FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना मोठा दणका ! ‘या’ मोठ्या बँकेने फिक्स डिपॉझिट वरील व्याजदरात केली कपात

फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणार असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. इंडसइंड बँकेने एफडीवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे.

Published on -

Fixed Deposit Interest Rate : एफडी अर्थात फिक्स डिपॉझिट हा सुरक्षित गुंतवणुकीचा सर्वात उत्तम पर्याय. यात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या नेहमीच अधिक राहते. एफडी मध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्ग गुंतवणूक करतात. थोडे कमी रिटर्न मिळाले तरी चालेलं, पण आपला पैसा कष्टाने कमावलेला पैसा वाया जाणार नाही म्हणून महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक FD मध्ये गुंतवणूक करण्याला नेहमीच पसंती दाखवतात.

विशेष बाब म्हणजे सामान्य ग्राहकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना बँकांकडून एफडीवर अधिकचा परतावा दिला जातोय. मात्र आता देशातील अनेक बँकांनी एफडी वरील व्याजदरात कपात केली आहे.

महत्त्वाचे म्हणजे आगामी काळात देशातील आणखी काही बँका एफडीच्या व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे. कारण म्हणजे आरबीआयने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 7 फेब्रुवारी 2025 रोजी आरबीआयने 25 बेसिस पॉईटने कपात केलीये.

आधी रेपो रेट 6.50% इतका होता मात्र आता या दरात 0.25 टक्यांची कपात झाली असून रेपो रेट 6.25 टक्के एवढा झाला आहे. तब्बल पाच वर्षानंतर आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो रेट मध्ये कपात झाली असल्याने आता बँका एफडी वरील व्याजदरात देखील कपात करण्याचा निर्णय घेत आहेत.

अशातच आता देशातील एका प्रमुख प्रायव्हेट बँकेने एफडी व्याज दरात कपात केली आहे. इंडसइंड बँकेने आपल्या ग्राहकांना जोरदार दणका दिला असून एफडीच्या व्याजदरात बँकेकडून नुकतीच कपात करण्यात आली आहे. दरम्यान आता आपण बँकेचे एफडीचे सुधारित व्याजदर कसे आहेत ? याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

किती कमी केलेत व्याजदर

खाजगी क्षेत्रातील इंडसइंड बँकेने एफडी दरात कपात केली आहे. आता नियमित ग्राहकांना बँकेकडून एक वर्ष ते दोन वर्ष कालावधीच्या एफडीवर सर्वाधिक व्याज दिले जाणार आहे. आता या कालावधीच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना जास्तीत जास्त 7.75 टक्के दराने व्याज मिळणार आहे.

तसेच बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त 8.25 टक्के व्याज मिळणार आहे. आधी याच कालावधीच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 7.99% आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 8.49% दराने व्याज दिले जात होते.

आता बँकेकडुन सामान्य नागरिकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 3.50 टक्के ते 7.75 टक्क्यांपर्यंत व्याजदर देणार आहे आणि त्याच वेळी ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीच्या एफडीवर 4 टक्के ते 8.25 टक्क्यांपर्यंत व्याजदर दिले जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe