कौतुकास्पद! प्रयोगशील शेतकरी दांपत्याने शिमला मिरचीच्या शेतीतून साधली आर्थिक प्रगती; दीड महिन्यात एका एकरातून मिळवले 2 लाखाचे उत्पादन, पहा…

Ajay Patil
Published:
Farmer Success Story

Farmer Success Story : शेतीमध्ये योग्य नियोजन केले जिद्द ठेवली आणि मेहनत घेतली तर कमी जमिनीतूनही लाखोंची कमाई सहजतेने केली जाऊ शकते. वास्तविक शेतीचा व्यवसाय हा निसर्गावर आधारित आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना अनेकदा कष्ट करूनही अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही.

अनेकदा तर उत्पादित केलेल्या शेतमाला बाजारात चांगला भाव मिळत नाही परिणामी शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होते. शेतीतून फारसे उत्पादन मिळत नसल्याने शेतकरी बांधव कर्जबाजारी देखील होतो. मात्र या विपरीत परिस्थितीमध्ये देखील काही शेतकऱ्यांनी आपल्या नवख्या प्रयोगाच्या माध्यमातून चांगली कमाई करून दाखवली आहे.

छत्रपती संभाजीनगर महाराज जिल्ह्यातील पैठण तालुक्याच्या एका शेतकरी दांपत्याने देखील अशीच किमया साधली आहे. या शेतकरी दांपत्याने आधुनिक पद्धतीने शेती करत शिमला मिरचीच्या लागवडीतून मात्र एक एकरात तब्बल दोन लाखांचे उत्पन्न अवघ्या दीड महिन्यांच्या कालावधीमध्ये मिळवून दाखवले आहे.

हे पण वाचा :- रिझर्व बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी निघाली भरती, वाचा सविस्तर

पैठण तालुक्यातील मौजे हर्षी येथील कृष्णा आगळे आणि त्यांच्या धर्मपत्नी जयश्री आगळे यांनी हा भीम पराक्रम केला आहे. आगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी पारंपारिक पिकांच्या शेतीला बगल देत सिमला मिरची सारख्या भाजीपाला वर्गीय पिकाची शेती करण्याचा निर्णय घेतला.

यासाठी कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घेत एक एकर क्षत्रावर म्हणजेच 40 गुंठ्यावर शेडनेटाऊस उभारण्यात आले. मग या शेडनेट हाऊस मध्ये वरंबे तयार करून त्यावर मल्चिंग पेपर अंथरण्यात आला. मल्चिंग पेपर नंतर ठिबक सिंचन प्रणाली लावली आणि सिमला मिरचीची लागवड करण्यात आली.

जानेवारी 2023 मध्ये 40 गुंठ्यात जवळपास आठ हजार सिमला मिरचीची रोपे त्यांनी लावली. पीक लागवड केल्यानंतर पीकातून दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी योग्य नियोजन आखले.

वेळेवर पाणी दिले, फवारणी केली आणि वेळेवर निंदणी केल्यामुळे शिमला मिरचीचे दर्जेदार उत्पादन त्यांना मिळाले. विशेष म्हणजे बाहेरून मजूर लावण्यापेक्षा सहपरिवार त्यांनी सिमला मिरचीची शेती फुलवली.

हे पण वाचा :- 12वी पास तरुणांसाठी देशसेवेची सुवर्णसंधी ! BSF मध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती, 21 मे पर्यंत इथं करा अर्ज

दरम्यान एप्रिल महिन्यापासून त्यांना यातून उत्पादन मिळत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 60 रुपये प्रति किलो असा भाव मिळाला मात्र आता दरात घसरण झाली असून तीस रुपये प्रति किलो या दराने सध्या त्यांची शिमला मिरची विकली जात आहे.

दर आठवड्याला अडीच ते तीन टन मिरचीचे उत्पादन त्यांना मिळत आहे. म्हणजेच प्रत्येक आठवड्याला 70 ते 80 हजार रुपयाचा माल त्यांनी विकला आहे. सिमला मिरचीची गुणवत्ता चांगली असल्याने व्यापारी थेट बांधावर हजेरी लावत त्यांचा माल खरेदी करत आहेत.

म्हणजेच त्यांना दीड महिन्यात या एका एकरातून जवळपास अडीच ते तीन लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळाले असून यासाठी एक लाखाचा खर्च त्यांनी केला आहे. खर्च वजा जाता त्यांना जवळपास दोन लाखांची कमाई आतापर्यंत झाली आहे.

निश्चितच या शेतकरी दांपत्याने शेतीमध्ये केलेला हा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक राहणार आहे. मराठवाड्यासारख्या दुष्काळी पट्ट्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फुलवलेली ही शेती इतर प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारी आहे.

हे पण वाचा :- नागरिकांनो सावधान ! ‘या’ भागात पुन्हा वादळी पाऊस पडणार; भारतीय हवामान विभागाचा गंभीर इशारा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe