Honda Diwali Sale:- दिवाळीच्या कालावधीमध्ये ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या सवलती वाहन खरेदीवर देण्यात येत आहेत व त्यासोबतच अनेक वाहन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून देखील फेस्टिवल ऑफर अंतर्गत विविध प्रकारच्या कारवर सूट देण्यात येत आहे.
त्यामुळे ग्राहकांना पैशांची बचत करून आपले कार किंवा बाईक खरेदी करण्याचे स्वप्न या कालावधीत पूर्ण करता येणे शक्य आहे. याच पद्धतीने जर आपण होंडा कंपनीच्या दृष्टिकोनातून बघितले तर या कंपनीने होंडाचे कार खरेदी करण्यासाठी एक सर्वात उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे
व होंडाच्या फेस्टिवल ऑफर सह या सणासुदीला कार घेण्याचा विचार जर करत असाल तर एक सुवर्ण संधी आहे. होंडाच्या माध्यमातून त्यांच्या फ्लॅगशिप, सिटी ई: एचईव्ही हायब्रीडसह संपूर्ण कार पोर्टफोलिओवर बंपर सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे या लेखात आपण माहिती घेऊ की होंडा कंपनी कुठल्या कारवर किती रुपयापर्यंतची सुट देत आहे?
होंडा देत आहे या कार्सवर बंपर सूट
1- होंडा सिटी– जर आपण होंडा सिटीची एक्स शोरूम किंमत पाहिली तर ती बारा लाख 8 हजार रुपयांपासून असून यावर कंपनीच्या माध्यमातून एक लाख 14 हजार रुपयांपर्यंत सवलत देण्यात येत आहे.
जर एखाद्या व्यक्तीकडे चांगली डील करण्याचे स्किल असेल तर तो या माध्यमातून चांगले फायदे आणखीन मिळवू शकतो. होंडा सिटी ही 1.5- लिटर एनए पेट्रोल इंजिन द्वारे समर्थित असून सहा स्पीड मॅन्युअल किंवा सीव्हीटीसह पेअर केले आहे.
2- होंडा अमेझ– होंडा अमेझची एक्स शोरूम किंमत सात लाख वीस हजार रुपयापासून सुरू होते व कंपनीच्या माध्यमातून या फेस्टिवल ऑफर अंतर्गत एक लाख बारा हजार पर्यंत सवलत दिली जात आहे.
होंडा त्यांच्या संपूर्ण अमेझ लाईनअप वर सवलत देत असून यामध्ये टॉप व्हेरियंट VX आणि VX Elite असून यावर एक लाख बारा हजार पर्यंतचे मोठी ऑफर देत आहे. तसेच मिड आणि एन्ट्री लेवल ट्रिम,S आणि E वर अनुक्रमे 92 हजार आणि 82 हजार पर्यंतच्या डीलसह येत आहेत.
3- होंडा सिटी ई: एचईव्ही– या कारची एक्स शोरूम किंमत 19 लाख रुपये पासून सुरू होते. कंपनी फेस्टिवल ऑफर अंतर्गत या कारवर 90 हजार रुपयांपर्यंत सवलत देत आहे.
ही कार 1.5- लिटर, चार सिलेंडर, एटकॅन्सन सायकल पेट्रोल इंजिन आणि दोन इलेक्ट्रिक मोटरद्वारे समर्थित असून ही कार ईसीव्हीटी ट्रान्समिशनसह येते.
4- होंडा एलिव्हेट– या कारची एक्स शोरूम किंमत अकरा लाख 91 हजार रुपयांपासून सुरू होते. कंपनी या फेस्टिवल ऑफर अंतर्गत 75 हजार रुपये पर्यंतची सवलत देत आहे.
होंडा कंपनीने अलीकडेच एलिव्हेट अपेक्स एडिशन लॉन्च केले असून याची एक्स शोरूम किंमत बारा लाख 86 हजार रुपये आहे. या कारमधील स्टॅंडर्ड आणि अपेक्स एडिशन दोन्ही 1.5- लीटर पेट्रोल इंजिन द्वारे समर्थित आहे आणि मॅन्युअल व सीव्हीटी दोन्हीमध्ये उपलब्ध आहे.