Drone Subsidy :- कृषी आणि कृषी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून केंद्र व राज्य सरकारच्या अनेक महत्त्वपूर्ण योजना असून या योजनांच्या माध्यमातून शेतीसाठी आवश्यक घटकांसाठी आर्थिक मदत करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.
यातील बऱ्याच योजना या सूक्ष्मसिंचनाशी निगडित आहेत तर काही योजना या कृषी यांत्रिकीकरणाशी संबंधित आहेत. यामध्ये जर आपण कृषी यांत्रिकीकरणाचा विचार केला तर आता शेतीच्या प्रत्येक कामामध्ये यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांना यंत्र खरेदीवर कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत देखील विविध यंत्राकरता अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

याच अनुषंगाने आता पिकांवर कीटकनाशकांची फवारणीकरिता ड्रोन वापरायला प्रोत्साहन मिळावे म्हणून ड्रोन अनुदान योजना देखील शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आले आहे. याकरिता जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये अर्ज करणे गरजेचे आहे.
अशा प्रकारच्या यंत्रांमुळे शेतीमधील जे काही कामे असतात ते अगदी सोप्या पद्धतीने होण्यास शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर या माध्यमातून मदत होणार असून त्यामुळेच ड्रोनचा वापर शेतीसाठी करण्याकरिता शासनाकडून हे अनुदान योजनेचे पाऊल उचलण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे ड्रोन खरेदीवर जर अनुदान घ्यायचे असेल तर त्या अगोदर संबंधितांना पूर्वसंमती घ्यावी लागणार आहे.
शेतीसाठी ड्रोनचा फायदा कसा होणार?
1- ड्रोनचा वापर करून शेतकऱ्यांना शेतातील पिकांची पाहणी करता येणार असून या पाणी दरम्यान पिकांवर आलेल्या रोगाची तपासणी करण्यासाठी देखील ड्रोन फायद्याचा ठरणार आहे.
2- पिकांवर फवारणी करण्याकरिता अगदी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त क्षेत्रावर ड्रोनच्या साह्याने फवारणी करता येणे शक्य होणार आहे.
3- ड्रोनला जे काही कॅमेरे लावलेले असतात त्यांच्या मदतीने पिकांवर आलेले विविध कीड व रोगांची माहिती देखील ठेवणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे. ड्रोन अनुदान योजनेमध्ये ड्रोन खरेदीवर किती मिळणार अनुदान? 1- शेतकरी उत्पादक संस्थांना ड्रोन खरेदीवर 75 टक्के अनुदान( म्हणजे सात लाख 50 हजार रुपये) मिळणार आहे. 2- विद्यापीठे व सरकारी संस्थाना शंभर टक्के अनुदान म्हणजेच दहा लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे. 3- कृषी पदवीधारकांना ड्रोन खरेदीवर पाच लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे.
4- इतर शेतकऱ्यांना 40% किंवा 4 लाख रुपये अनुदान ड्रोन खरेदीवर मिळणार आहे. ड्रोन अनुदान योजनेकरिता कोणाशी संपर्क साधावा? तुम्हाला देखील ड्रोन खरेदी अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याच्या अधिक माहिती करिता तुम्ही संबंधित कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय या ठिकाणी संपर्क साधून या योजनेबद्दलची अधिकची माहिती तुम्ही घेऊ शकतात.
शासनाकडून प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध
ड्रोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकांवर फवारणी करता यावी याचे व फवारणी करताना ड्रोन कशाप्रकारे हाताळावा याबद्दलची संपूर्ण माहिती शासनाकडून देण्यात येणार आहे. तसेच फवारणी करताना कशाप्रकारे काळजी घ्यावी याचे देखील प्रशिक्षण शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.