Driving License: भारतातील ड्रायव्हिंग लायसन्सवर तुम्ही ‘या’ देशांमध्ये करू शकता ड्रायव्हिंग! वाचा देशांची यादी

Published on -

Driving License:- प्रवास करताना आपण जेव्हा रस्त्यावरून प्रवास करतो किंवा वाहन चालवतो तेव्हा आपल्याला वाहतुकीचे अनेक प्रकारचे नियम फॉलो करणे खूप गरजेचे असते. तुम्ही वाहतुकीचे नियम मोडले तर दंडात्मक कारवाई केली जाते हे आपल्याला माहित आहे.

तसेच रस्त्यावर वाहन चालवताना त्याचा वैध परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स असणे खूप गरजेचे असते. तुम्ही वाहन चालवत आहात आणि तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तरी देखील तुमच्यावर दंडात्मक कारवाई होते हे देखील आपल्याला माहिती आहे.

त्यामुळे वाहन चालवण्यासाठी वाहन चालवण्याचा परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स असणे खूप गरजेचे असते. म्हणतो आपले जे काही भारतातील ड्रायव्हिंग लायसन्स आहे याचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे भारतातच नाही तर जगातील काही देशांमध्ये देखील चालते. म्हणजे जगातील काही देशांमध्ये भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स हे वैध ठरते. त्यामुळे या लेखामध्ये आपण जगातील असे काही देश पाहू या ठिकाणी भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स वैध ठरते.

 या देशांमध्ये वैध भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स

1- न्यूझीलंड जगातील न्युझीलँड या देशांमध्ये भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स हे वैध ठरते.या ठिकाणी तुमचा वाहन परवाना हा एक वर्षापर्यंत चालतो. समजा तुमचे वय किमान 21 व तुमच्याकडे इंग्रजीमध्ये भारतीय ड्रायव्हिंग लायसन असेल तर न्यूझीलंड येथे त्याचा वापर करू शकता.

2- दक्षिण आफ्रिका तुम्ही आपल्या भारतीय वाहन परवानाचा वापर दक्षिण आफ्रिकेत करू शकतात व त्या ठिकाणी असलेली चांगली आकर्षक शहरे पाहू शकतात.

तुमच्याकडील भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स इंग्रजीमध्ये असेल तर दक्षिण आफ्रिकेचे अनेक सुंदर शहरांमध्ये फिरू शकतात व त्या ठिकाणी वाहन चालवण्याच्या स्वातंत्र्याचा आनंद घेऊ शकतात. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग आणि कॅपटाऊन सारखी शहरे खूप सांस्कृतिक दृष्टीने समृद्ध असून त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकतात.

3- युनायटेड किंग्डम तुम्ही भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स युनायटेड किंगडम म्हणजेच युकेच्या रस्त्यांवर देखील वापरू शकता व या ठिकाणी ते एक वर्षासाठी वैध आहे.

परंतु या ठिकाणी यासंबंधीचा एक नियम म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स वर नमूद केलेले जे ठिकाण आहे त्या ठिकाणी तुम्हाला वाहन चालवण्याची तुम्हाला परवानगी मिळेल. लंडन शहराच्या ऐतिहासिक रस्ते ते स्कॉटिश हायलँडच्या नयनरम्य सौंदर्य तुम्हाला या ठिकाणी अनुभवता येईल.

4- स्वीडन भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स चा वापर तुम्ही स्वीडन या देशांमध्ये देखील करू शकतात. फक्त तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स हे इंग्रजी, फ्रेंच तसेच स्वीडिश, जर्मन किंवा नर्विजन यापैकी एका भाषेमध्ये छापलेले असणे गरजेचे आहे. स्वीडनमध्ये तुम्ही या ड्रायव्हिंग लायसन्स चा वापर करून वाहन चालवू शकतात व त्या ठिकाणी असलेले अनेक लँडस्केप व घनदाट जंगले पाहू शकतात.

5- स्पेन या ठिकाणी तुम्ही आवश्यक रेसिडेन्सी नोंदणी पूर्ण केल्यानंतर भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स सह स्पेन मध्ये रोड ट्रिप करू शकतात. परंतु काही ठिकाणी तुम्हाला तुमच्या ओळखीचा पुरावा सादर करण्याची आवश्यकता या ठिकाणी असू शकते.

त्यामुळे ते सहजपणे उपलब्ध असण्याची खात्री करणे गरजेचे आहे. स्पेन मध्ये तुम्ही बार्सीलोनाचे ऐतिहासिक रस्त्यांपासून तर माद्रीदच्या दोलायमान नाईट लाईफ पर्यंत सांस्कृतिक समृद्धता अनुभऊ शकतात. या ठिकाणी असलेल्या सुंदर आणि वैविध्यपूर्ण पाककृतींचा आस्वाद व सुंदर किनारी प्रदेश व त्यासोबत अनेक नयनरम्य दृश्य पाहू शकतात.

6- जर्मनी भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स जर्मनीमध्ये सहा महिन्यांकरिता वैध ठरते. जर्मन लोक हे रस्त्याच्या उजव्या बाजूने वाहन चालवतात व त्यासाठी आपल्याला आपल्याकडची ड्रायव्हिंग लायसन ची प्रत ही जर्मन भाषांतरित असावी लागते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe