Education Tips: लाखो रुपये पगार हवी असेल तर घ्याव्या लागतील ‘या’ पदव्या! केलेला अभ्यास नाही जाणार वाया, जाणून घ्या माहिती

प्रत्येक विद्यार्थ्यांची अगदी शालेय जीवनापासून इच्छा असते किंवा त्यांचे एक ध्येय असते की उच्च शिक्षण घेऊन चांगल्या विषयात पदवी संपादन करून उत्तम पगाराची नोकरी मिळावी व आयुष्यामध्ये उत्तम प्रकारे सेटल व्हावे.

Published on -

Education Tips:- प्रत्येक विद्यार्थ्यांची अगदी शालेय जीवनापासून इच्छा असते किंवा त्यांचे एक ध्येय असते की उच्च शिक्षण घेऊन चांगल्या विषयात पदवी संपादन करून उत्तम पगाराची नोकरी मिळावी व आयुष्यामध्ये उत्तम प्रकारे सेटल व्हावे.

त्यामुळे दहावी आणि बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर बरेच विद्यार्थी आणि पालक वर्ग नेमक्या कोणत्या पदवी अभ्यासक्रमाला ऍडमिशन घ्यावे याबाबतीत खूप गंभीरपणे विचार करत असतात.

कारण एकदा अभ्यासक्रमाची निवड झाली तर तिचा प्रभाव हा संपूर्ण आयुष्याच्या करिअरवर पडणारा असतो. त्यामुळे कुठल्याही पदवी अभ्यासक्रमाची निवड करताना तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळेल व संधी देखील भरपूर उपलब्ध असतील या गोष्टींचा विचार करणे खूप गरजेचे असते. या अनुषंगाने आपण या लेखात असे काही कोर्सेस बघणार आहोत जे तुम्हाला लाखो रुपये पगाराची नोकरी मिळवून देतील.

या क्षेत्रातील पदवी मिळवून देईल तुम्हाला लाखोंचे पॅकेज

1- पेट्रोलियम इंजिनिअरिंग भारतामध्ये पेट्रोलियम इंजिनियर्सची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. भारतातच नाही तर जगाच्या पाठीवरील ज्या देशांमध्ये तेल आणि गॅस उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते अशा देशांमध्ये देखील पेट्रोलियम इंजिनियर्सला मागणी असते.

पेट्रोलियम इंजिनिअर हे जमिनीतून तेल आणि गॅस काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षित असतात व अशा कामांसाठीच त्यांना तयार केले जाते. त्यामुळे पेट्रोलियम इंजिनिअरिंग हा पर्याय विद्यार्थ्यांसाठी फायद्याचे ठरू शकतो.

2- चार्टर्ड अकाउंटंट आपल्याला माहित आहे की चार्टर्ड अकाउंटंचे काम हे कुठल्याही संस्था आणि त्या संस्थेशी संबंधित असलेल्या आर्थिक बाबी यांच्याशी संबंधित असते.

काही कंपनीच्या किंवा संस्थेच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित असलेली सर्व कामे चार्टर्ड अकाउंटंटला पार पाडावी लागतात. इतकेच नाहीतर इन्कम टॅक्सच्या संबंधित महत्त्वाची कामे व ऑडिटिंग सारखी कामे देखील सीए अर्थ चार्टर्ड अकाउंटंटला करावी लागतात.

चार्टर्ड अकाउंटंटचा जॉब हा देशातील सर्वात जास्त पगार मिळवणाऱ्या पदांपैकी किंवा जॉब पैकी एक मानला जातो. कोणत्याही चार्टर्ड अकाउंटंटला सुरुवातीलाच वर्षाला सहा ते सात लाख रुपयांचे पॅकेज मिळू शकते.अनुभव मिळाल्यानंतर तीस लाख रुपये वार्षिक पॅकेज पर्यंत देखील वाढ होते.

3- एरोनॉटिकल इंजिनिअर स्पेस सायन्स, अंतराळ विज्ञान आणि त्यासोबतच एरोनॉटिकल इंजिनियर्स यांची मागणी देखील वाढत जाणारीच आहे. भारतातच नाही तर परदेशात देखील एरोनॉटिकल इंजिनियर्सला प्रचंड प्रमाणात संधी उपलब्ध असून हे इंजिनियर्स विमान तसेच अंतराळयान व त्यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या प्रणालींचे म्हणजे सिस्टमचे डिझाईन तसेच त्यांचा विकास,परीक्षण व त्यांचे उत्पादन इत्यादी संबंधी कामे करतात.

4- कॉम्प्युटर सायन्स आणि इंजीनियरिंग  कॉम्प्युटर सायन्स आणि इंजीनियरिंग पदवीधारकांना देखील खूप मोठी मागणी असून सॉफ्टवेअर डिझाईन आणि डेव्हलप करण्याचे महत्त्वाचे काम कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरच्या माध्यमातून पार पडले जाते.

हे इंजिनियर्स एखादी सिस्टम बनवू शकतात आणि डाटा देखील मॅनेज करू शकतात. यामध्ये पदवी घेतल्यास देखील लाखो रुपयांचे पॅकेज मिळू शकते.

5- डाटा सायन्स डाटा सायन्स हे देखील एक महत्वपूर्ण क्षेत्र असून याची देखील मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. एखाद्या समस्येवर उपाय शोधणे आणि त्यावर निर्णय घेण्याची क्षमता सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डाटा गोळा करणे तसेच त्या डाट्याचे विश्लेषण करण्याचे काम डाटा सायन्स मध्ये पदवी घेतलेल्या उमेदवारांचे असते.

डाटा सायंटिस्ट म्हणजेच डाटा सायन्स मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची मागणी प्रत्येक प्रकारच्या उद्योगांमध्ये वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रम देखील फायद्याचा ठरेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!