिक्त पदांची भरती, ‘या’ दिवशी सुरु होणार अर्ज प्रक्रिया

Published on -

CRPF Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी कामाची आणि अति महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता संपूर्ण देशभरात सीआरपीएफ मध्ये म्हणजेच सेंट्रल रिजर्व पोलीस फोर्स अर्थातच केंद्रीय राखीव पोलीस दलात जाण्यासाठी लाखो उमेदवार तयारी करत असतात.

अशा तरुणांसाठी आता एक आनंदाची बातमी मिळणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सीआरपीएफ लवकरच एक लाख तीस हजार रिक्त कॉन्स्टेबल पदाची भरती प्रक्रिया राबवणार आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून थेट भरती अन्वये ही रिक्त पदे भरली जाणार आहेत.

हे पण वाचा :- शेवटी निर्णय झालाच! शिंदे-फडणवीस सरकारने ‘या’ कर्मचाऱ्यांच्या वेतनात केली मोठी वाढ; 1 एप्रिल पासून वेतन वाढीचा निर्णय लागू

निश्चितच यामुळे लाखो उमेदवारांचे सीआरपीएफ मध्ये जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. याबाबत गृहमंत्रालयाच्या माध्यमातून नुकतीच एक नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. पण ही प्रक्रिया नेमकी केव्हा सुरू होणार, यासाठी अर्ज प्रक्रिया केव्हा सुरू होईल? याबाबत कोणतेच माहिती गृहमंत्रालयाच्या माध्यमातून सार्वजनिक करण्यात आलेली नाही. परंतु लवकरच या संदर्भात अधिसूचना काढली जाणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना यासाठी लवकरच अर्ज सादर करता येणार आहेत.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! ठाणे महानगरपालिकेमध्ये ‘या’ पदासाठी भरती सुरु; थेट मुलाखतीने होणार भरती, पहा डिटेल्स

भरतीबाबत गृह मंत्रालयाने काय म्हटले?

गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कॉन्स्टेबल पदाच्या एक लाख 29 हजार 929 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये एक लाख 25 हजार 262 जागा ह्या पुरुषांसाठी राहणार आहेत, तसेच माजी अग्निविरांसाठी एकूण जागेपैकी दहा टक्के जागा राखीव ठेवल्या जाणार आहेत. तर उर्वरित जागा या महिलांसाठी राहणार आहेत.

आपणास सांगू इच्छितो की कॉन्स्टेबल पदासाठी 18 ते 23 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र राहणार असून किमान दहावीपर्यंतचे शिक्षण घेतलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकणार आहेत. इतर सैन्य भरती प्रमाणेच सीआरपीएफ मध्ये कॉन्स्टेबल या पदाचा रिक्त जागा शारीरिक चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि लेखी परीक्षेच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सीआरपीएफ मध्ये कॉन्स्टेबल या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 21700 ते 69,100 इतकं वेतन दिल जाणार आहे.

हे पण वाचा :- पंजाबराव डख कोण आहेत? त्यांच शिक्षण काय, ते काय काम करतात, त्यांचा मोबाईल नंबर काय? वाचा सविस्तर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe