Farmer Success Story : कोरोना काळापासून भारतीय समाज व्यवस्थेत थोडे बदल पहायला मिळत आहेत. जसं की आपणास ठाऊकच आहे की, कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात. यामुळे अशा लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला. कोरोना काळात नोकरी गमावलेल्या अनेक लोकांनी मात्र आपल्या गावाकडे बस्तान हलवले. गावाकडे परतत अनेकांनी शेती सुरू केली.
पुणे जिल्ह्यातील एका युवा तरुणाने देखील कोरोना काळात नोकरी गेल्यानंतर शेती सुरू केली आहे. विशेष म्हणजे आपल्या वडिलोपार्जित शेतीत या युवा तरुणाने नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून आता लाखोंची कमाई करून दाखवली आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मौजे सिंगापूर या गावातील युवा तरुणाने ही किमया साधली आहे. अभिजीत लवांडे नामक युवा शेतकऱ्याने हे करून दाखवले आहे.
हे पण वाचा :- पदवीधर उमेदवारांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ विद्यापीठात निघाली विविध पदांसाठी भरती, वाचा याविषयी सविस्तर
कोरोना मध्ये नोकरी गमावल्यानंतर अभिजीत यांनी आपल्या गावाकडे परतत 9 एकर वडिलोपार्जित शेती कसण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्यांचा हा निर्णय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला असून नऊ एकरात अंजीर, सिताफळ आणि जांभुळ पिकाच्या शेतीतून ते लाख रुपये कमवत आहेत. अंजीरच्या मात्र तीस गुंठे जमिनीत लागवड केलेल्या झाडातून त्यांना तब्बल दहा लाखापर्यंतची कमाई झाली आहे.
अभिजीत सांगतात की, शेती करण्यास सुरुवात केली आणि सर्वप्रथम त्यांनी पाण्याची शाश्वत सोय केली. यासाठी कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घेत शेततळे तयार करण्यात आले. यानंतर चार एकरात अंजीर, तीन एकरात सीताफळ आणि पाऊण एकर शेत जमिनीत जांभूळ लागवड केली. अंजीरच्या पुन्हा पुरंदर या जातीची त्यांनी लागवड केली असून चार एकरात जवळपास 600 झाडे त्यांनी लावली आहेत.
हे पण वाचा :- मुंबईमध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ विभागात निघाली विविध पदासाठी भरती, 65 हजारापर्यंतचा पगार मिळणार, वाचा सविस्तर
त्यांनी उत्पादित केलेल्या अंजीरला 80 ते 100 रुपये प्रति किलोचा भाव मिळत आहे. यामुळे त्यांना यातून चांगली कमाई होत आहे. तसेच त्यांनी सीताफळच्या फुले पुरंदर या जातीची लागवड केली असून गेल्यावर्षी सिताफळच्या तीन एकर जमिनीतून त्यांना साडेचार लाखापर्यंतची कमाई झाली होती. याव्यतिरिक्त त्यांनी जांभळाची कोकण बारडोली या जातीची लागवड केली आहे.
यातून त्यांना अद्याप उत्पन्न मिळालेले नाही मात्र पुढील वर्षापासून या पिकातूनही त्यांना उत्पन्न मिळणार आहे. निश्चितच, नवयुवकांनी शेतीमध्ये बदल केला आणि बागायती शेती केली तर शेतीतून लाखोंची कमाई केली जाऊ शकते हे या प्रयोगातून सिद्ध होत आहे. योग्य व्यवस्थापन, पिकांच्या योग्य आणि सुधारित जातींची लागवड केली तर बागायती पिकातून लाखोंची कमाई होते हेच अभिजीत यांनी दाखवून दिले आहे.
हे पण वाचा :- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; ‘असं’ बेशिस्त वर्तनुक केल्यास बसणार मोठा भुर्दंड, परिपत्रक जारी, वाचा