Fixed Deposit Scheme: धमाकेदार आहे बँक ऑफ बडोदाची ‘ही’ मान्सून धमाका ठेव योजना! कराल गुंतवणूक तर पावसासारखा बरसेल पैसा

Published on -

Fixed Deposit Scheme:- गुंतवणुकीची सुरक्षितता आणि चांगल्या परताव्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर बरेच गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी बँकांच्या मुदत ठेव योजनांना प्राधान्य देतात. मुदत ठेव योजना या बँकांच्या माध्यमातून जशा राबवल्या जातात तसेच पोस्ट ऑफिसच्या देखील काही मुदत ठेव म्हणजेच फिक्स डिपॉझिट योजना आहेत.

यामध्ये गुंतवणूक सुरक्षित राहते व परतावा देखील चांगला मिळतो. तसेच बऱ्याच बँकांनी आकर्षक अशा विशेष मुदत ठेव योजना सुरू केल्या असल्याने त्या माध्यमातून ठराविक कालावधीमध्ये चांगला व्याजदर दिला जातो.

त्या अनुषंगाने जर आपण महत्वाच्या अशा बँक ऑफ बडोदाचा विचार केला तर या बँकेने देखील उच्च व्याजदर देणारी विशेष एफडी योजना सुरू केली आहे व त्या योजनेला मान्सून धमाका ठेव योजना असे नाव दिलेले आहे. ही योजना उच्च व्याजाची एफडीमध्ये गुंतवणुकीची संधी गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देत आहे.

 बँक ऑफ बडोदाने सुरु केली मान्सून धमाका ठेव योजना

देशातील अग्रगण्य बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने उच्च व्याजदराच्या लाभासह नवीन विशेष एफडी योजना सुरू केली असून तिला मान्सून धमाका ठेव योजना असे नाव दिलेले आहे. बँक ऑफ बडोदा च्या ज्या काही नियमीत योजना होत्या त्यामध्ये सुधारणा देखील केलेल्या आहेत.

या मान्सून धमाका ठेव योजनेच्या माध्यमातून बँक 333 आणि 399 दिवसांची जास्तीत जास्त व्याजाच्या एफडी मध्ये गुंतवणुकीचे संधी गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देत आहे. या योजनेच्या अंतर्गत 399 दिवसांच्या कालावधीत एफडी केली तर त्यावर बँक 7.25 टक्के वार्षिक व्याज देत आहे व त्यासोबत 333 दिवसांच्या एफडीवर 7.15 टक्के व्याज देत आहे.

बँकेने ही योजना 15 जुलै 2024 पासून सुरू केली असून या योजनेमध्ये निश्चित केलेले व्याजदर तीन कोटी रुपयांपेक्षा कमी किरकोळ ठेवींवर लागू आहेत. तसेच बँक ऑफ बडोदाने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या एफडीवर 0.50% अतिरिक्त वार्षिक व्याजदर मिळणार आहे.

म्हणजेच 399 दिवसांसाठी जेष्ठ नागरिकांना 7.75 टक्के आणि वार्षिक 7.65% व्याज मिळणार आहे. बँक ऑफ बडोदाची ही मान्सून धमाका ठेव एफडी योजना 399 दिवसांकरिता जास्तीत जास्त 7.90% पर्यंत वार्षिक व्याज देत आहे.

 बँक ऑफ बडोदाचे ठेवींच्या कालावधीनुसार नवीन मुदत ठेवींचे व्याजदर

1- सात ते 14 दिवस सामान्य लोकांकरिता 4.25% ते जेष्ठ नागरिकांसाठी 4.75%

2- 15 ते 45 दिवस सामान्य व्यक्तींसाठी सहा टक्के तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.50%

3- 46 ते 90 दिवस सामान्य लोकांकरिता 5.50% तर ज्येष्ठ नागरिकांसाठी सहा टक्के

4- 91 ते 180 दिवस सामान्य लोकांकरिता 5.60% तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.10%

5- 181 ते 210 दिवस सामान्य लोकांकरिता 5.75% तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.25%

6- 211 ते 270 दिवस सामान्य लोकांकरिता 6.15 तर जेष्ठ नागरिकांसाठी 6.25%

7- 271 दिवस आणि त्याहून अधिक किंवा एक वर्षापेक्षा कमी सामान्य लोकांकरिता 6.25% तर जेष्ठ नागरिकांसाठी 6.75

8-  333 दिवस( आताच्या मान्सून धमाका ठेव योजनेतील व्याजदर)- सर्वसामान्यांसाठी 7.15 तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.65%

9- 360 दिवस सामान्य लोकांसाठी 7.10 तर जेष्ठ नागरिकांसाठी 7.60%

10- एक वर्ष सामान्य लोकांकरिता 6.85 तर जेष्ठ नागरिकांसाठी 7.35%

11- 399 दिवस( मान्सून धमाका ठेव योजना) सामान्य लोकांसाठी 7.25% तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.75%

12- एक वर्ष ते चारशे दिवसांपेक्षा जास्त सामान्य लोकांसाठी 6.85% तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.35%

13- चारशे दिवसांपेक्षा जास्त आणि दोन वर्षापर्यंत सामान्य व्यक्तींकरिता 6.85 तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.35%

14- दोन वर्षांपेक्षा जास्त आणि तीन वर्षांपर्यंत सामान्य लोकांसाठी 7.15% टक्के तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.65%

15- तीन वर्षापेक्षा जास्त आणि पाच वर्षापर्यंत सामान्य व्यक्तींकरिता 6.50% तर जेष्ठ नागरिकांसाठी सात टक्के

16- पाच वर्षे ते दहा वर्षापेक्षा जास्त सामान्य व्यक्तींकरिता 6.50 तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50%

17- दहा वर्षावरील( याला कोर्ट ऑर्डर योजना म्हणतात)- सामान्य लोकांकरिता 6.25 तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.75%

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe