अहमदनगर भाजपमध्ये नाराजी…३ मोठे नेते पक्ष सोडणार

तारीख होती १५ जुलै २०२४. बातमी होती, गणेश परिसरातील कोल्हे समर्थकांनी शरद पवारांची भेट घेतल्याची... या भेटीत शरद पवारांना राहात्यात येण्याचं निमंत्रण देऊन, कोल्हे समर्थकांनी तेथे शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहण्याचा शब्द पवारांकडून घेतला. त्यानंतर तारीख होती, २ ऑगस्ट २०२४. बातमी होती, भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र पिपाडा थेट काँग्रेसच्या स्टेजवर दिसल्याची. आश्वीच्या महाविकास आघाडीच्या कार्यक्रमात पिपाडा नुसते काँग्रेसच्या स्टेजवरच दिसले नाहीत, तर त्यांनी तेथे विखेंविरोधात जोरदार भाषणही ठोकलं. त्यानंतर तारीख होती, २१ ऑगस्ट २०२४. आणि बातमी होती, अकोल्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते वैभव पिचड यांच्या समर्थकांचा मेळावा. या मेळाव्यात अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांचा प्रचार करणार नसल्याचे सांगत, पिचड यांनी स्वतः निवडणूक लढविण्याची घोषणा केली...

Ahmednagarlive24
Published:
तारीख होती १५ जुलै २०२४. बातमी होती, गणेश परिसरातील कोल्हे समर्थकांनी शरद पवारांची भेट घेतल्याची… या भेटीत शरद पवारांना राहात्यात येण्याचं निमंत्रण देऊन, कोल्हे समर्थकांनी तेथे शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहण्याचा शब्द पवारांकडून घेतला. त्यानंतर तारीख होती, २ ऑगस्ट २०२४. बातमी होती, भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र पिपाडा थेट काँग्रेसच्या स्टेजवर दिसल्याची. आश्वीच्या महाविकास आघाडीच्या कार्यक्रमात पिपाडा नुसते काँग्रेसच्या स्टेजवरच दिसले नाहीत, तर त्यांनी तेथे विखेंविरोधात जोरदार भाषणही ठोकलं. त्यानंतर तारीख होती, २१ ऑगस्ट २०२४. आणि बातमी होती, अकोल्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते वैभव पिचड यांच्या समर्थकांचा मेळावा. या मेळाव्यात अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांचा प्रचार करणार नसल्याचे सांगत, पिचड यांनी स्वतः निवडणूक लढविण्याची घोषणा केली…
मित्रांनो, या तिन्ही बातम्यांमध्ये एक गोष्ट काँमन आहे. ती म्हणजे, वैभव पिचड, विवेक कोल्हे व राजेंद्र पिपाडा हे नगर जिल्ह्यातील भाजपचे तिन्ही नेते देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय समजले जातात. या तिन्ही नेत्यांची खदखद आता एकएक करुन समोर येऊ लागली आहे. फडणवीस यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जातोय. नगर भाजप फुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तर चला जाणून घेऊयात, नगर भाजपमध्ये नेमकं काय बिघडलंय.
गेल्या १० वर्षात नगर भाजपने अनेक चढउतार पाहिले. मात्र कशीही परिस्थिती असली तरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जिल्ह्यावरची पकड कमी होऊ दिली नाही. उलट फडणवीसांची पकड या जिल्ह्यात वाढतच गेली. २०१४ ला भाजपने नगर जिल्ह्यात वैभव पिचड, स्नेहलता कोल्हे, शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, मोनिका राजळे, राम शिंदे असे तब्बल सहा आमदार निवडून आणले होते. २०१९ ला विखे भाजपमध्ये आल्यानंतर भाजपच्या पूर्वीच्या कट्टर कार्यकर्त्यांशी त्यांना लगेच जुळवून घेता आलं नाही. २०१९ ला जिल्ह्यात फक्त तीन आमदार राहिले. विद्यमान पाच आमदारांचा पराभव विखेंमुळेच झाला, असा आरोप त्यावेळी झाला. मात्र तरीही फडणवीसांनी फाटलेली मन सांधली, अन् हा वाद त्यावेळी मिटवला.
