Farmer Success Story : अलीकडे शेतकरी बांधव शेती परवडत नाही असा ओरड करत असल्याचे चित्र आहे. मात्र असे असले तरी राज्यात असेही अनेक नवयुवक आहेत जे आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून कमी शेत जमिनीतून लाखो रुपयांची कमाई करत आहेत. आज आपण अशाच एका नवयुवक तरुणाची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर मात्र दोन एकरात आठ ते दहा लाखांपर्यंतची कमाई करण्याची किमया साधली आहे.
आज आपण रमेश जगताप नामक एका युवा तरुणाचा शेतीमधला आगळावेगळा प्रयोग बघणार आहोत. खरं पाहता, रमेश यांनी मात्र दोन महिन्यात आपल्या एक एकर शेत जमिनीतून खरबूज पिकातून तीन लाखांची कमाई केली आहे. यामुळे रमेश यांचा प्रयोग पंचक्रोशीत चांगलाच गाजला आहे.
रमेश आपल्या दोन एकर शेतजमीनीत कायमच वेगवेगळे असे प्रयोग करतात. शेतीत स्वीट कॉर्न, मका, वांगी मिरची अशा पद्धतीने आलटून पालटून पिके ते घेत असतात. यामुळे त्यांना अधिक उत्पादन मिळते. शिवाय वर्षातून अनेकदा उत्पन्न मिळत.
रमेश यांचे यश हे निश्चितच नेत्र दीपक आहे. मात्र हे यश संपादन करताना त्यांना अनेक अडचणींचा देखील सामना करावा लागला आहे. रमेश यांच्या वडिलांचे गेल्या सहा वर्षांपूर्वी निधन झाले. यांच्या निधनापश्चात कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. अवघ नववीपर्यंतच जेमतेम झालेला शिक्षण यामुळे संसारात, शेतीत आपला जम बसणार का हा मोठा प्रश्न त्यांना भेडसावत होता.
मात्र निश्चयाचा महामेरू रमेश यांना त्यांचे मित्र बंधू अक्षय खारे यांनी मोलाचे सहकार्य केले. वडिलोपार्जित दोन एकर शेत जमीन हे रमेश यांनी कसून मेहनत घेतली. अक्षय हे प्रधानमंत्री किसान समृद्धी योजना केंद्र चालवतात. यामुळे वेळोवेळी खतांची औषधांची माहिती अक्षय यांच्याकडून मिळाली. दरम्यान त्यांनी आपल्या अवघ्या दोन एकर क्षेत्रात वेगवेगळ्या पिकांची फेरपालट करून शेती सुरू केली.
शेतीचा जोडीला त्यांनी गाईचे संगोपन सुरू केले. म्हणजेच शेतीसोबतच दूध आणि शेणाच्या विक्रीतूनही त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना शेतीतून आणि पशुपालनातून आठ ते दहा लाखांची कमाई होत आहे. निश्चितच मित्राची लाभलेली साथ रमेशसाठी फायदेशीर ठरली असून त्यांनी शेतीत केलेली ही कामगिरी इतरांसाठी मार्गदर्शक राहणार आहे.