FD News : फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा गुंतवायचा आहे का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरंतर, आरबीआयकडून गेल्या काही महिन्यांच्या काळात रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. आरबीआय ने गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी आणि या नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला दोनदा रेपो रेट मध्ये कपात केली होती.
या दोन्ही वेळा आरबीआय कडून 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आली म्हणजेच एकूण 0.50% इतके रेपो रेट कमी करण्यात आले. याशिवाय नुकत्याच काही दिवसांपूर्वी आरबीआय ने पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांची कपात केली.

म्हणजेच अलीकडील काही महिन्यांमध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून रेपो रेट मध्ये तब्बल एक टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. या निर्णयानंतर फिक्स डिपॉझिटच्या व्याजदरात देखील मोठ्या प्रमाणात कपात झालेली आहे.
देशभरातील विविध सरकारी आणि खाजगी बँकांकडून फिक्स डिपॉझिट वरील व्याजदर कमी केले जात आहेत. अशा परिस्थितीत आज आपण सध्याच्या परिस्थितीत देशातील कोणत्या प्रायव्हेट बँका एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करत आहेत याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या प्रायव्हेट बँका देतात सर्वाधिक व्याज
येस बँक : येस बँक ही देशातील एक प्रमुख प्रायव्हेट बँक आहे. ही बँक तीन वर्षांपासून ते पाच वर्ष कालावधीच्या एफडीवर आपल्या ग्राहकांना 7.10% दराने व्याज देत आहे.
तामिळनाडू मर्चंटाइल बँक : जर तुम्हालाही फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करायची असेल तर या बँकेचा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे. कारण ही बँक सध्या स्थितीला 400 दिवसांच्या एफडी मध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 7.05% दराने व्याज दिले जात आहे.
इंडसइंड बँक : इंडसइंड बँक ही देखील देशातील एक प्रमुख प्रायव्हेट बँक आहे. ही बँक फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगले व्याज देते. एक वर्ष एक महिना ते दोन वर्ष कालावधीच्या एफडीवर या बँकेकडून आपल्या ग्राहकांना सात टक्के दराने व्याज दिले जात आहे.
फेडरल बँक : फेडरल बँक देखील फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगले रिटर्न देत आहे. फेडरल बँकेकडून 444 दिवसांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सद्यस्थितीला 6.85% दराने व्याज दिले जात आहे.
सिटी युनियन बँक : सिटी युनियन बँकेकडून देखील फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगले रिटर्न दिले जात आहेत. या बँकेकडून 365 दिवसांच्या एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 6.75 टक्के दराने रिटर्न दिले जात आहेत.