आता विखेंना भाजपमध्ये येऊन पाच वर्षे झालीत. या पाच वर्षात काहींनी विखेंशी जुळवून घेतलं, तर काही अजूनही नाराज आहेत. आताही भाजपमधील अंतर्गत वाद अनेकदा चव्हाट्यावर येतो, मात्र दरवेळी फडणवीस यशस्वी मध्यस्थी करतात. आताही नगर जिल्ह्यातले भाजपचे तीन दिग्गज नेते नाराज असल्याच्या बातम्या येऊ लागल्यात. हे तिन्ही नेते फडणवीसांचे कट्टर समर्थक आहेत. ज्या फडणवीसांनी त्यांना दरवेळी साथ दिली, तेच नेते यावेळी बंडखोरी करण्याच्या तयारीत दिसताहेत. पक्ष कोणताही असो, यावेळी विधानसभा निवडणूक लढवायचीच, असा या तिघांच्याही कार्यकर्त्यांचा निर्धार आहे. कार्यकर्त्यांच्या हट्टामुळे हे तिन्ही नेते भाजप सोडतील, अशी परिस्थिती सध्या तयार झाली आहे. हाच फडणवीसांसाठी मोठा धक्का समजला जातोय. भाजप सोडण्याच्या चर्चा असलेले पहिले कट्टर फडणवीस समर्थक आहेत,
वैभव पिचड
महायुतीच्या जागावाटपात स्टॅन्डिंग आमदारांचा पहिल्यांदा विचार होणार आहे. त्यामुळे महायुतीची अकोल्याची जागेवर यावेळी अजित पवार गटाचे विद्यमान आ. किरण लहामटे यांना पहिला दावा असणार आहे. त्यानाच ही जागा मिळण्याची शक्यताही आहे. असे झाले तर महायुतीत असणारे भाजपचे वैभव पिचड काय करणार, हा प्रश्न आहे. मात्र २१ ऑगस्टला पिचडांनी आपल्या समर्थकांचा मेळावा घेत, विधानसभा लढवायचीच, अशी घोषणा केली. लहामटेंचा प्रचार करणार नाही, असे त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट सांगून टाकले. त्यामुळे ही जागा लहामटेंसाठी सुटली तर पिचड भाजपची साथ सोडण्याची शक्यता वाढली आहे.
विवेक कोल्हे
अकोल्याची जशी स्थिती आहे, तशीच स्थिती कोपरगावातही आहे. कोपरगावची जागा महायुतीत विद्यमान आ. आशुतोष काळे यांना मिळण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात काळे विरुद्ध कोल्हे ही परंपरागत लढत होत आली आहे. त्यामुळे काळेंना ही जागा मिळाली तर कोल्हे भाजप सोडून दुसऱ्या पक्षाचा झेंडा हाती घेतील, अशी सर्वात जास्त शक्यता आहे. मध्यंतरी, गणेश परिसरातील त्यांच्या समर्थकांनी शरद पवारांची घेतलेली भेट असो किंवा काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांशी असलेले त्यांचे संबंध असो, गेल्या वर्षभरात कोल्हे हे विरोधकांच्या स्टेजवर अनेकदा दिसलेत. त्यामुळे ते यंदा फडणवीसांची साथ सोडतील, या शक्यताही वाढल्या आहेत.
राजेंद्र पिपाडा
शिर्डी विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. मात्र या मतदारसंघातील भाजपचे ज्येष्ठ नेते व कट्टर फडणवीस समर्थक राजेंद्र पिपाडा यांचे विखेंशी पटत नाही. २००९ साली विखे काँग्रेसमध्ये असताना पिपाडा यांनी भाजपकडून उमेदवारी करत विखेंना घाम फोडला होता. विखे भाजपमध्ये आल्यानंतरही या दोघांची मनं जुळलेली नाहीत. त्यामुळे यंदा विखेंविरोधात पुन्हा निवडणूक लढविण्याची घोषणा त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीकडून त्यांनी चाचपणी सुरु केल्याचेही दिसत आहे. त्यामुळेच आश्वी गटात झालेल्या मविआच्या विद्यमान खासदारांच्या कार्यक्रमात पिपाडा हे काँग्रेसच्या स्टेडवर दिसले होते. पिपाडा भाजप सोडणार असल्याच्या चर्चा, फडणवीसांसाठी मोठा धक्का समजला जातोय.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe