Epfo News: ईपीएफओ कर्मचाऱ्यांकरिता आनंदाची बातमी! ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार महिन्याला वाढीव पगार, कारण की…

Ajay Patil
Published:
epfo update

Epfo News:- देशामध्ये अनेक खाजगी आणि सरकारी क्षेत्रामध्ये काम करणारे कोट्यावधी कर्मचारी हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य तथा कर्मचारी आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या  भविष्य निर्वाह निधी फंडाचे व्यवस्थापन केले जाते हे आपल्याला माहिती आहे

व त्यासंबंधीचे सगळे निर्णय हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओच्या माध्यमातून घेतले जातात. अगदी याचप्रमाणे आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून यामुळे काही कर्मचाऱ्यांचा मासिक पगार वाढू शकतो.

 एपीएफओने केली गट विमा योजनेअंतर्गत होणारी कपात बंद

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जे कर्मचारी 01 सप्टेंबर 2013 नंतर नोकरीवर रुजू झालेले आहेत अशा कर्मचाऱ्यांचा मासिक पगार वाढण्याची शक्यता आहे. कारण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 1 सप्टेंबर 2013 नंतर नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची गट विमा योजना अर्थात जीआयएस अंतर्गत होणारी कपात त्वरित प्रभावाने बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे.

याबाबत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 21 जून 2024 रोजी परिपत्रक काढले व त्यामध्ये म्हटले आहे की एक सप्टेंबर 2013 नंतर ईपीएफओ मध्ये सामील झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारातून आता गट विमा योजना अंतर्गत म्हणजेच जीआयएस अंतर्गत होणारी कपात त्वरित थांबवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

म्हणजेच सोप्या सुद्धा सांगायचे म्हटले म्हणजे एक सप्टेंबर 2013 नंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओमध्ये सामील होणारे कर्मचारी यापुढे गट विमा योजना अर्थात जीआयएस अंतर्गत येणार नाहीत आणि त्यांच्या पगारातून आधी यासाठी केलेली कपात देखील परत केली जाईल. त्यामुळे ही पगारातून होणारी कपात बंद केल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल अशी शक्यता आहे.

याबाबत तज्ञांचे म्हणणे आहे की, ज्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जीआयएस बंद करण्यात आला आहेत त्यांच्या निव्वळ इन हॅन्ड म्हणजे हातात जो पगार पडतो त्यामध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे आता जीआयएस अंतर्गत पगारातून जी काही कपात केली जात होती ती बंद केल्यामुळे एक सप्टेंबर 2013 नंतर रुजू झाल्या कर्मचाऱ्यांच्या टेक होम सॅलरी म्हणजे सगळे कपात होऊन हातात मिळणाऱ्या पगारात वाढ होणार आहे.

या अगोदर जीआयएस ला निधी मिळावा याकरिता कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारातून रक्कम कपात केली जात होती व ती आता बंद करण्यात आल्यामुळे एक सप्टेंबर 2013 नंतर रुजू झालेला कर्मचाऱ्यांच्या निव्वळ पगारामध्ये वाढ होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe