FD News : नजीकच्या भविष्यात फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का अहो मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. खरे तर गुंतवणुकीसाठी फिक्स डिपॉझिट म्हणजे मुदत ठेव योजना हा एक लोकप्रिय प्रकार समजला जातो.
फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. फिक्स डिपॉझिट मध्ये महिलावर्ग आणि जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवताना दिसतात. दरम्यान जर तुम्हाला ही फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा गुंतवायचा असेल

तर तुमच्यासाठी आज आम्ही एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण 365 दिवसांच्या एफडीवर म्हणजेच एका वर्षाच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची माहिती जाणून घेणार आहोत.
एका वर्षाच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँका
तामिळनाडू मर्चंटाइल बँक : 365 दिवसांच्या एफडीवर ही बँक आपल्या ग्राहकांना चांगले व्याज ऑफर करत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला शॉर्ट टर्म साठी फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा गुंतवायचा असेल तर तुमच्यासाठी या बँकेचा पर्याय बेस्ट राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एका वर्षाच्या एफडीवर 60 वर्षांवरील नागरिकांना म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के दराने व्याज देत आहे.
RBL बँक : आरबीएल बँक सुद्धा आपल्या ग्राहकांना चांगले व्याज ऑफर करते. फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणुकीसाठी ही बँक देखील ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरबीएल बँकेकडून 365 दिवसांच्या FD वर म्हणजेच एका वर्षाच्या FD वर तब्बल आठ टक्के दराने व्याज दिले जात आहे.
मात्र हे व्याजदर 60 वर्षांवरील नागरिकांसाठी लागू आहे. त्यामुळे जर तुमचाही फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणुकीचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी ही बँक फायद्याची राहणार आहे.
इंडसइंड बँक : शॉर्ट टर्म एफडी इन्वेस्टमेंट साठी इंडसइंड बँकेचा पर्याय फायदा करणार आहे. सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असणारे ग्राहक नेहमीच फिक्स डिपॉझिट ला प्राधान्य दाखवतात आणि
जर तुमचाही फिक्स डीपॉझिटमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी इंडसइंड बँकेचा पर्याय फायदेशीर राहणार आहे. कारण की ही बँक एका वर्षांच्या एफडीवर 60 वर्षांवरील नागरिकांना आठ टक्के दराने व्याज देत आहे.
बंधन बँक : बंधन बँक वर सांगितलेल्या तिन्ही बँकापेक्षा एका वर्षाच्या एफडीवर अधिक व्याज देत आहे. बंधन बँकेकडून 365 दिवसांच्या एफडीवर 60 वर्षांवरील नागरिकांना 8.25 टक्के दराने व्याज दिले जात आहे.
त्यामुळे जर तुमच्याही घरात कोणी सीनियर सिटीजन असेल आणि तुम्हाला त्यांच्या नावाने एफडी करायची असेल तर तुमच्यासाठी बंधन बँकेचा पर्याय सर्वात बेस्ट ठरेल असे जाणकार लोकांचे म्हणणे आहे.