कारमध्ये चुकून देखील इन्स्टॉल करू नका ‘या’ ॲक्सेसरीज! कारचे मायलेज होते कमी आणि खर्च होतो जास्त पैसा

आपल्याकडे कुठलीही कार असेल तर ती कार किती मायलेज देते हे सगळ्यात महत्त्वाचे महत्त्वाचे असते. कारण कारच्या मायलेजचा परिणाम हा आपल्या खिशावर म्हणजेच पैशांवर होत असल्यामुळे मायलेजला अतिशय महत्त्व असते. कारचे जितके मायलेज जास्त तितका आर्थिक दृष्टिकोनातून आपला फायदा होत असतो हे आपल्याला माहिती आहे.

Ajay Patil
Published:
car mileage tips

Car Mileage Tips:- आपल्याकडे कुठलीही कार असेल तर ती कार किती मायलेज देते हे सगळ्यात महत्त्वाचे महत्त्वाचे असते. कारण कारच्या मायलेजचा परिणाम हा आपल्या खिशावर म्हणजेच पैशांवर होत असल्यामुळे मायलेजला अतिशय महत्त्व असते. कारचे जितके मायलेज जास्त तितका आर्थिक दृष्टिकोनातून आपला फायदा होत असतो हे आपल्याला माहिती आहे.

परंतु बऱ्याचदा जेव्हा आपण कार विकत घेतो तेव्हा ती आकर्षक आणि चांगली दिसावी म्हणून कारमध्ये काही ॲक्सेसरीज कनेक्ट करतो. तसे पाहिला गेले तर असे ॲक्सेसरीज या काही सोयी उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून फायद्याच्या ठरतात.

परंतु कारच्या मायलेजच्या बाबतीत मात्र ते नुकसान करतात. काही ॲक्सेसरीजमुळे कारचे मायलेज कमी होऊ शकते. त्यामुळे या लेखात आपण माहिती घेणार आहोत की अशा कोणत्या ॲक्सेसरीज आहेत ज्यामुळे कारचे मायलेज कमी होते? याबद्दल थोडक्यात माहिती बघू.

या ॲक्सेसरीज कारचे मायलेज करतात कमी

1- लो प्रोफाइल टायर- या प्रकारचे टायर दिसायला खूप आकर्षक दिसतात व त्यामुळे बरेच जण लो प्रोफाइल टायरचा वापर कारसाठी करतात. परंतु अशा प्रकारचे टायर्स इंजिनवर जास्त दाब देतात आणि कार चालवण्यासाठी जास्त प्रमाणात इंधनाचा वापर होतो. त्यामुळे कारचे मायलेज कमी होण्याची शक्यता असते.

2- जोरात आवाज करणारा सायलेन्सर- बऱ्याच व्यक्तींना गाडीचा आवाज वाढवण्यासाठी मोठ्या आवाजाचा सायलेन्सर लावण्याची आवड असते. पण यामुळे कारचे मायलेज कमी होऊ शकते.

अशा प्रकारच्या मोठ्या आवाजातील सायलेन्सर मुळे इंजिनमधून जो काही वायू बाहेर पडतो त्याच्या प्रवाहावर परिणाम होतो व त्यामुळे इंजिनवर अतिरिक्त दाब येतो आणि इंधनाचा वापर वाढतो व मायलेज कमी होते.

3- बास ट्यूबचा वापर- बरेच व्यक्ती कारच्या ऑडिओ सिस्टमचा आवाज सुधारण्यासाठी बास ट्यूब इंस्टॉल करतात. परंतु अशा प्रकारचा बास ट्यूब चालवण्यासाठी अधिक पावर आवश्यक असते व ज्यामुळे इंजिनवर अतिरिक्त भार पडतो आणि इंधनाचा वापर वाढून मायलेज कमी होते.

4- मोठ्या मिश्र धातूंची चाके- बरेचजण कारला स्पोर्टी लूक मिळावा याकरिता मोठ्या अलॉय व्हीलचा वापर करतात. परंतु ते कारचे मायलेज कमी करू शकतात. या प्रकारच्या चाकांचे वजन जास्त असते

व साहजिकच कारला पुढे नेण्यासाठी इंजिनला अधिक मेहनत करावी लागते व इंधनाचा वापर जास्त होतो व या व्यतिरिक्त ही चाके अधिक हवा प्रतिरोध देतात त्यामुळे इंधनाचा वापर वाढून मायलेज कमी होते.

5- गाडीवर सामान ठेवण्यासाठी वापरला जाणारा रॅक- गाडीवर सामान ठेवता यावा याकरिता बरेच जण रूफ रॅक गाडीवर बसवतात. परंतु अशाप्रकारे तुम्ही कारच्या रूफवरील रॅकवर जड वस्तू सतत ठेवत असाल तर त्यामुळे कारचे मायलेज कमी होते.

जास्त वजन ठेवल्यामुळे गाडीचे वजन वाढते व त्यामुळे इंजिनला गाडी हलवण्यासाठी किंवा गाडीला गती देण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते व इंधनाचा वापर वाढून कारचे मायलेज कमी होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe