EPFO Scheme : पहिल्यांदाच घर घेऊ इच्छिणाऱ्या देशभरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे केंद्रातील सरकारकडून आता पीएफ च्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच घर घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना डाऊन पेमेंटच टेन्शन राहणार नाही.
खरे तर घर खरेदीसाठी 20% डाऊन पेमेंट द्यावे लागते आणि सरकारच्या यामुळे आता पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्या लोकांना 20 टक्के रक्कम देण्याच टेन्शन राहणार नाही.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्रातील सरकारच्या अधिनस्त येणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थातच ईपीएफओकडून आता पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे.
दरम्यान आता आपण ईपीएफओ कडून नेमका काय निर्णय घेण्यात आला आहे आणि याचा सर्वसामान्य पगारदार लोकांना काय फायदा होईल याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.
EPFO ने काय निर्णय घेतलाय?
EPFO ने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार, कर्मचाऱ्यांना आता पहिल्यांदा घर खरेदी करण्यासाठी त्यांच्या पीएफ खात्यातून 90% पर्यंतची रक्कम काढता येणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे पीएफ अकाउंट तीन वर्षे जुनी आहे त्यांना घर खरेदीसाठी 90% पर्यंतची रक्कम काढता येईल असा नवा नियम आता लागू करण्यात आला असून या निर्णयामुळे ज्या लोकांना पहिल्यांदा घर घ्यायचे आहे त्यांची डाऊन पेमेंटची कटकट मिटणार अशी आशा आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की आधीच्या नियमानुसार ईपीएफओ च्या सदस्यांना पाच वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर घर खरेदीसाठी पीएफ अकाउंट मधून पैसे काढता येत होते.
पण कर्मचारी आता त्यांचे पहिले घर खरेदी करण्यासाठी, घर बांधण्यासाठी किंवा गृहकर्जाचा ईएमआय भरण्यासाठी तीन वर्षे जुने असणाऱ्या आपल्या खात्यातून 90 टक्के रक्कम काढू शकतील.
दरम्यान नव्या निर्णयानुसार या सुविधेचा लाभ ईपीएफओच्या सदस्यांना केवळ एकदाच घेता येणार आहे. हा बदल ईपीएफ योजनेच्या 1952 च्या परिच्छेद 68- बीडीअंतर्गत घेण्यात आलेला आहे असे देखील यात स्पष्ट करण्यात आले आहे.
PF च्या खात्यात किती रक्कम जमा केली जाते?
EPFO सदस्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनातून आणि महागाई भत्ता मधून एकूण 12 टक्के रक्कम त्यांच्या पीएफ अकाउंट मध्ये जमा केली जाते. महत्त्वाची बाब अशी की कर्मचाऱ्यांच्या पगारातून जेवढी रक्कम कट होते तेवढीच रक्कम कंपनीकडूनही पीएफ अकाउंट मध्ये जमा केली जाते. दरम्यान पीएफ अकाउंट मध्ये जमा असणाऱ्या या पैशांवर सध्या स्थितीला EPFO कडून 8.25 टक्के दराने व्याज दिले जात आहे.