Tourist Places In India:- सध्या जर आपण उत्तरेपासून बघितले तर संपूर्ण भारतामध्ये साधारणपणे कडाक्याची थंडी जाणवत आहे व या थंडीच्या दिवसांमध्ये प्रवास करण्याची मजा काही औरच असते. बऱ्याच जणांना फिरायची मात्र खूप आवड असते. परंतु थंडीमुळे त्यांना शक्य होत नाही किंवा थंडी त्यांना सहन होत नसल्यामुळे त्यांना त्यांचे फिरण्याचे प्लान रद्द करावे लागतात.
परंतु तुम्हाला या हिवाळ्याच्या कालावधीमध्ये फिरायला जायचे आहे परंतु उबदार वातावरण हवे असेल तर भारतामध्ये काही राज्य अशी आहेत की त्या ठिकाणी थंडीचे प्रमाण खूपच कमी असते किंवा अजिबातच नाही.

म्हणजे तुम्हाला थंडीच्या कालावधीमध्ये या ठिकाणी उबदारपणा जाणवू शकतो. त्यामुळे तुम्हाला देखील जर या हिवाळ्याच्या थंडीमध्ये जर उन्हाळ्याच्या उबदारपणाचा अनुभव घ्यायचा असेल व फिरण्याची मजा अनुभवायची असेल तर तुम्ही भारतातील काही ठिकाणांना भेट देऊ शकतात व तुमच्या फिरण्याचा आनंद द्विगुणीत करू शकतात.
हिवाळ्यामध्ये फिरण्यासाठी ही ठिकाणे आहेत परफेक्ट
1- कच्छचे रण( गुजरात)- जेव्हा उत्तरेकडील बिहार तसेच झारखंड, दिल्ली आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमध्ये हिवाळ्यात ज्या ठिकाणी तापमान खूप कमी असते. त्याचवेळी मात्र कच्छच्या रणामध्ये तापमान 27 ते 30° वर असते. अशा परिस्थितीमध्ये डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात या ठिकाणी पर्यटकांनी नक्कीच भेट देणे गरजेचे आहे.
तसे पाहायला गेले तर कच्छच्या रणमध्ये पर्यटन हंगाम हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत असतो या ठिकाणी भारतीयच नाहीतर अनेक संख्येने परदेशी पर्यटक देखील येतात. या ठिकाणी तुम्ही उंट सवारी सह स्वादिष्ट जेवणाचा आनंद देखील घेऊ शकतात.
2- कुर्ग( कर्नाटक)- हिवाळ्यामध्ये कर्नाटक राज्यातील कुर्ग हा परिसर देखील पर्यटनासाठी खूप महत्त्वाचा आहे. हिवाळ्यामध्ये या ठिकाणाचे तापमान भारतातील इतर भागांपेक्षा जास्त असते व तुम्हाला सुंदर अशी नैसर्गिक सौंदर्य आणि दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतात.
जे मनाला अतिशय विलोभनीय व भुरळ घालणारे असतात. या ठिकाणी असणारे कॉफीची झाडे तसेच चहाच्या बागा आणि हिरवीगार झाडांनी नटलेल्या दऱ्याखोऱ्या पाण्याचे मजा काही औरच असते.
3- गोवा- तसेच हिवाळ्यात फिरण्यासाठी गोवा राज्य देखील खूपच उत्तम असे ठिकाण आहे. हिवाळ्याच्या कडाक्याच्या थंडीत देखील गोव्याचे तापमान भारतातील इतर राज्यांपेक्षा जास्त असते.या ठिकाणी आपल्याला उष्णता जाणवते.
त्याला माहित आहे की गोव्यात गेल्यावर समुद्रकिनाऱ्यावर मौजमजा करता येते व आपण त्या पाण्यासोबत मनसोक्त क्रीडा करू शकतो व सुंदर क्षण अनुभवू शकतो.
4- जैसलमेर( राजस्थान)- हिवाळ्याच्या कालावधीत तुम्ही राजस्थान राज्यातील जैसलमेर जिल्ह्याला भेट देऊ शकतात व हे शहर गोल्डन सिटी म्हणून भारतात ओळखले जाते. जैसलमेरला भेट दिली तर त्या ठिकाणी असलेले सुंदर असे तलाव तसेच ऐतिहासिक किल्ले,
राजवाडे आणि जैन मंदिर पाहायला मिळतात. तसेच येथील तापमान जर बघितले तर भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत थंडीच्या दिवसात देखील या ठिकाणी तापमान जास्त राहते.
5- कोवलम( केरळ)- दक्षिण भारतातील एक सुंदर राज्य म्हणून केरळ ओळखले जाते. या राज्याला देखील विस्तृत समुद्रकिनारा लाभला आहे व निसर्गसौंदर्याने देखील मुक्तपणे उधळण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते.
थंडीच्या दिवसात जर तुम्हाला उबदार वातावरणाचा अनुभव घ्यायचा असेल तर केरळमधील कोवलम हे ठिकाण खूप उत्तम असा पर्याय आहे. या ठिकाणचे तापमान भारतातील अनेक राज्यांपेक्षा जास्त असून या ठिकाणाचे समुद्रकिनारे देखील खूप प्रसिद्ध आहेत.