PPF Calculator: पीपीएफ योजनेत 15 वर्षांपर्यंत वर्षाला 1.5 लाख रुपये जमा करा आणि मिळवा 40 लाख 68 हजार 299 रुपये! वाचा कसे?

या योजनेचा नियम बघितला तर त्यामध्ये तुम्हाला वर्षाला जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करावे लागतात व या योजनेचा परिपक्वता कालावधी हा पंधरा वर्षाचा असून या योजनेत तुम्ही दरवर्षी रक्कम ही रक्कम जमा केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळतो.

Published on -

PPF Calculator:- ज्या गुंतवणूकदारांना किंवा ज्या व्यक्तींना दीर्घ कालावधीसाठी मोठा निधी उभा करायचा आहे त्यांच्यासाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ योजना हा एक चांगला गुंतवणुकीसाठीचा पर्याय आहे. या योजनेमध्ये तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीची सुरक्षिततेची हमी सरकारच्या माध्यमातून मिळत असते.

या योजनेत तुम्ही कितीही रक्कम गुंतवत आहात त्यावर तुम्हाला निश्चित व्याजाचा लाभ मिळतो.अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जर सुरक्षित गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करायची असेल तर पीपीएफ योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकतात.

जर सध्या या योजनेचा नियम बघितला तर त्यामध्ये तुम्हाला वर्षाला जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करावे लागतात व या योजनेचा परिपक्वता कालावधी हा पंधरा वर्षाचा असून या योजनेत तुम्ही दरवर्षी रक्कम ही रक्कम जमा केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळतो.

त्यामुळे जर तुम्ही प्रत्येक वर्षाला दीड लाख रुपये याप्रमाणे पंधरा वर्षे पैसे जमा केले तर तुम्हाला ही योजना पूर्ण झाल्यानंतर किती पैसे मिळतील याबाबतची माहिती बघू.

 पीपीएफ योजनेत प्रतिवर्ष दीड लाख याप्रमाणे पंधरा वर्षे पैसे जमा केले तरी तुम्हाला किती पैसे मिळतील?

जर तुम्ही पीपीएफ कॅल्क्युलेटर नुसार बघितले तर या योजनेमध्ये प्रत्येक वर्षाला तुम्ही दीड लाख रुपये जमा केले तर पंधरा वर्षात तुमचे 22 लाख 50 हजार रुपये गुंतवणूक या योजनेत होते. या योजनेत गुंतवणुकीवर 7.1% या दराने व्याजाचा फायदा दिला जातो व पंधरा वर्षात या व्याजदराने तुम्हाला 18 लाख 18 हजार 299 रुपये व्याज मिळते. या पद्धतीने तुम्ही पंधरा वर्षानंतर जर पैसे काढले तर तुम्हाला एकूण 40 लाख 68 हजार 299 रुपये  इतके पैसे मिळतात.

 यापेक्षा जास्त पैसे हवे तर काय करावे?

तुम्हाला जर या योजनेच्या माध्यमातून जास्त फायदा हवा असेल तर तुम्ही या योजनेत योगदान वाढवू शकतात. पीपीएफ योजनेमध्ये जर तुम्हाला योगदान वाढवायचे असेल तर या योजनेच्या मॅच्युरिटीच्या एक वर्षाआधी तुम्हाला तसा अर्ज करावा लागतो.

त्यानंतर पीपीएफ खाते पाच वर्षाच्या कालावधी करिता वाढवले जाते. म्हणजेच तुम्ही या योजनेची मुदतवाढ केली तर ती थेट पाच वर्षाच्या कालावधीसाठी  केली जाते. या पद्धतीने तुम्ही कितीही वेळा मुदतवाढ करू शकतात.

अशा प्रकारे तुम्ही पंधरा वर्षात परत पाच वर्षे वाढवले तर तुमची एकूण गुंतवणूक वीस वर्षांसाठी होते व वीस वर्षांमध्ये तुमचे तीस लाख रुपये या योजनेत जमा होतात.

7.1% दराने व्याज पकडले तर तुम्हाला व्याजापोटी 36 लाख 58 हजार 288 रुपये मिळतात व योजना परिपक्व म्हणजेच मॅच्युअर झाल्यानंतर व्याज आणि मुद्दल मिळून तुम्हाला 66 लाख 58 हजार 288 रुपये मिळतात. अशाप्रकारे जर तुम्ही पाच पाच वर्ष वाढवत गेले तर तुम्हाला मिळणाऱ्या पैशांमध्ये वाढ होते.

 कर बचतीसाठी महत्त्वाची योजना

ही योजना गुंतवणुकीसाठी एक महत्त्वाची योजना असून सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफ योजनेत गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदाराला केलेल्या गुंतवणुकीवर, त्यावर मिळणाऱ्या व्याज आणि परिपक्वता रकमेवर कर लाभ दिला जातो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe