काय सांगता ! प्रयोगशील शेतकऱ्याने अवघ्या 20 गुंठ्यात ‘या’ पिकाची शेती करून मिळवलं 5 लाखांचे उत्पन्न ; पहा ही भन्नाट यशोगाथा

Ajay Patil
Published:
farmer success story

Farmer Success Story : शेती म्हटलं की रिस्क आलीचं. या क्षेत्रात निश्चितच शेतकऱ्यांना आव्हानाचा सामना करावा लागतो. कधी निसर्गाचे दुष्टचक्र तर कधी बाजारात मिळत असलेला शेतमालाला कवडीमोल दर यामुळे अलीकडे नवयुवक शेतकरी पुत्र शेती म्हटलं की नाक मुरडतात. शेती म्हणजे फक्त नुकसान असाच या नवयुवकांचा समज बनला आहे.

मात्र जर शेतीमध्ये बदल केला, आव्हानांचा सामना करण्याची डेरिंग ठेवली तसेच हवामानावर आधारित शेती केली तर निश्चितच शेतीतून चांगले उत्पन्न मिळवले जाऊ शकते. हेच बीड जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. जिल्ह्यातील केज तालुक्याच्या मौजे उमरे येथील एका शेतकऱ्याने पारंपारिक शेतीत नुकसान सहन करावे लागत असल्याने फळबाग लागवडीचा निर्णय घेतला.

ऋषिकेश पुरी असं या नवयुवक तरुण शेतकऱ्याचे नाव. ऋषिकेश हे देखील इतर शेतकऱ्यांप्रमाणेच पारंपारिक पिकांची शेती करायचे मात्र परंपरागत चालत आलेल्या शेती पद्धतीत अनेक दोष आहेत शिवाय पारंपारिक पिकांची लागवड केल्यास बाजारात यां पिकांना चांगला दर मिळत नाही. परिणामी शेतीत बदल करणे हेतू ऋषिकेश यांनी आपल्या 20 गुंठे शेतीजमिनीत तैवान जातीच्या पेरूची लागवड केली.

गेल्या वर्षी पहिल्यांदाच या तैवान जातीच्या पेरूतून ऋषिकेश यांना उत्पन्न मिळालं. गेल्या वर्षी पहिली फेरी असतानाही त्यांना तब्बल साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न यातून प्राप्त करता आलं. यामुळे पंचक्रोशीत ऋषिकेशची चांगली चर्चा रंगली. दरम्यान आता सलग दुसऱ्यांदा तैवान जातीच्या पेरूची चांगली फळधारणा झाली असून यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळणार आहे.

विशेष म्हणजे कमाईचा आकडा यंदा वाढणार असल्याचे मत ऋषिकेश यांनी व्यक्त केला आहे. सध्या स्थितीला तैवान जातीच्या पेरूला चांगले फळ लागले असल्याने यातून यंदा पाच लाखांपर्यंतची कमाई त्यांना होण्याची आशा आहे. हे तैवान जातीचे पेरू गुजरात आणि हैदराबादच्या मार्केटमध्ये चांगल्या भावात विक्री होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

निश्चितच पारंपारिक पिकपपद्धतीने शेती केल्यास शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत असले तरी देखील जर शेतीमध्ये बदल केला, आधुनिक प्रयोगच्या माध्यमातून फळबाग पिकांसारख्या इतर नगदी पिकांची शेती केली तर निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो हेच ऋषिकेश यांनी दाखवून दिले आहे.

वास्तविक पाहता बीड हा जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून कुख्यात आहे. मात्र याच दुष्काळासाठी कुख्यात जिल्ह्यात तैवान जातीच्या पेरू पिकातून मात्र वीस गुंठ्यात पाच लाखांची कमाई करून या नवयुवक शेतकऱ्याने इतरांसाठी मार्गदर्शक असं काम केलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe