Dearness Allowances Formula Marathi : सरकारी कर्मचाऱ्यांना मग केंद्रीय कर्मचारी असो किंवा राज्य कर्मचारी असो त्यांना महागाई भत्ता दिला जातो. सद्यस्थितीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञय करण्यात आला आहे, तर राज्य कर्मचाऱ्यांना 34 टक्के दराने महागाई भत्ताचा लाभ दिला जात आहे.
राज्य कर्मचाऱ्यांना देखील लवकरच केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढ दिली जाणार आहे. यासाठी राज्य कर्मचाऱ्यांकडून वारंवार मागणी देखील केली जात आहे. दरम्यान आज आपण नेमकं केंद्र शासन महागाई भत्ता ठरवतं कसं यासाठी कोणता फॉर्म्युला वापरला जातो याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
सर्वप्रथम महागाई भत्ता काय असतो?
महागाई वाढल्याने कर्मचाऱ्यांना भरपाई म्हणून महागाई भत्ता दिला जातो. सरकारी कर्मचारी, निमशासकीय तसेच निवृत्त व्यतने धारक कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळत असतो.
प्रत्येकी सहा महिन्यात होते महागाई भत्ता वाढ
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, प्रत्येकी सहा महिन्यात महागाई भत्त्यामध्ये सुधारणा केली जाते. याचे मोजमाप कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावरून केले जाते. या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना दिला जाणारा महागाई भत्ता हा स्थानानुसार म्हणजे शहरी, निमशहरी आणि ग्रामीण अशा प्रकारे विभागण्यात आला असून याचे प्रमाण प्रत्येक ठिकाणी कमी अधिक आहे.
कसा ठरवला किंवा मोजला जातो महागाई भत्ता?
आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महागाई भत्ता कसा मोजला जातो. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की महागाई भत्ता दर निश्चित करण्यासाठी केंद्र शासनाने एक फॉर्मुला विकसित केला आहे. {(गेल्या 12 महिन्यांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाची सरासरी (आधारभूत वर्ष -2001 = 100) -115.76)/115.76} x 100. या ठिकाणी लक्षात ठेवा की सामाजिक उपक्रमांच्या डीए साठी वेगळा फॉर्मुला वापरला जातो.