DA Hike:- केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकताच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात आली होती व तो 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आला. त्यामुळे देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्याचा फायदा मिळेल.
त्यासोबतच आता देशातील बँक कर्मचाऱ्यांसाठी देखील एक आनंदाची बातमी असून बँक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे व ही वाढ मे, जून आणि जुलै 2024 साठी असणार आहे.

बँक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात करण्यात आली वाढ
बँक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली असून हा भत्ता मे, जून आणि जुलै 2024 करिता देण्यात येणार आहे व यासंबंधीची अधिसूचना इंडियन बँक असोसिएशनने 10 जून 2024 रोजी जारी केली व त्या माध्यमातून ही घोषणा करण्यात आली.
इंडियन बँक असोसिएशन द्वारे करण्यात आलेल्या या घोषणेनुसार बँक कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 15.97% इतका असणार आहे. मार्च 2024 मध्ये इंडियन बँक असोसिएशन आणि बँक कर्मचारी संघटनांनी 17 टक्के वार्षिक वेतन वाढीवर सहमती दर्शवलेली होती
व यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर या सगळ्या गोष्टींचा 8284 कोटी रुपयांचा जास्तीचा वार्षिक खर्चाचा बोजा पडणार आहे. नोव्हेंबर 2022 पासून लागू होणाऱ्या या वेतन वाढीचा फायदा देशातील तब्बल आठ लाख बँक कर्मचाऱ्यांना होणार आहे.
बँक कर्मचाऱ्यांसाठी होईल कामाचा पाच दिवसांचा आठवडा?
मागील काही दिवसांअगोदर बँक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पाच दिवसांचा कामाचा आठवडा व्हावा अशी मागणी केली होती. त्यामुळे इंडियन बँक असोसिएशन आणि बँक युनियनने या प्रस्तावावर सहमती दाखवलेली आहे.
परंतु आता त्यावर सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा मात्र बाकी आहे. मार्च 2024 मधील संयुक्त घोषणेने हा करार पीएसयु बँक कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून पाच दिवसांच्या कामाचा मार्ग मोकळा होईल. कारण या संयुक्त घोषणामध्ये सर्व शनिवारी बँक सुट्टी म्हणून ओळखली जाणार आहे.