Business Success Story:- आयुष्यात यशस्वी होणे किंवा आयुष्यात यश मिळवणे हे एका रात्रीत किंवा एका दिवसात तर नक्कीच घडत नसते. याकरता दीर्घकालीन कष्ट आणि मेहनत लागतेच व आपल्याला जे काही मिळवायचे आहे ते मिळेपर्यंत प्रयत्नांमध्ये सातत्य देखील तितकेच गरजेचे असते.
तसेच जीवन जगत असताना कायम नवनवीन गोष्टींचा शोध घेत राहणे,नवीन गोष्टी अंगीकारणे इत्यादी गुणांचा देखील यामध्ये समावेश होतो. तसेच जिद्द आणि प्रमाणिकपणे कष्ट याच्या जोरावर व्यक्ती यशस्वी होत असते. याच पद्धतीने जर आपण रिजवान साजन यांची यशोगाथा बघितली तर ती इतरांना प्रेरणादायी आहे.

त्यांनी दुबईमध्ये डॅन्यूब ग्रुप उभारला असून आज या कंपनीचे ते संस्थापक आणि अध्यक्ष देखील आहेत. नेमकी त्यांची ही कंपनी काय करते व त्यांचा हा प्रवास कसा होता? याबद्दलची माहिती थोडक्यात बघू.
रस्त्यावर विविध वस्तूंची विक्री ते आज कोट्याधीश, कसा आहे रिजवान साजन यांचा प्रवास?
मीडिया रिपोर्ट्स मध्ये आलेल्या वृत्तानुसार जर बघितले तर रिझवान साजन यांची यशोगाथा इतरांना खूपच प्रेरणादायी अशी आहे. यांचे लहानपण जर बघितले तर ते अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आणि मुंबईच्या झोपडपट्टीत गेले.
मुंबईच्या झोपडपट्टीत वाढलेल्या साजन यांनी अत्यंत कठोर परिश्रम आणि जिद्दीने डॅन्यूब ग्रुपची स्थापना केली व आज ही कंपनी आघाडीची बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून नावारूपाला आली आहे. भारतीय वंशाच्या असलेल्या रिझवान साजन यांनी दुबईतील व्यवसाय क्षेत्रामध्ये एक स्वतःची आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे व त्यांची कंपनी बांधकाम साहित्य तसेच रिअल इस्टेट,
गृह सजावट आणि इतर क्षेत्रांमध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. त्यांच्या या यशामागे बघितले तर त्यांचे कठोर कष्ट तसेच झोकून घेण्याची प्रवृत्ती आणि ग्राहकांना नेमके काय हवे आहे ग्राहकांच्या गरजा समजून घेण्याची जी काही क्षमता आहेत त्याच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे.
साधारणपणे 1993 मध्ये दुबईत त्यांनी डॅन्यूब ग्रुपची स्थापना केली. या कंपनीची सुरुवात झाली तेव्हा बांधकामासाठी आवश्यक असलेले साहित्याचा पुरवठा करण्यासाठी ही कंपनी ओळखली जाऊ लागली.
टप्प्याटप्प्याने प्लॅनिंग करत रिजवान साजन यांनी या कंपनीचे नाव बांधकाम उद्योगात अग्रेसर केले व बांधकाम उद्योगासाठी प्रमुख वस्तूंची पुरवठादार कंपनी म्हणून हा ग्रुप नावारूपाला आला व इतकेच नाही तर हा व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले.
आज त्यांची ही कंपनी रिटेल, किचन सोल्युशन्स आणि फिट आउट सोल्युशन यांचा देखील समावेश आहे. आज जर आपण बघितले तर डेन्यूब ग्रुपचा व्यवसाय दुबईतच नाही तर संपूर्ण सौदी अरेबिया, कुवेत तसेच भारत आणि इतर देशांमध्ये पसरला असून या देशांमध्ये हा ग्रुप आपली सेवा देतो. संपूर्ण जगात या ग्रुपचे 50 पेक्षा जास्त शोरूम आहेत व 25 पेक्षा जास्त देशांमध्ये हा ग्रुप सध्या काम करत आहे.
आज किती आहे रिजवान साजन यांची एकूण संपत्ती?
रिजवान साजन यांनी कष्टाने उभा केलेला डेन्यूब ग्रुपचा व्यवसाय संपूर्ण जगात विस्तारण्यामागे त्यांचे प्रचंड कष्ट कामाला आले आहेत. जर रिजवान साजन यांची संपत्तीचा विचार केली तर ते दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक असून त्यांची एकूण संपत्ती अंदाजे 20830 कोटी रुपये इतकी आहे.
त्यांच्या या एकूण मालमत्तेतून दहा टक्के वार्षिक परतावा मिळाला तर हे वार्षिक उत्पन्न अंदाजे 2083 कोटी रुपये असेल व या आकडेवारीनुसार जर बघितले तर त्यांचे रोजचे उत्पन्न 5.7 कोटी रुपये इतकी आहे.
अशा पद्धतीने मुंबईच्या रस्त्यांवर दूध किंवा इतर वस्तूची विक्री करणाऱ्या या तरुणाने आज उद्योग क्षेत्रामध्ये स्वतःचे नाव कमावले असून प्रसिद्ध असा उद्योग ग्रुप देखील उभा केला आहे.













