Bank Account Rule: तुमचे देखील आहे का ‘या’ बँकांमध्ये खाते? वाचा खात्यामध्ये किती पैसे जमा करू शकतात? वाचा नियम

प्रत्येक व्यक्तीचे बँकेमध्ये खाते आहे व या खात्यामध्ये रोख स्वरूपामध्ये किती पैसे जमा करता येतात याबद्दल देखील नियम असून ते प्रत्येक खातेधारकाला माहीत असणे गरजेचे आहे.रोख रक्कम जमा करण्यासाठीची एक मर्यादा निश्चित केलेली आहे व त्यापेक्षा जर जास्त पैसे जमा करायचे असतील तर मात्र चेक किंवा डिजिटल मार्गाचा वापर करणे गरजेचे असते.

Published on -

Bank Account Rule:- देशामध्ये टॅक्स चुकवणे म्हणजेच कर चोरी तसेच मोठ्या प्रमाणावर होणारा बेहिशोबी पैशांचा व्यवहार म्हणजेच काळा पैसा संबंधी व्यवहारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अनेक पावले उचलण्यात आलेली आहेत.

याच पावलांचा भाग म्हणून बँका खात्यामध्ये रोख रक्कम किती जमा करता येऊ शकते किंवा किती रकमेपर्यंत रोखीचा व्यवहार करणे शक्य आहे त्यावर देखील अनेक प्रकारचे नियम आता बनवण्यात आले असून जेणेकरून चुकीच्या व्यवहारांवर लक्ष ठेवता येईल हा त्यामागचा उद्देश आहे.

आता जर आपण बघितले तर प्रत्येक व्यक्तीचे बँकेमध्ये खाते आहे व या खात्यामध्ये रोख स्वरूपामध्ये किती पैसे जमा करता येतात याबद्दल देखील नियम असून ते प्रत्येक खातेधारकाला माहीत असणे गरजेचे आहे.

रोख रक्कम जमा करण्यासाठीची एक मर्यादा निश्चित केलेली आहे व त्यापेक्षा जर जास्त पैसे जमा करायचे असतील तर मात्र चेक किंवा डिजिटल मार्गाचा वापर करणे गरजेचे असते.

रोख मर्यादा कमी व्हावी याकरिता हा आदेश जारी करण्यात आला असून या माध्यमातून प्रत्येक व्यवहारावर बारीक नजर ठेवता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे कोणत्या बँकेत रोख स्वरूपात किती रक्कम जमा करता येते याबद्दलची माहिती आपण बघू.

 कोणत्या बँकेमध्ये किती पैसे रोख स्वरूपात जमा करता येतात?

1- स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्हाला जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रोख रक्कम जमा करायचे असेल तर तिची मर्यादा 49 हजार 999 रुपये इतकी आहे. त्या प्रमाणात रक्कम जमा करण्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड किंवा डेबिट कार्डची गरज भासत नाही. जर तुमचे खाते पॅन कार्डशी लिंक असेल आणि तुम्ही पॅन बँकेत जमा केले असेल तर तुम्ही एका वेळी दोन लाख रुपये जमा करू शकता.

2- बँक ऑफ बडोदा एसबीआय आणि बँक ऑफ बडोदा यामध्ये रोख रक्कम जमा करण्याची मर्यादा एक सारखीच आहे. तुमच्याकडे पॅन कार्ड आणि डेबिट कार्ड नसेल व त्याशिवाय पैसे जमा करत असाल तर तुम्हाला 49 हजार 999 रुपये जमा करता येतात.

परंतु पॅन कार्ड असेल तर एका वेळी दोन लाख रुपयांपर्यंत रोख रक्कम तुम्हाला जमा करता येते. जर बँक ऑफ बडोदामध्ये पैसे जमा करण्यासाठीची कार्डलेस मर्यादा बघितली तर ती एका दिवसात फक्त वीस हजार रुपये आहे.

3- पंजाब नॅशनल बँक या बँकेत रोख रक्कम जमा करण्याची मर्यादा खूपच कमी आहे. या बँकेत तुम्ही कॅश मशीनद्वारे एकावेळी एक लाख रुपये किंवा दोनशेच्या नोटा जमा करू शकता.

तुमचं पॅन आणि बँक खाते लिंक असेल तर एका वेळी एक लाख रुपये जमा करता येऊ शकतात. नाहीतर एकावेळी फक्त 49 हजार 999 रुपये जमा करता येतील.

4- एचडीएफसी बँक या बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा 25000 आणि दिवसाला ठेव मर्यादा दोन लाख रुपये आहे. या बँकेत असलेल्या चालू खात्यातून तुम्ही एका दिवसात एक लाख रुपये काढू शकतात.

या बँकेत ठेवीची मर्यादा सहा लाख रुपये आहे. तुम्हाला जर कार्ड आधारित ठेव जमा करायची असेल तर ती तुमच्या बचत खात्यात एक लाख रुपये पर्यंत जमा करू शकता. कार्डसह दैनंदिन मर्यादा बचत खात्यात दोन लाख रुपये आणि चालू खात्यात सहा लाख रुपये आहे.

5- युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेत तुम्ही कार्डशिवाय रोख रक्कम 49 हजार 999 रुपये व पॅन कार्डसह एक लाख रुपये ठेवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News