चर्चा तर होणारच…! फुलशेतीतून साधली आर्थिक प्रगती ; वर्षाकाठी करताय 25 लाखांची उलाढाल, पंचक्रोशीत रंगली चर्चा

Ajay Patil
Published:

Farmer Success Story : शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने अलीकडे शेतकरी बांधव शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय असल्याचा ओरड करतात. निश्चितच निसर्गाचा लहरीपणा, बाजारात शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर, शासनाचे उदासीन धोरण या सर्वांमुळे शेती करणे मोठं आव्हानात्मक बनले आहे.

पण या विपरीत परिस्थितीत देखील काही शेतकरी बांधव शेतीमधून लाखोंची कमाई करत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधत आहेत. धुळे जिल्ह्यातील रानमळा येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील पोलीस शेतीच्या माध्यमातून लाखोंची कमाई करत आर्थिक प्रगती साधली आहे.

दीपक गावडे असे या शेतकऱ्याचे नाव असून या शेतकऱ्याने आपल्या कष्टाच्या जोरावर आणि योग्य नियोजनाच्या जोरावर फुलशेतीच्या माध्यमातून वार्षिक वीस ते पंचवीस लाखांची उलाढाल करून दाखवली आहे.

विशेष म्हणजे यातून त्यांना आठ ते दहा लाखांचा निव्वळ नफा राहत आहे. धुळे शहरालगत मोहाडी उपनगरमार्गे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या रानमळा येथे त्यांचे शेत आहे. दीपक यांचे वडील पूर्वी एका मिलमध्ये गेट कीपर होते. मग दीपक यांनी देखील गेट कीपरचे काम सुरू केले. त्यांच्या परिवाराची एक हेक्टर 62 आज जमीन काळाच्या ओघात सावकाराच्या ताब्यात गेली.

अशा परिस्थितीत त्यांनी शाश्वत उत्पन्न घेण्यासाठी दहा वर्षांपूर्वी फुल शेती सुरू केली. फुलशेती त्यांच्यासाठी फायदेशीर ठरली असून सावकार कडे गहाण ठेवण्यात आलेली जमीन देखील त्यांनी सोडवली आहे. सद्यस्थितीला दीपक आपल्या वडिलोपार्जित तीन एकर शेतीवर फुल शेती करत असून शेजारील शेतकऱ्याची दीड एकर शेत जमीन शेती कसण्यासाठी घेतली आहे.

ज्यावेळी फुल शेती सुरू झाली त्यावेळी गुलाबाचे अवघे 1000 झाड लावण्यात आले. दरम्यान आता या झाडांची संख्या दहा हजार बनली आहे. दीपक सकाळी सहा सातच्या आसपास शेतात गेल्यानंतर सायंकाळी सातलाच परतत असतात. दीपक यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या शेतात विविधरंगी गुलाब, शेवंती, निशिगंध, मोगरा, ग्लॅडर, झेंडू, बिजली, गुलछडी असे आठ ते दहा प्रकारच्या फुलांचे उत्पादन हे घेतले जात आहे.

म्हणजे हंगामानुसार वेगवेगळ्या फुलांचे उत्पादन ते घेत असतात. विशेष म्हणजे त्यांनी भाजीपाला शेतीमध्ये देखील आपल नशीब आजमावलं असून यातूनही त्यांना चांगली कमाई होत आहे. कारले, दुधीभोपळा आदी फळभाज्यांची ते शेती करतात. याची मांडव पद्धतीने लागवड करत असल्याने रोगराईचा धोका कमी होतो आणि उत्पादन वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, आपल्या दुचाकीने दीपक व त्यांचे वडील प्रसाद गावडे हे धुळे शहरात ठिकठिकाणी बंदीच्या आठ ते दहा विक्रेत्यांकडे आपल्या ताज्या फुलांचा माल पोचवितात. एवढेच नाही तर गावडे यांनी उत्पादित केलेले फुले शिंदखेडा, झोडगे, मालेगाव, जळगाव आदी ठिकाणी व्यापाऱ्यांना विकली जात आहेत.

विशेष म्हणजे पाण्याची सोय करण्यासाठी पाच किलोमीटर लांबून पाईपलाईन करण्यात आली आहे. तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठिबक सिंचन प्रणालीच्या माध्यमातून पिकाला पाणी दिले जात आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची शेती करून गावडे कुटुंब वर्षाकाठी 25 लाखांपर्यंतची उलाढाल करत असून निव्वळ नफा आठ ते दहा लाखांचा कमवत आहे. निश्चितच गावडे यांनी शेतीमध्ये केलेली ही कामगिरी इतरांसाठी प्रेरक ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe