Samrudhi Mahamarg:- महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जे काही महामार्ग उभारण्यात आले त्यामध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा खूप महत्त्वाचा असा महामार्ग असून महाराष्ट्राच्या विकासामध्ये समृद्धी महामार्ग खूप महत्त्वाचा ठरेल. नागपूर ते मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरादरम्यान हा 701 किलोमीटरचा महामार्ग उभारण्यात आला असून आतापर्यंत जवळपास 625 किलोमीटरचा महामार्ग हा वाहतुकीकरिता खुला करण्यात आलेला आहे
व आता शेवटच्या 76 किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असून हा शेवटचा टप्पा देखील लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. कृषी आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हा महामार्ग अतिशय महत्त्वाचा असून
नागपूर आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांव्यतिरिक्त जवळपास राज्यातील 14 जिल्ह्यांमधील वाहतूक व्यवस्थेला हातभार लावण्याचे महत्त्वपूर्ण काम या महामार्गामुळे शक्य झाले आहे. याही पुढे जात आता याच महामार्गावरून सरळ दिल्ली देखील गाठता येणे शक्य होणार आहे.
समृद्धी महामार्गावरून गाठता येईल दिल्ली
समृद्धी महामार्ग हा एक महत्त्वाचा महामार्ग असून या महामार्गाचा फायदा जास्तीत जास्त परिसराला आणि वाहनांना व्हावा याकरिता हा महामार्ग अनेक ठिकाणी कनेक्ट करण्यात येत आहे. नुकतेच या महामार्गाचे राजधानी दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून यामुळे मुंबईवरून थेट दिल्ली किंवा नागपूर वरून थेट दिल्ली हा प्रवास आता करता येणार आहे.
समृद्धी महामार्ग महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आणि महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई अशा दोन महत्त्वपूर्ण शहरांना जोडतो व हा 701 किलोमीटरचा महामार्ग असून आतापर्यंत 625 किलोमीटरचा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे व अखेरचा 76 किलोमीटरचा रस्ता हा इगतपुरी ते आमणे या दरम्यान असून त्याचे देखील काम आता पूर्ण झाले असून हा देखील टप्पा वाहतुकीसाठी लवकरात लवकर खुला करण्यात येणार आहे.
मुंबई-नाशिक महामार्गाला आमणे या ठिकाणाहून जोडणारा चार किलोमीटरचा रस्ता उभारला जात असून मुंबई ते नाशिक महामार्गावरून वडोदरा ते मुंबई द्रुतगती महामार्गाची बांधणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करत आहे.
या ठिकाणी आमणे पासून 4.2 किलोमीटरचा रस्ता पार करून प्रवाशांना वडोदरा ते मुंबई महामार्गावर जाता येणार आहे व तेथून वडोदरा व थेट दिल्ली पर्यंतचा प्रवास सुलभ होणार आहे. त्यामुळे नागपूरवरून दिल्ली किंवा मुंबईहून दिल्ली गाठणे आता प्रवाशांना शक्य होणार आहे.