पंजाब डख यांचा आजचा हवामान अंदाज : येत्या काही तासात ‘या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस; वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Punjab Dakh Havaman Andaj Marathi : परभणी येथील हवामान तज्ञ पंजाब डख यांनी नुकताच एक मोठा अंदाज व्यक्त केला आहे. डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार, राज्यात 28 एप्रिल 2023 पासून म्हणजे आजपासून पुन्हा एकदा राज्यात मुसळधार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे.

28 एप्रिल 2023 ते 30 एप्रिल 2023 पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस आणि गारपीट होणार आहे. या कालावधीमध्ये सोसाट्याचा वारा देखील वाहू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना तसेच सामान्य जनतेला अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

हे पण वाचा :- पदवीधर उमेदवारांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ विद्यापीठात निघाली विविध पदांसाठी भरती, वाचा याविषयी सविस्तर

कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस?

डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून पुढील तीन दिवस राज्यातील लातूर, सोलापूर, बीड, नांदेड, परभणी, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, हिंगोली, वर्धा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तसेच या जिल्ह्यातील काही भागात गारपीट देखील होऊ शकते.

विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने या भागातील शेतकऱ्यांना विशेष सतर्क राहायचे आहे. तसेच डख यांनी उर्वरित राज्यात देखील पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यात मात्र रिमझिम पाऊस पडणार असून सर्वदूर पाऊस पडणार नाही अस त्यांनी सांगितलं आहे.

हे पण वाचा :- मुंबईमध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ विभागात निघाली विविध पदासाठी भरती, 65 हजारापर्यंतचा पगार मिळणार, वाचा सविस्तर

तसेच 29 आणि 30 एप्रिल रोजी राज्यातील सांगली, सातारा तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता त्यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. एकंदरीत, आता पावसाळा सुरू होण्यास म्हणजेच खरीप हंगाम सुरू होण्यास दीड महिन्याचा कालावधी शेष आहे. अशा परिस्थितीत पडणारा हा पाऊस शेतकऱ्यांची चिंता वाढवत आहे.

उन्हाळा मात्र एका महिन्यात संपणार असून अवकाळी पाऊस अजूनही पिच्छा सोडत नसल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे देखील मोठ्या नुकसान झाले आहे. शिवाय आगामी काही दिवस राज्यात पावसाची शक्यता पंजाब डख यांनी व्यक्त केली आहे. म्हणून डख यांचा हा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांचे आणखी नुकसान होऊ शकते असं चित्र तयार होत आहे.

हे पण वाचा :- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; ‘असं’ बेशिस्त वर्तनुक केल्यास बसणार मोठा भुर्दंड, परिपत्रक जारी, वाचा