घरातील गहू,तांदूळ आणि डाळीमध्ये किडे होतात का? फक्त ‘या’ छोट्या गोष्टी करा आणि घरातील धान्य किडींपासून मुक्त ठेवा

घरामध्ये उडदाच्या डाळीपासून तर तूर डाळ, मूग डाळी सारखा डाळींचा देखील साठा केलेला असतो. परंतु किती जरी व्यवस्थित आणि सांभाळून ठेवले तरी बऱ्याचदा आपल्याला धान्याला कीड लागलेली दिसून येते यामुळे धान्य पोखरले जाते व ते वाया जाण्याची शक्यता असते.

Ajay Patil
Published:
grain storage tips

घरामध्ये आपण बऱ्याचदा तांदूळ आणि लागणारी गवत तसेच आवश्यक असलेले धान्य साठवून ठेवत असतो. तसेच घरामध्ये उडदाच्या डाळीपासून तर तूर डाळ, मूग डाळी सारखा डाळींचा देखील साठा केलेला असतो. परंतु किती जरी व्यवस्थित आणि सांभाळून ठेवले तरी बऱ्याचदा आपल्याला धान्याला कीड लागलेली दिसून येते यामुळे धान्य पोखरले जाते व ते वाया जाण्याची शक्यता असते.

अशाप्रकारे किडींपासून तांदूळ किंवा गहू कीडमुक्त ठेवण्यासाठी अनेक प्रकारची उपाय योजना प्रत्येक जण करत असतो. परंतु त्यामुळे काही फायदा होताना आपल्याला दिसून येत नाही.

परंतु त्याऐवजी जर काही नैसर्गिक आणि घरगुती उपाय केले तर यामुळे जास्त फायदा आपल्याला मिळू शकतो. या लेखामध्ये आपण अशा कोणती उपाय आहेत की ते केल्यामुळे धान्य तर सुरक्षित राहीलच परंतु त्यामध्ये किडे देखील येणार नाहीत याबद्दलची माहिती बघू.

 हे उपाय करा आणि घरातील धान्य कीडमुक्त ठेवा

1- तांदळामध्ये ओवा टाकणे आपल्याला माहित आहे की ओवा हे एक नैसर्गिक कीटकनाशक समजले जाते व तांदळाच्या डब्यामध्ये जर ओव्याचे काही दाने टाकले तर कीटक तांदुळाजवळ येत नाहीत व तांदळाला कीड लागण्याचा धोका कमी होतो.

2- वाळलेल्या लसूणच्या पाकळ्या तांदुळाच्या डब्यामध्ये जर वाळलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकल्या तर त्यातून निघणारा वासामुळे कीटक तांदळापासून दूर पळतात किंवा येतच नाहीत. लसूण असल्यामुळे कीटक तांदूळ मध्ये अंडी घालण्यास देखील धजावत नाहीत. यामुळे तांदूळ दीर्घ काळापर्यंत किडमुक्त राहण्यास मदत होते.

3- कडूलिंबाच्या पानांचा वापर कडुलिंबाच्या पानांमध्ये नैसर्गिक कीटकनाशक गुणधर्म असल्यामुळे तांदुळाच्या डब्यामध्ये जर कडुलिंबाची ताजी किंवा वाळलेली पाने टाकली तर तांदळापासून किडे दूर राहतात व तांदूळ सुरक्षित राहतो.

4- लाल सुक्या मिरच्यांचा वापर लाल वाळलेल्या मिरच्यांचा वापर देखील अळ्यांना रोखण्यासाठी प्रभावी आहे. या उपायांमध्ये तांदूळ किंवा धान्याच्या प्रत्येक थराला जर तुम्ही चार ते पाच लाल सुक्या मिरच्या ठेवल्या तर गहू असो किंवा तांदूळ तसेच डाळींमध्ये एकही किडा किंवा अळी दिसत नाही.

5- लवंग माचीसची काडी लवंगाच्या तिखटपणा या गुणधर्मामुळे तांदळात किडे पडत नाहीत. याकरिता तुम्हाला तांदुळ जेव्हा डब्यात तुम्ही साठवून ठेवाल तेव्हा त्यामध्ये दहा ते पंधरा लवंग ठेवून द्याव्यात. लवंगाचे तेल आणि तिखट वासामुळे किडे दूर राहतात.

तसेच डब्यामध्ये जर माचीसच्या काड्या ठेवल्या तरी यामुळे कीटक तांदुळा जवळ येत नाहीत.कारण माचिसमध्ये सल्फर असते व ते किंडीना सहन होत नाही.

6- तांदळाच्या डब्यात मिरींचा वापर तांदुळाच्या डब्यामध्ये जर तुम्ही काही मिरीची दाणे ठेवले तर त्याच्या वासामुळे कीटक दूर राहतात. ही पद्धत अतिशय सोपी असून मिरीचा वापर अशा पद्धतीने केल्याने तांदूळ किंवा इतर धान्य किडमुक्त राहते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe