Maharashtra Rain: येत्या 48 तासात महाराष्ट्रात पाऊस घालेल धुमाकूळ? कमी दाबाचा पट्टा झाला सक्रिय, वाचा कुठे पडेल जास्त पाऊस?

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रावर देखील दिसून येत आहे. या भागामध्ये येणाऱ्या 48 तासात जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. सध्या महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाचा जोर वाढल्याचे चित्र असून पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Published on -

Maharashtra Rain:- महाराष्ट्रामध्ये पावसाने परत जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. जास्तीच्या पडणाऱ्या या पावसामुळे आता काही ठिकाणी शेती पिकांचे देखील नुकसान व्हायला सुरुवात झालेली आहे.

तसे पाहायला गेले तर सप्टेंबर महिन्याची सुरुवातच मुळात पावसाने झाली राज्यात पुन्हा पाऊस मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

याबाबत जर आपण हवामान खात्याने दिलेली माहिती बघितली तर अरबी समुद्राच्या वायव्य भागामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून त्यामुळे त्याचे परिणाम संपूर्ण देशात दिसून येत आहेत त्याच प्रकारचे परिणाम आता महाराष्ट्रात देखील दिसून येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

 महाराष्ट्रात या ठिकाणी पडेल जास्त पाऊस

 याबाबत सविस्तर वृत्त असे की, अरबी समुद्राच्या वायव्य भागामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असल्याकारणाने गुजरात पासून ते केरळ पर्यंत त्याचे परिणाम आता दिसायला लागले आहेत. अशाच प्रकारचे परिणाम आता महाराष्ट्रातील मराठवाडा,

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रावर देखील दिसून येत आहे. या भागामध्ये येणाऱ्या 48 तासात जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. सध्या महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाचा जोर वाढल्याचे चित्र असून पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

 या जिल्ह्यांना आहे जास्त पावसाचा इशारा

 महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पडणाऱ्या पावसाच्या बाबतीत हवामान खात्याचा इशारा बघितला तर त्यांच्या मते कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यासोबत मात्र उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाटासह वादळ सोसायट्यांचा वारा आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील जालना,बीड, छत्रपती संभाजी नगर, परभणी, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल अशी देखील शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

यासोबतच मुंबई तसेच कोकण सह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून शेतकऱ्यांनी देखील पिकांची योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe