गुंतवणुकीचे सुरक्षितता आणि उत्तम परतावा या दृष्टिकोनातून गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी बँकांच्या मुदत ठेव योजनांना मोठ्या प्रमाणावर पसंती देतात. कारण बँक किंवा पोस्ट ऑफिस सारख्या योजनांमध्ये जर गुंतवणूक केली तर गुंतवणूकदाराला पैसा बुडेल याची चिंता राहत नाही आणि मिळणारा परताव्याची देखील हमी मिळते.
याकरिता बँकांच्या मुदत ठेव योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाते. आपल्याला माहित आहे की, देशातील स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच एचडीएफसी आणि ॲक्सिस बँक सारख्या मोठ्या बँका व त्यासोबत इतर सर्वच बँका मुदत ठेव योजना राबवतात व यामध्ये सर्वसामान्य ग्राहक ते ज्येष्ठ नागरिक यांनी केलेल्या एफडीवर वेगवेगळ्या पद्धतीचे व्याज दिले जाते.

ज्येष्ठ नागरिकांनी जर एफडी केली तर त्यांना जास्त व्याज बँकांच्या माध्यमातून मिळते. परंतु अशा मोठ्या बँकांच्या तुलनेमध्ये अनेक छोट्या बँक देखील ग्राहकांना मुदत ठेवींवर जास्त व्याजदर देतात.
अशा स्मॉल फायनान्स बँक जेष्ठ नागरिकांनी जर एफडी केली तर त्यावर 9.5% व्याज देत आहेत. त्यामुळे या लेखात आपण कोणत्या बँक एफडीवर जास्त परतावा देत आहेत याची माहिती आपण घेणार आहोत.
या स्मॉल फायनान्स बँक देतात एफडीवर सर्वाधिक व्याज
1- नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक– नॉर्थ इस्ट स्मॉल फायनान्स बँक ही महत्त्वाची स्मॉल फायनान्स बँक असून ही बँक सध्या एफडीवर देशात सर्वाधिक व्याजदर देत आहे. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने या बँकेत तीन वर्षाच्या कालावधीसाठी एफडी केली तर बँक त्याला वार्षिक 9.5 टक्के दराने व्याज देत आहे.
2- सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक– मुदत ठेवीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांच्या यादीमध्ये सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक दुसऱ्या क्रमांकावर आहे. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने तीन वर्षांच्या कालावधी करिता सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेमध्ये मुदत ठेव केली तर या ठेवीवर 9.1% व्याज ही बँक देत आहे.
3- उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक– ज्याप्रमाणे सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक तीन वर्षाच्या मुदत ठेवीवर व्याज देत आहे तितकेच व्याज उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक देखील देत आहे. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने तीन वर्षाच्या कालावधी करिता या बँकेत एफडी केली तर ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त 9.1% व्याज उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या माध्यमातून दिले जात आहे.
4- युनिटी स्मॉल फायनान्स बँक– युनिटी स्मॉल फायनान्स बँकेमध्ये देखील तीन वर्षाच्या कालावधी करिता एफडी केली तर ही बँक केलेल्या एफडीवर 8.5 टक्के व्याज देत आहे.
5- इक्विटास स्मॉल फायनान्स बँक– युनिटी स्मॉल फायनान्स बँकेप्रमाणे जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने तीन वर्षाच्या कालावधी करिता इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेमध्ये एफडी केली तर ही बँक देखील 8.5 टक्के इतके व्याज देत आहे.
6- एयु स्मॉल फायनान्स बँक– एयु स्मॉल फायनान्स बँक देखील एक महत्त्वाची बँक असून या बँकेत जर ज्येष्ठ नागरिकाने तीन वर्षाच्या कालावधी करिता एफडी केली तर ही बँक आठ टक्के व्याज देत आहे.