Fuel Consumption: एक लिटर इंधनामध्ये विमान किती अंतर पार करते? वाचा किती असते विमानाचे मायलेज?

aircraft milage

Fuel Consumption:- आपण जेव्हा चार चाकी किंवा दुचाकी विकत घ्यायला जातो तेव्हा आपण सगळ्यात अगोदर संबंधित वाहनाचे मायलेज किती आहे हे अगोदर विचारतो किंवा ते व्यवस्थित तपासतो. कारण वाहनांच्या बाबतीत मायलेज हा एक महत्त्वाचा फॅक्टर असतो. मायलेज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मायलेज म्हणजे एका लिटर पेट्रोल किंवा डिझेलमध्ये वाहन किती किलोमीटर प्रवास करू शकते  याचे मापन किंवा यालाच मायलेज असे म्हणतात.

साहजिकच आहे तर मग इंधनाचे दर जर वाढले तर संबंधित वाहनांच्या प्रवास भाड्यात देखील वाढ होते. आपल्याला साधारणपणे ट्रक असेल किंवा कार, विविध दुचाकी इत्यादींचे मायलेज आपण ऐकले असेल किंवा आपल्याला माहिती असते. परंतु विमानाचे मायलेज काय राहत असेल किंवा किती असते याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का? जर आपण विमानाच्या मायलेज बद्दल माहिती घेतली तर  आपले डोके चक्रावेल अशी आकडेवारी समोर येते. या अनुषंगाने आपण या लेखात विमानाचे मायलेज किती असते याबद्दलची माहिती घेऊ.

 विमानाचे मायलेज किती असते?

1- बोईंग 747 विमानाचे मायलेज विमानाचे दोन प्रकार असतात एक म्हणजे बोईंग आणि दुसरे म्हणजे बम्बार्डियर किंवा एटीआर हे होय. यापैकी जर आपण बोईंग 747 या प्रकाराच्या विमानाबद्दल माहिती घेतली तर याचा वेग ताशी 900 किलोमीटर इतका असतो. यामध्ये साधारणपणे पाचशे प्रवासी प्रवास करू शकतात. जर आपण काही अहवालांचा विचार केला तर बोईंग 747 या प्रकाराचे विमान प्रति सेकंदाला 4 लिटर इंधन वापरते. म्हणजेच एका मिनिटाच्या प्रवासासाठी 240 लिटर इंधन या विमानाला लागते व एक लिटर इंधनांमध्ये सुमारे 0.8 किलोमीटर अंतर पार करते.

जर यानुसार आपण बोईंग 747 विमानाचा विचार केला तर एका किलोमीटर मध्ये सुमारे 12 लिटर इंधनाचा वापर या विमानाकडून केला जातो. म्हणजेच आपण गॅलन नुसार विचार केला तर एका सेकंदाला एक गॅलन इंधनाचा वापर हे विमान करते व एका मैलाकरिता पाच गॅलन इंधन वापरते. तसेच विमानाचा एक प्रकार असतो तो म्हणजे एयरबस होय. यामध्ये एअरबस A32 या प्रकाराच्या विमानाचा प्रतिसेकंद इंधनाचा वापर पाहिला तर तो 0.683 लिटर इतका आहे.

या सगळ्या आकडेवारीवरून विमानाचे मायलेज आपल्याला लक्षात येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe